देवीची आरती - आरती त्रिजगदंबिकेची ...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.
आरती त्रिजगदंबिकेची ।
निरुपमानंदांबिकेची ॥ धृ. ॥
दिव्यांबरा इंद्रवदना ।
सुंदरकुंदरुचिररदना ॥
विद्युददंभभासमाना ।
त्रिनयना मूर्ति सुप्रसन्ना ॥ चाल ॥
मौक्तिकचंद्र कुंदधवला ।
कुंकुमतिलकलसदलकमुदललंबि ॥
नक्षत्रमाल्यमुक्ताफलभृततुलनासिका जईची ।
शोभना नाशिका जईची ॥ आरती. ॥ १ ॥
चूडामणि द्युमाणदीप्ती ।
करगतरत्नवलयपंक्ती ॥
सांगदभुजांचियकांती ।
वर्णितां चकित कविहि होती ॥ चाल ॥
विलसे नीलकुंतलालीं ।
श्रुतिपुटीं ललित कुंडलें कांची कटितटी ॥
वींटिकाढ्यमुखपुटी कुचतटी सुरुची ईश्वरीची ॥
सुकंचुकी सुरुची ईश्वराची ॥ आरती. ॥ २ ॥
मणिमयमंजीराभरणी ।
नखमणिचंद्रिकासुरणी ॥
शिवेच्या अंबुजाभरणी ।
नतिरति धरिति सुरासुरमुनी ॥ चाल ॥
विधिहरिहरप्रभृति गाती ।
सर्व सुर स्तविती जपति मनु ध्याति भक्ति ।
अतिसुमति सुकृत कवि वासुदेव करि सर्वमंगलेची ॥
सर्वदा सर्वमंगलेची ॥ आरती ॥ १ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP