प्रेमगीते - आवाहन

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


देखिलास का, `कायापालट,' या जगतांचां युवा ।
याच क्षणाला, तुझ्या हातुनीं साक्षात्कार हवा ॥
हिमालय पंगू उल्लंघितो ॥
चक्षु ना, तरिही अभ्यासितो ।
बधिर श्रुति, ज्ञान-दान ऐकितो ।
नवा मनू, नव क्षितिज उजळले, स्वागतास तू हवा । धृ ।
फूल उमललें, निवडुंगाला ।
नलिकेमाजीं, जीव जन्मला ।
बिजावीण, फल - वृक्ष फुलविला ।
ज्ञान साधना तुलाच, किमया, हाति गवसली युवा ॥ धृ ॥
क्ष - किरणांनी, दु:ख निवारण ।
बिजलीसंगें रोग विदारण ।
होत अवयवीं, नूतन तारण ।
ग्रह - गोलक जिंकायां ठाके, शास्त्रज्ञांचा थवा ॥ ध्रृ ॥
नव आवाहन, पद - दलितांना ।
जगतांमध्यें, उच्च-नीच ना ।
जीव समर्पित, ज्ञान-साधना ।
नवा रंग, नव विश्वरुप हे, भविष्य या मानवां ॥ ध्रृ ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP