मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
स्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क...

देवीची आरती - स्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.

स्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क्रीडनकामें ।
धरुनी सगुणरूपा रचिली त्रयधामे ॥
विविधात्मे विरचुनिं त्वा भोगविं कृतकर्मे ।
निजरुपकरिसी दावुनि पुनरपि निजवर्मे ॥ जय. ॥ १ ॥
जय जय परमानंदे महामाये शांते ।
पंचारति ओवाळूं तव पदिं कुळनाथे ॥ धृ. ॥
त्या तव निजरूपातें शोधित घटमठ हा ।
चारि सहा दश द्वादश षोडश द्विदला हा ॥
पाहतां सदये गुरुरूप भासविले जेव्हां ।
निजरुपपंथ केला सुगमागम तेव्हां ॥ जय. ॥ २ ॥
तो तूं भार्गवराम द्विजकुळगुरु त्राता ।
दशशतदळ केळोसी सुखधामी नेता ॥
जेथे शांतादुर्गा अद्वय हे माता ।
पाहुनि सन्मय तल्लिन हरली भवचिंता ॥ जय. ॥ ३ ॥
तापत्रयजाचणिनें तापलि तनु पूर्ती ।
तेव्हां स्वियकरुणें मनि प्रगटलि हे मूर्ती ॥
कुरवाळुनि आश्वासी दानी मनतृप्ति ।
मंगेशात्मज तल्लिन तत्पदिं समचित्ती ॥ जय. ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP