लावणी - सवाल - जबाब

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


१) बारा महिने, हिरवा शालु, गजशुंडासम उभी सदा ।
जन्म देवुनीं, शत-बालक-गण, आयु संपवीं, भूमिपदा ।
उत्तर : शत बालक कण, जन्मांघालुनि, आयुभुमिवरि संपविशीं ।
केळीचा घड, उतरायासीं, एक घाव तो बुंध्यासीं ॥
२) उभी राहुनी, अंगणांत तू, तेज संस्कृताचें पसरी ।
कृष्णवर्ण, तरी आवड सर्वा, नमस्कार पाहतां करीं ।
उत्तर : वृंदावनी तू, सदा उभी गे, पूजा करितीं तव, जनता ।
रोप तुलसीचे, संस्कृती राखी, सान-थ्रोर नमवी माथा ।
३) लाल, गुलाबी रत्नांनी, हारींनें गडवा भरला ।
मुखीं ठेवितां, अमृतधारा, रत्ने ना ती शोभेला ।
उत्तर : लाल, गुलाबी, चवड देखतां, एक पाकळी उलगडुनी ।
रत्न-राशिचें अनार हातीं, मुखीं मधुररस चाखोनीं ।
४) जल अमृतमय, खाद्यहि जवळीं, स्पर्धा आकाशांशी तुला
नामहि शुभ तुज, तुझी संगती, सदा येत शुभकार्याला ।
उत्तर : उदरीं जल, अन्‍ गोडखोबरे, सकल वृक्ष, तुज पुढती खुजे ।
श्रीफल संगती, शुभकार्यासीं, मंदिरांत महती गाजे ।

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP