ॐ गिरिजायै विद्महे शिवप्रियायै धीमही तन्नो दुर्गा प्रचोदयात् ।
हा दुर्गागायत्री नामक प्रसिद्ध शक्तिमंत्र आहे. दुर्गा गायत्रीचा दुसरा मंत्र सुद्धा आहे.
ॐ महादेव्यै विद्महे दुर्गायै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ।
हे दोन्ही मंत्र चौवीस लक्ष जपाने सिद्ध होतात. दशांश हवन. हवनाचे दशांश तर्पण व त्याचे दशांश ब्राह्मणभोजन घालावे. हा मंत्र अज्ञान , कुबुद्धी, क्लेश इत्यादी दूर करतो व साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. मंत्रजपाबरोबर खालीलप्रमाणे ध्यान करावे.
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जन्तोः
स्वस्थैः स्मृतामतिमतीव शुभां ददासि ।
दारिद्रय दुःख भयहारिणि का त्वदन्या
सर्वोपकार करणाय सदाद्र चित्ता ॥
अन्य शक्ति-मंत्र :
१.
ॐ र्हीं दु दुर्गायै नमः ।
हा भगवतीचा अष्टाक्षर मंत्र आहे. याच्या सिद्धीसाठी आठ लक्ष जप करावा.
२.
क्रीं ।
हा कालीचा एकाक्षर मंत्र आहे. एक लक्ष जपाने याचे अनुष्ठान होते.
३.
र्हीं
हा सुद्धा एकाक्षर मंत्र आहे. एक लक्ष जप रात्रीच्यावेळी करुन अनुष्ठान पूर्ण होते.
४.
श्रीं ।
हा लक्ष्मीचा एकाक्षर मंत्र आहे. याच्या जपाने सर्व इच्छा पूर्ण होतात. बारा लाख जपाने अनुष्ठान करावे. ध्यान खालील प्रमाणे करावे .
कान्त्या कांचन सन्निमां हिमगिरि प्रख्यैश्चतुर्भिर्गजैः
हस्तात् क्षिप्तहिरण्ययामृतघटैरासिच्यमानां श्रियम् ।
विभ्राणां वरमब्जग्युममभयं हस्तैः किरीटोज्ज्वला
क्षौमाबद्ध नितम्बबिम्बललितां वन्देऽरविन्दस्थिताम् ॥
५.
ॐ तारात्रिपुरायै नमः ऋद्धिं वृद्धिं कुरु कुरु स्वाहा ।
याचा जप १०८ मण्यांचा अकरा माळा रात्री १२ च्या नंतर चाळीस दिवसापर्यंन्त जपाव्यात. जप करतेवेळी दीप सतत तेवत ( पेटत ) ठेवावा . हे अनुष्ठान दुःख दारिद्रयांच्या विनाशासाठी करतात.
६.
ॐ दुर्गे दुर्गे रक्षणि स्वाहा ।
दुर्गादेवीचा हा सिद्धीदायक दशाक्षरी मंत्र आहे. पाच लक्ष जपाने याचे अनुष्ठान होते. याचे ध्यान खालीलप्रमाणे आहे.
कालाभ्रामां कटाक्षैररिकुलभयदां मौलिबद्धेन्दुरेखां
शंख चक्रं कृपाणं त्रिशिखमपि करैरुद्धहन्तीं त्रिनेत्राम् ।
सिंहस्कन्धाधिरुढां त्रिभुवनमखिलं तेजसा पूरयन्तीं
ध्यायेद्दुर्गा जयाख्यां त्रिदशपरिवृतां सेवितां सिद्धिकामः ॥
७.
र्हीं नमो भगवति माहेश्वरि अन्नपूर्णे स्वाहा ।
ही भगवती अन्नपूर्णेचा सप्तदशकाक्षरी मंत्र आहे. सोळा हजार जपाने याचे अनुष्ठान पूर्ण होते. जपानंतर घृतयुक्त अन्नाने दशांश हवन करावे . ध्यान पुढील प्रमाणे आहे.
रक्तां विचित्रवसनां नवचन्द्र्चूडाम्-
अन्नप्रदाननिरतां स्तनभारनम्राम् ।
नृत्यन्तमिन्दुशकलाभरणं विलोक्य
ह्रुष्टां भजे भगवतीं भवदुःख हन्त्रीम् ॥