भाद्रपद शुद्ध १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सदाशिवराबभाऊ यांचा जन्म !
शके १६५२ च्या भाद्रपद शु. १ या दिवशीं चिमाजीअप्पा यांचे पराक्रमी चिरंजीव सदाशिवरावभाऊ यांचा जन्म झाला. याच भाऊंनीं दिल्ली येथील मुसलमानी तख्तावर घण घालून इस्लामी आक्रमणास पायबंद घातला. आयुष्याच्या प्रारंभीच्या काळांत दक्षिणेकडील लढायांमधून यांनीं मोठाच पराक्रम केला. उदगीरच्या लढाईचें नेतृत्व यांचेकडेच होतें. नंतरच्या काळांत यांची उत्तरेकडील कामगिरी प्रसिद्ध आहे. अब्दालीनें शिंदे-होळकर यांचा पराभव केल्यानंतर यांची रवानगी दिल्लीकडे झाली. बर्हाणपूर, भोपाळ, सिरोज, ओर्च्छा, नरवर, ग्वालेर, अशा मार्गांनी यांनी गंभीर नदी ओलांडली. आग्र्याजवळ मराठे येतांच यमुना नदीच्या दुसर्या तीरावरहि अब्दालीची फौज खडी झाली. मुचुकुंद तीर्थावर मराठ्यांचे सैन्य जमलें, पण यमुनेस उतार नसल्यामुळें भाऊ दिल्लीकडे गेला. त्यानें दिल्ली घेतली. परंतु अब्दालीपुढें मराठ्यांचा निभाव लागनें कठीणच होतें. दोनहि सेना समोरासमोर होत्या, रोज चकमकी चालू झाल्या. बळ्वंतराव मेहेंदळे व गोविंदपंत बुंदेले पडल्यावर मराठ्यांची बाजू लंगडी झाली. अब्दालीस रसद मिळे; पण मराठी सेनेची अन्नावांचून दुर्दशा झाली. तेव्हां चांदी, सोनें सर्व आटवून बादशहाच्या शिक्याची नाणीं पाडलीं आणि दुसर्या बाजूस भाऊशाही, जनकोजीशाही व मल्हारशाही या अर्थाचा भा.ज.म. अशीं अक्षरें घालून वेळ निभावून नेली; पण शेवटी प्रसंग कठीण आला वाजतां युद्ध स्रुरु झालें. दुपारीं तीनच्या सुमारास विश्वासराव पडल्यावर पळापळ सुरु झाली. अब्दालीच्या ताजा दमाच्या तुकडीपुढें मराठ्यांचा निभाव लागणें शक्य नव्हतें. विश्वासराव पडल्यावर देहभान नाहीसें होऊन हे सैन्यांत शिरले; त्या दिवशीं यांचा पत्ताच नव्हता. " सदाशिवराव शरिरानें उंच व मजबूत दिसे. तालीम व नमस्कारांच्या अभ्यासानें त्यांचें शरीर घटलेंले होतें. त्याच्यासारखा हुशार, सावध व चतुर मुत्सद्दी पेशव्यांच्या कुळांत कोणी जन्मलाच नाहीं. तो जितका हुशार तितकाच चलाख, शूर व साहसी होता. शिपायाचें व कारकुनीचें अशीं दोनहि कसबें त्याला अवगत होतीं. -"
- ३ आँगस्ट १७३०
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP