दत्तदिगंबरा, ऊठ करुणाकरा । पहाट झाली पुरे झोंप आतां ।
भक्तजन हे उभे वाट पाहती सभे । दर्शनें देई त्यां शीघ्र शांता ॥ध्रु०॥
अरुण तम दूर करी कुंकुमें नभ भरी । बापडी ही उषा पदर पसरी ।
गंग खळखळ करीं त्वद्यशें जगभरी । मंद वाहे कशी अनिललहरी ॥दत्त०१॥
वनगंधर्व हे सुस्वरें गाइती । मोर केकारवें नृत्य करिती ।
मुनिकुलें गर्जती वेदमंथगिरा । ऊठ बा श्रीधरा राधु पठती ॥दत्त०२॥
षट्पदें पद्मदलीं गुंजती प्रियकरा । भेटती ही मुद्रा चक्रपिल्ली ।
रंग कष्टी उभा पाहूं दे मुखप्रभा । लोळूं दे सतत बा चरणकमळीं ॥दत्त०३॥