भावगीते - इशारा

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


आंगोपांगी चंपकाचा, रंग तोही केतकीचा ।
नको सहवास तेथें, मत्सराच्या भुजंगाचा ॥
केशकलाप काजळी, शिरांवरीं शोभीवंत ।
गळा कोणाचा कधींही, नको गुंतवू गे त्यांत ॥
धनुकली, भृकुटींच्या, आणि तेजाळ नयन ।
विध्द कोणां करु नको, शरसंधान साधून ॥
पोवळ्यांचे ओष्ठांतून, बोल-नव्हे, ते संगीत ।
रक्त-रंजीत शब्दांनी, घाव जिव्हारीं नकोत ॥
वदनांत चमकते, माला शुभ्र मौक्तीकांची ।
तयांतुनी ओघळावी, ओळ गोड अक्षरांची ॥
करपाश, कमनीय, करकमलेही लाल ।
नखाग्रांनी सहचरां, नको करुं गे घायाळ ॥
पदन्यास पाउलांचा, चालताना घेई ताल ।
नको कोणांला लाथाडू, तुझे सांभाळ पाऊलं ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP