मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
सौम्यशब्दे उदोकारे व...

देवीची आरती - सौम्यशब्दे उदोकारे व...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.

सौम्यशब्दे उदोकारे वाचे उच्चारा ।
भावें भक्त विनवी शांति चाल मंदिरा ॥ धृ. ॥
नवखणांचा पलंग शांते शोभतो बरा ।
सुमनांचे परिवारी शांते शयन करा ॥ १ ॥
अष्टहि भोग भोगुनी शांता पहुडली शेजे ।
भक्तजनांची आज्ञा जाहली चलावें सहजें ॥ २ ॥
मानस सुखी दशमस्थाने निद्रा हो केली ।
रामदास म्हणे शांता ध्यानीं राहिली ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP