स्कंध ६ वा - अध्याय १० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५४
विष्णुआज्ञेनें मुनींसी । देव मागती देहासी ॥१॥
मुनि बोलती देवांना । कठिण मृत्यूच्या यातना ॥२॥
जरी विष्णूही मागतां । लोभ न सुटे देहाचा ॥३॥
देव बोलले मुनींसी । मुने, स्वार्थ न तुम्हांसी ॥४॥
दयावंत उदारातें । अदेय न कांहीं वाटे ॥५॥
ऐकूनियां देववाणी । मुनि बोलले तोषूनि ॥६॥
दिला नकार प्रथम । हेतु ऐकावा सद्भर्म ॥७॥
देह नश्वर हा जरी । लोककार्यी पडे तरी ॥८॥
हर्ष होई न कोणातें । धर्मकीर्तिही ज्या मार्गे ॥९॥
वासुदेव म्हणे ज्ञाता । न धरी देहाचा भरंवसा ॥१०॥

५५
अशाश्वत देहें शाश्वत धर्माची । जाणूनियां संधि मुनिश्रेष्ठ ॥१॥
समाधि लावूनि कोंडी निज प्राण । ब्रह्मांडीं नेऊन स्थिर करी ॥२॥
गळालें कवच देहाचें कदा तें । कळलें नाहीं तें पुण्य़वंता ॥३॥
विश्वकर्म्यानें त्या घेऊनियां अस्थि । निर्मिलें वज्रासी कौशल्यानें ॥४॥
घेऊनि तें इंद्र शोभे ऐरावतीं । नर्मदातीरासी युद्ध झालें ॥५॥
त्रेतायुगारंभी जाहलें हें युद्ध । सकल देव-दैत्य लढती शौर्ये ॥६॥
पराकाष्ठा करी वृत्र, सामर्थ्याची । पळूनियां जाती परी दैत्य ॥७॥
वृत्र तदा दैत्यां बोलला स्फूर्तिनें । अमर देहातें समजूं नका ॥८॥
योगाभ्यासें एक त्यागावा हा देह । अथवा रणांत पराक्रमें ॥९॥
वासुदेव म्हणे वृत्राची हे उक्ति । मरुनीही कीर्ति संपादा ती ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP