भूपाळी श्रीदत्तप्रभूची - पाहें पाहें सद्‌गुरुमूर्त...

देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.


भूपाळी श्रीदत्तप्रभूची

पाहें पाहें सद्‌गुरुमूर्ती । त्रिगुणात्मका त्रैमूर्ती ।

परमात्मया त्रैमूर्ती ।

विश्वजीवना अनादिमूर्ती । कृपादृष्टीनें पहावें ॥ध्रु०॥

श्रीगणपति शिव विश्‍वेश्वर । चिदंबरेश्वर परमेश्वर ।

चिदंबरेश्वर परमेश्वर ।

श्रीअविमुक्‍तेश्वर कोटेश्वर । संगमेश्वर योगिनी निष्ठती ॥पाहें॥१॥

श्रीअमरेश्वर शक्‍तीश्वर । प्रयागेश्वर वरदेश्वर ।प्रया०।

श्रीसिद्धेश्वर कामेश्वर । शिवपंचायतन विराजे ॥पाहें॥२॥

श्रीपापविमोचनेश्वर । शुक्‍लेश्वर नंदिकेश्वर ।शुक्ले०।

द्विशक्‍ती पन्नग मारुती । चक्र आदिमाया श्रीजाह्नवी ॥पाहें॥३॥

महाकाळेश्वर सर्वेश्वर । अन्नपूर्णा सुरतरुवर ।अन्नपू०।

श्रीरामचंद्र योगेश्वर । रामेश्वर श्रीकमला ॥पाहें॥४॥

श्रीनारायणस्वामी यतीश्वर । गोपाळस्वामी अखिलेश्वर ।गोपा०।

कृष्णानंद यतिपति खगेश्वर । लक्ष्मीनारायण सहित ॥पाहें॥५॥

श्रीविठ्ठराई रुक्मिणी । हरिहरब्रह्मेश्वर सगुणी ।हरिहर०।

वसे मृत्युंजय सुरादि शशीतरणी । भूत्रिभूवनीं अनुपम्य ॥पाहें॥६॥

श्रीब्रह्मदेव माधवेश्वर । विश्‍वंभरेश्वर सर्वभूतेश्वर ।विश्‍वं०।

श्रीउमामहेश्वर स्वामीकार्तिकेश्वर । काळभैरव क्षेत्रपाळ ॥पाहें॥७॥

श्रीकृष्णानदी संगमीं । कामधेनु सिद्धवरदभूमि ।काम०।

वसतीस्वामी कल्पद्रुमीं । प्रबलाश्रय तो अखिलांचा ॥पाहे॥८॥

सुरेंद्रादि निर्जर प्रीती । ऋषि योगी मुनिजन तप तपती ।ऋषि०।

श्रीप्रभु देती चतुर्विध मुक्‍ती । आरती करितां गुरुभक्त ॥पाहें॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:28:47.7870000