मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय ११ वा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय ११ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय ११ वा Translation - भाषांतर ५६पलायन दैत्य करिती तयांचा । पाठलाग साचा करिती देव ॥१॥तदा क्रोधें वृत्र बोलला देवांसी । पळती तयांसी वधितां काय ॥२॥माताउदरस्थ मळाचे हे गोळे । वधूनि साधिलें काय तयां ॥३॥बोलतां तो गदा फेंकी वेगें इंद्र । झेली बळें वृत्र वामकरें ॥४॥फोडूनि आरोळी ऐरावतावरी । गदा तीच मारी वृत्रासुर ॥५॥सप्त धनु मागें होऊनि तैं गज । ओकूं लागे रक्त भळभळां ॥६॥खिन्न इंद्राप्रति ताडी न असुर । फिरवी अमृतकर इंद्र तदा ॥७॥युद्धार्थ तैं सज्ज होई ऐरावत । इंद्रासी हांसत वदला वृत्र ॥८॥वासुदेव म्हणे व्यवहार घोर । अनिच्छेनें थोर घडती पापें ॥९॥५७वृत्र म्हणे इंद्रा, हे गुरुघातक्या । घेईन मी आतां प्राण तुझा ॥१॥विश्वरुप माझा बंधु श्रेष्ठ ज्ञाता । इंद्रा, कवचदाता तुजा गुरु ॥२॥होऊनि निर्लज्ज वधिलेंसी तया । त्रिभुवनीं ऐसा नीच कोण ॥३॥अशुद्धासी ऐशा शिवेल न अग्नि । खातील तोडूनि गृध्रें तुज ॥४॥सहाय्यक तेही कापीन मी सर्व । संतुष्ट भैरव होवो तेणें ॥५॥कदाचित मम प्राण जरी जाई । कृतार्थता येई तरी मज ॥६॥गदा जरी व्यर्थ गेली तरी वज्र । त्वत्कार्य साधील विष्णुतेजें ॥७॥दधीचीचें तप येईल फळासी । मोक्षचि मजसी जाण तेणें ॥८॥वासुदेव म्हणे ईश्वरप्रार्थना । करी दैत्यराणा तयावेळीं ॥९॥५८भगवंता, तव दासाचा मी दास । घडो सेवा हेंच इच्छीतसें ॥१॥चिंतन-स्मरण घडो अहर्निश । इच्छितों मी हेंच कृपासिंधो ॥२॥नको भूमि, राज्य, स्वर्ग वा मोक्षही । समागम देईं नित्य तुझा ॥३॥पक्षहीन पक्षी जेंवी पक्षिणीतें । बालक मातेतें क्षुधित जेंवी ॥४॥पतिव्रता परग्रामस्थ पतीची । प्रतीक्षा कीं जैसी करी नित्य ॥५॥भक्तवत्सला, मी तैसाचि उत्सुक । झालों दर्शनार्थ चरण दावीं ॥६॥वासुदेव म्हणे असुरही ऐसा । ईश्वरभेटीचा ध्यास घेई ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP