भूपाळी ( श्रीकृष्णाची ) - ऊठ गोपाळजी ! जाय धेनूंकडे...
सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.
Poems that can be sung early morning while completing your daily activities. They will make your rememebr God.
देवी देवतांची स्तुती करताना
ऊठ गोपाळजी ! जाय धेनूंकडे । पाहती सौंगडे वाट तूझी ॥ध्रु०॥
लोपली हे निशी मंद झाला शशी । मुनिजन मानसीं ध्याति तुजला ॥१॥
भानु उदयाचळीं तेज पुंजाळलें । विकसती कमळें जळामाजीं ॥२॥
धेनुवत्सें त्ला बाहती माधवा । ऊठ गा यादवा ! उशिर झाला ॥३॥
ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा । दाविं मुखचंद्रमा सकळिकांसी ॥४॥
कनकपात्रांतरीं दिव्यरत्नें बरीं । ओवाळिती सुंदरी तूजलागीं ॥५॥
जन्मजन्मांतरीं दास होऊं हरी । बोलती वैखरी भक्त तूझे ॥६॥
कृष्णकेशव करीं चरणांबुज धरीं । ऊठ गा श्रीहरी मायबापा ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : March 18, 2017
TOP