एकवीरा देवीची आरती - येई हो एकवीरा देवी माझे म...
एकवीरा देवीची आरती
येई हो एकवीरा देवी माझे माऊली ये ।
माझे माऊली ये ॥
दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।
कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥
पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥
व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥
एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥
एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ।
येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥
N/A
N/A
Last Updated : August 30, 2012

TOP