देवीची आरती - ॐ नमो आद्यरूपें । दे...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.
ॐ नमो आद्यरूपें । देवी भगवती माते ॥
काळिका कामरूप । शक्ति तूं जगन्माते ॥
वैष्णवी भूतमाया। मूळपीठ देवते ॥
झालीया भेटी तुझी । नीवारसी पापातें ।। १ ॥
जय श्रीकुळदेवते । महालक्ष्मी ग माते ॥
आरती घेऊनिया । ओंवाळीन मी तूतें ॥ धृ. ॥
अंबिका भद्रकाली । देवी आद्या कुमारी ॥
मारिले चंडमुंड । महिषासुर हे वैरी ॥
हर्षले देवद्विज । गाती जयजयकारी ॥
उजळुनी दीपमाळा ॥ ओंवाळीती नरनारी ॥ जय. ॥ २ ॥
परिधान हेमवर्ण । कंठी नवरत्नें हार ॥
करतळे रातोत्फळे । अद्भूत जयजयकार ॥
अवतार कोल्हापुरी केला । प्रताप थोर ॥
मारिले दैत्य बिकट । अघट कोल्हापूरे ॥ जय. ॥ ३ ॥
नासिकी मुक्ताफळ । रत्नकुंडले श्रवणी ॥
घवघवीत नुपुरे हो अंदु वाजती चरणी मस्तकी पुष्पहार ॥
दिसे भासे वदनी । पौर्णिमाचंद्रबिंब ॥
पृष्ठीवरी रूळे वेणी ॥ जय. ॥ ४ ॥
नवकोटी कात्यायनी । चतु:षष्ठी योगीनी ॥
भूचरां जळचरां । आई तुजपासुनी ॥
ऎसी तूं महालक्ष्मी । जगत्रयाची जननी ॥
नामया विष्णुदासा । तुझे चिंतनध्यानी ॥ जय. ॥ ५ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP