भाद्रपद शुद्ध १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


बटु वामनाचा अवतार !

भाद्रपद शु. १२ या दिवशीं दशावतारांतील पांचवा जो वामन याचा अवतार प्रगट झाला. शतपथ ब्राह्मणांत या घडामोडीचें ऐतिहासिक स्वरुप दिले आहे. देव आणि दैत्य यांच्या युद्धांत देवांचा पाडाव झाला. तेव्हां देवाच्या वतींनें विष्णूनें ‘वामन’ रुप धारन करुन असुरापाशीं थोडी जमीन मागितली. तत्कालीन बळिराजा सत्वशील असल्यामुळें त्यानें देवांना आपल्या राज्यांत आसरा दिला. पुढें विष्णूनें विराट रुप धारण करुन सर्व विश्व व्यापून टाकिलें तेव्हां सारा देशच देवांच्या ताब्यांत आला. विष्णूच्या या पराक्रमाचें गायन ऋग्वेदानें अभिमानपूर्वक केलें आहे. कालेंकरुन विष्णु म्हणजे सूर्य आणि त्रिपाद म्हणजे उदय, मध्य व अस्त असा अर्थ होऊन विश्वांतील सर्व भुवनें विष्णूच्या-सूर्याच्या ‘तीन पावलां’तच मावतात अशी कल्पना रुढ झाली. पौराणिक कथेचे बीज ऋग्वेदांतील विष्णूच्या वर्णनांत सांपडतें : "विष्णु म्हणजे सूर्यरुपी देवताच. तो जेव्हां उगवतो तेव्हां त्याचें पहिलें पाऊल पडलें असें समजावयाचें; तसेंच तो मध्याह्मीं आकाशमंडळाच्या मध्यभागीं येतो तेव्हां त्याचें दुसरें पाऊल पडतें व तो संध्याकाळीं मावळतो तेव्हां त्याचें तिसरें पाऊल पडतें असे समजावें. नित्य सूर्य मध्यान्हसमयीं आकाशशिखरावर चढतो त्यालाच विद्वजन विष्णूचें परमपद (तद्विष्णो: परमं पदम्‍) म्हणतात." प्रसिद्ध सायणाचार्य पहिलें पद पृथ्वी, दुसरें अद अंतरिक्ष व तिसरें पद द्युलोक असें मानतात. वामनाने बळिराजाला सुतल नांवाच्या पाताळाचें राज्य दिलेंअ. यांतहि सांस्कृतिक पराक्रमाचा इतिहास आहे. अमेरिकेंतील पश्चिम किनार्‍याला आपल्या पुराणग्रंथांतून पाताळ असें नांव आहे. तेव्हां त्या ‘पाताळां’ त बळिराजानें भारतीय संस्कृतीचा विकास केला असावा. मध्य अमेरिका, मेक्सिको व पेरु हीं संस्कृतीचीं मोठीं केद्रें होतीं. अमेरिकेचा ‘शोध’ लावण्याचें श्रेय भारतीयांचे आहे. इंद्र आणि गणेश हीं दैवतें आणि अनेक भारतीय चालीरिती अमेरिकेंत होत्या. त्यांचे पुरावे संशोधनखात्यानें दिले आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP