प्रेमगीते - आवाहन

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


कशास, स्मरशीं जुने युवा रे, चाल पुढे, थांबवू नको ।
चाल थांबता होशी पुराणा, तरुणपणा घालऊ नको ।
किती पाहिली वरुषे, यावर जुनेपणाची जाण नको ।
कितीक स्वप्ने पहावयाची ध्यास तयाचा सोडू, नको ॥
अंतरीची ती ओढ, तुझे ठेवील तरुणपण अखंड रे ? ।
अखेर झाली स्वप्नांची, मग जगण्यासाठीं काय उरे ? ॥
हास्य मुखावई, मोद अंतरीं, जरीं चालशी वेगानें ।
कितीक देतील साथ, आणखी किती भेटतिल प्रेमानें ॥
वहिवाटीची वाट सोडूनी, मार्ग नवा, मनुजास हवा ।
जुनाट पथ तो, पुराण पुरुषां, नवा मनु, तुज मार्ग नवा ॥
दिसेल मस्तक किंचित्‍ करडे, असेल ती, सुरकुती मुखां ।
दिसेल, झालें बाह्य पुराणें, उमेद अंतरिची देखा ॥
मोजायाला काहिं न उरले, दुनियेमाजी, कोणाला ।
तोच मोजितो वर्षे अपुली, युवा, हाच रे धडा तुला ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP