भावगीते - फुलराणी

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


इन्द्रधनुचे, सप्त रंग, आकाशीं, श्रावण मासीं ।
फाल्गुन असतां, भूवरि उतरे, किमया झाली कैसी ? ।
पर्जन्याचे तुषार, किरणे मावळतीची तेथें ।
अंगणी माझ्या, रुप छोटुले घेवुनि आले येथें ।
लता, तरु वाटिका, बहरती जेथें माया-पाश ।
गोंजारुनिया हात फिरे जो, प्रेमाचा सहवास ।
फूलपाखरे, मधू-मक्षिका आकर्षित कां होती ?
येथ पोषिला पुंज गुणांचा, फलित येत मम हातीं ।
सहस्त्र रंगी फुले बहरती, डोलति नयनां पुढती ।
मम हस्ताचा, मम प्रेमाचा ठेवा, घे घे म्हणती ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP