मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
उठि उठि दत्तात्रेया । करु...

भूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठि उठि दत्तात्रेया । करु...

देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.


उठि उठि दत्तात्रेया । करुणासिंधु कृपालया ।

उठवि माता अनसूया । प्रेमें टाळ्या पिटूनियां ॥ध्रु०॥

सप्‍तपंचम अरुणोदय । जाला स्नानाचा समय ।

भानुप्रकाश होऊं पाहे । रविरश्‍मि दाटल्या ॥१॥

उठले साधकांचे वृन्द । करिति तव नामाचा छंद ।

हृदयीं ध्याती ब्रह्मानंद । प्रेमभावें करुनी ॥२॥

व्यास वाल्मिकि नारदमुनि । आदि करोनि सर्व मुनी ।

उभे राहिले आंगणीं । दर्शनासीं पातले ॥३॥

गंगा यमुना सरस्वती । तुंगभद्रा भागीरथी ।

मणिकर्णिका भीमरथी । स्नान घालूं पातल्या ॥४॥

इंद्रचंद्रादि सुरगण । आले दर्शनालागून।

करिती स्तोत्र अनुवादन । कीर्ति तुझिया नामाची ॥५॥

ऐकुनि मातेची करुणा । उठला साधकांचा राणा ।

निरंजनाचिये मना । प्रेमानंद दाटला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP