मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
उदधीलहरीसि तरंगे । ...

देवीची आरती - उदधीलहरीसि तरंगे । ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.

उदधीलहरीसि तरंगे ।
दिससी जगभाचतरंगे ॥
स्वरूपी तूंची अहंकृतसंगे जय जय भवभंगे दुर्गे ॥ १ ॥
दुर्गे अघसंकट दुर्गे ।
हरिगे कुळस्वामिणि दुर्गे ॥
कधि मज पावसि मानसरंगे जय जय भवभंगे दुर्गे ॥ धृ. ॥
करिसी ब्रह्मांड नि:संगे ।
करुणा न करिसी तूं अंगे ॥
त्रिगुणी गुणसाम्यलिलारस अंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥दुर्गे ॥ २ ॥
करिसी उत्पत्तिस्थितिभंगे ।
दुर्गे लय हा सत्य विसंगे ॥
तुझिया आनंदपदाब्जसुरंगे जय जय भवभंगे दुर्गे ॥ दुर्गे. ॥ ३ ॥
ब्रह्मी ब्रह्मार्पण पिंगे ।
फुगडी घालिसी सत्संगे ॥
वंदी हनुमंत पदाब्जसुरंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दुर्गे. ॥ ४ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP