मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय १२ वा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय १२ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय १२ वा Translation - भाषांतर ५९मरणासी सिद्ध होऊनियां वृत्र । जैं मधुकैटभ तैसा धांवे ॥१॥शूलमुक्त कर छेदिला इंद्रानें । ताडिलें वृत्रानें अन्य करें ॥२॥वज्र तदा खालीं पडलें इंद्राचें । खेद तैं देवांतें होई बहु ॥३॥सलज्ज तैं इंद्र उचलीत वज्र । स्फूर्ति तदा वृत्र देई तया ॥४॥खेदाची न वेळ म्हणे हे देवेंद्रा । घेऊनियां वज्रा शत्रु वधीं ॥५॥जयापजयासी ईश्वर कारण । बाहुलींचि जाण सकळ जीव ॥६॥समत्व राखूनि कर्तव्य करावें । द्यूतचि जाणावें युद्ध इंद्रा ॥७॥जयापजयाचा भरंवसा मनीं । धरुं नये कोणी युद्धामाजी ॥८॥वासुदेव म्हणे वचन वृत्राचें । ऐकूनि इंद्रातें नवल वाटे ॥९॥६०इंद्र अभिनंदूनि वृत्रा । उचली आनंदानें वज्रा ॥१॥म्हणे उदार दानवा । धन्य चिंतीसी केशवा ॥२॥असूनियां तूं असुर । करिसी साधूंचा आचार ॥३॥परिघ फेंकिला तों वृत्रें । करहीन केला इंद्रें ॥४॥छिन्नपक्ष पक्षी वृत्र । करी विशाल स्वमुख ॥५॥ऐरावतासवें इंद्र । गिळिला, जाहलें नवल ॥६॥कवचरक्षित इंद्रानें । उदर विदारिलें यत्नें ॥७॥येऊनियां बाह्य भागीं । यत्नें कंठ त्याचा छेदी ॥८॥संवत्सर एक वज्र । फिरवी मानेवरी इंद्र ॥९॥अंतीं होई ग्रीवाभेद । पुष्पें वर्षिती विबुध ॥१०॥वृत्रमुखांतील ज्योति । शिरे ईश्वरस्वरुपीं ॥११॥वासुदेव म्हणे स्तुति । सकळ करिती इंद्राची ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP