भावगीते - पारख

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


वसे अंगीं गुण, तरी कां, तोच बाधावा आम्हां ?
चाहता मी, सद्गुणांचा, बोल मग हा कासया ? ॥
पंजरीं बैसूनियां शुक, झुरतसे बा प्रतिदिनीं ।
कासयां सौंदर्य दिधले, बोल ये, वदनातुनी ?
बोल बोलें बोबडे, रिझवी आम्हां, बुल‍बुल्‍ पहा ।
दुष्ट मानव पंजरीं त्यां बसवितो, निष्ठूर हा ॥
सजविली काया मयूरा झळकतीं जणु माणिके ।
तीच घ्यायां, व्याध धावे, व्यर्थ तू, प्राणां मुके ॥
माधुरी कंठीं वसेना, कोठचीं सौंदर्यतां ?
काक तो जगतीं सुखें या, वावरे नय हा असां ॥
काल हा फिरला असा कां ? भृंग भेदीं मेरुला ।
सद्गुणी दु:खे पिडावा, न्याय कैसा कोठला ?
सद्गुणांचे जगति या, साफल्य होते, धर्म हा ।
मग का बुरें तुज साहतो ? अन्याय होई रे पहा ॥
मोल ते नुरले गुणांना फोल जगतीं राहणे ।
आंस मनिचीं व्यर्थ ठरली, व्यर्थ वाटे हे जिणे ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP