देवीची आरती - जगतारिणी दु : खहारिण...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.
जगतारिणी दु:खहारिणीं कुळस्वामिणी माते ।
नाना विघ्ने वेष्ठुनी कष्टविती माते ॥
करुणा करिं शांकरि तूं अनाथ जगनाथे ।
भवभय सर्वहि हरिसी हें तों तव नाते ॥ १ ॥
जय अंबे जगदंबे जय जय महाकाली ।
आरती ओंवाळूं पंचारति ओंवाळूं वंदू पद भाळी ॥ धृ. ॥
बौद्धरूप दैवत या कलिमाजी आले ।
न मिळे फल मनवांच्छित शंकित मन झालें ॥
तूं एक जागृत ऎकुनि माझें धाले ।
जडले दृढ मम मानस निश्चळ नाहालें ॥ जय. ॥ २ ॥
तव गुणप्रताप अद्भुत ऎकुनिया कानी ।
ध्यानी मनि दिनरजनि स्तवितो निर्वाणी ॥
लज्जा राखीं माते हे शुभकल्याणी ।
कृपाकटाक्षें लक्षीं रक्षी तव चरणी ॥ जय. ॥ ३ ॥
निर्जर मुनिवर सर्वहि तुजलागी ध्याती ।
केली त्यां कैवारें दैत्यावर ख्याती ॥
मर्दुनि शुंभनिशुंभा महिषासुरजाती ।
सप्तशतीचा महिमा मृकडुसुत गाती ॥ जय. ॥ ४ ॥
जिवजंतुमनकिंतू जाणसि सर्वांचा ।
अंतरसाक्षी हेतू कां न कळे अमुचा ॥
संचितक्रियमाणा जरि मानूं मुळसंचा ।
तरि मग काय परक्रम वदला मुनि त्याचा ॥ जय. ॥ ५ ॥
विज्ञप्ती श्रुत व्हावी सादर सुख शाली ।
बद्धांजुळि विनवीतों विनतीच्या चाली ॥
सुंदरपदपंकजींरखमा मिठी भाली ।
षट्पदवत गुंजारव करितो भोंताली ॥ जय. ॥ ६ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP