भाद्रपद शुद्ध २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
चक्रधर-कृष्ण यांचा जन्म !
शके ११४३ च्या भाद्रपद शु. २ या दिवशीं महानुभाव पंथाचे आद्य संस्थापक श्री. चक्रधर कृष्ण यांचा जन्म झाला. अनहिलवाड (पट्टण) चा राजा भोला भीमदेव यांच्याच कारकीर्दीत भडोच येथें मल्लदेव नावांचा राजा राज्य करीत होता. त्यानें सिंधुराजाचा भाऊ सिंह यास दत्तक घेतलें. हा सिंह सिंघणचा सेनापति खोलेश्वर याच्याकडून मारला गेला. हा सिंह लहान असतांच मल्लदेव वारला. मरते वेळीं राज्यसूत्रें आणि दत्तक पुत्र सिंह त्यानें प्रधान विशालदेवाच्या हांतीं सोंपविला होता. विशालदेव जातीनें सामवेदी लाड ब्राह्मण होता. यालाहि बराच काळपर्यंत पुत्र नव्हता. शके १९१६ मध्यें दत्तात्रेय प्रभूंच्या कृपेनें हरिपालदेव नांवाचा पुत्र याला झाला. हा मोठा पराक्रमी होता. वयाच्या बाविसाव्या वर्षी यानें यादवराजा सिंघणचा पराभव केला. त्यानंतर शके १९४१ मध्यें सिंघणानें अनहिलबाडवर स्वारी केली. याहि खेपेस हरिपालदेवानें युद्धांत भाग घेतला. त्यानंतर शके ११४३ वृषभनाम संवत्सर, भाद्रपद शुक्ल द्वितीया, शुक्रवार या दिवशीं हरिपालदेवाचें निधन झालें. त्याचें प्रेत स्मशानांत नेलें त्या वेळीं श्रीचांगदेव उर्फ श्रीचक्रपाणि (महानुभाव पंथाचे तिसरे अवतार) यांनी द्वारकेंत कामाख्या नामक हठयोगिनीच्या दुराग्रहामुळें देहत्याग केला; व हरिपालदेवाच्या मृत शरिरांत प्रवेश केला. त्याबरोबर हरिपालदेव जिवंत झाले. पुढें रामटेक येथें जाऊन रामाचें दर्शन घेऊन यावें असें यांच्या मनांत झाले. पुढें रामटेक येथें जाऊन रामाचें दर्शन घेऊन यावें असें यांच्या मनांत आलें. पण प्रधानजी बोलले - " तो देश पारिखा ! कैसा पाठवो ? भंवति राजक : सेजा जाधव राज्य करिती असती" पण हरिपालदेवांचा हट्ट पाहून त्यांच्या आईनें युक्ति सुचविली, " जेऊ राउतें पाइके जाती ऐसा सडाचि पाठवावा : कां दुधारी रजपुताचेया परि पाठवावा : अन्यत्र लोक जाती तेसने यापरी हाही जाइल." शेवटीं हरिपालदेव यात्रेस निघाले. वाटेंत बरोबरच्या लोकांची चुकामूक झाली. व हे रामटेकचा रस्ता चुकून वर्हांडातील ऋद्धिपूर येथें आल्यावर गोविंदप्रभूंच्याकडून यांनी ज्ञानशक्ति स्वीकारली. गोविंदप्रभूनींच यांचे नांव ‘चक्रधर’ असें ठेवलें.
- २० आँगस्ट १२२१
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP