मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक ७१ ते ७५ अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक ७१ ते ७५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ७१ ते ७५ Translation - भाषांतर दशन्तं तक्शकं पादे लेलिहानं विषाननैः । न द्रक्ष्यासि शरीरं च विश्वं च पृथगात्मनः ॥७१॥तेव्हां निर्विकल्पस्वरूपस्थित । तुज जालिया दृश्य समस्त । आठवेनाच बहिर्भूत । देहासहित कांहीं ही ॥८॥तक्षक येऊनियां आपण । विषाननें करूनि तीक्ष्ण । डसेलच धरणीं जर्हि जाण । कीं चाटील पूर्ण तव देहा ॥९॥तर्ही तूं तया तक्षकातें । अथवा आपल्या देहातें । किंवा संपूर्ण विश्वातें । आपणा वेगळें न पाहसी ॥८१०॥अवघा तूंचि तूं ओतप्रोत । परिपूर्ण अंतर्बाह्यातीत । तेथें कैंची दुर्मृत्युमात । आनंदभरित अक्षय तूं ॥११॥सर्पा आंगींची त्वचा जैसी । पडतां भंगतां जळतां त्यासी । नाठवेचि केवळ तैसी । काया आपैसी तुजलागीं ॥१२॥इतुका नृपातें निर्वाणबोध । श्रीशुकें केला परमशुद्ध । अभय दाविलें परमपद । देहादि विरुद्ध निरसूनी ॥१३॥यावरी शिष्याची कृतार्थता । परीक्षावया शुक तत्वता । जाला तयातें स्वयें पुसता । तें ही श्रोतां परिसावें ॥१४॥एतत्ते कतितं तात यथाऽऽत्मा पृष्टवान्नृप । हरेर्विश्वात्मनश्चेष्टां किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥७२॥शिष्यस्नेहें कळवळून । परीक्षितीतें शुक भगवान । म्हणे बापा नृपाळा प्रश्न । मज लागून त्वां केला ॥८१५॥विश्वाचा जो आत्मा हरि । त्याचें चरित्र सविस्तरीं । पुसता जालासि तूं ज्या परी । प्रेमा अंतरीं धरूनियां ॥१६॥तें हें कथिलें तुजकारणें । यावरी पुनः काय श्रवणें । ऐकों इच्छिसी निजमनें । तीं तों वचनें मज सांगें ॥१७॥इतुकें नृपातें पुसूनि शुक । तुष्णीम्भूत जाल सम्यक । येथ पंचमाध्याय निष्टंक । जाला अशेख समाप्त ॥१८॥या वरी श्रीशुकातें नृपती । पुसलियाचें उत्तर निगुती । कृतार्थपणें देत सुमती । तें शौनकाप्रति सूत कथी ॥१९॥एतन्निशम्य मुनिनाभिहितं परीक्षिद् व्यासात्मजेन निखिलात्मदशासमेन । तत्पादपद्ममुपसृत्य नतेन मूर्ध्ना बद्धञ्जलिस्तमिदमाह स विष्णुरातः ॥७३॥सूत म्हणे भो भो शौनकमुनी । ग्लौसमान तूं श्रोतृभगणीं । भगवद्गुणश्रवणगगनीं । प्रेमज्योत्स्नीं विराजसी ॥८२०॥तरी ऐकें पुढील अभिप्राय । जेंवि मात्रा देऊनि अनामय । वैद्यें पुसतां आनंदमय । सांगता होय विगतगत ॥२१॥तेंवि हें कथिलें व्यासात्मजें । निखिलात्मदृशें पुण्यपुञ्जें । महापुराण करुणावोजें । अभयकाजें भवहंतें ॥२२॥तेणें निर्भय जाला राव । ऐसा अंतरीं कळला भाव । तथापि पडताळावया अनुभव । शुकें सगौरव पदखळिलें ॥२३॥ऐकूनि परीक्षिति सद्भावें । माथा लपवूनि सप्रेमजवें । मग त्या नम्रशीर्षें देवें । तत्पदराजीवें स्पर्शिलीं ॥२४॥एवं चरण वंदूनि शिरीं । बद्धाज्जलि नम्रप्रकारीं । श्रीशुकाप्रति निजनिर्द्धारीं । वदला वैखरी विष्णुरात ॥८२५॥तें तयाचें प्रतिभाषण । जेंवि तृप्तोद्गार सुप्रसन्न । श्रोतीं परिसावें सावधान । निजसमाधान परिसतां ॥२६॥राजोवाच - सिद्धोऽस्म्यनुगृहीतोऽस्मि भवता करुणात्मना । श्रावितो यच्च मे साक्षादनादिनिधनोहरिः ॥७४॥नृप म्हणे भो सद्गुरुनाथा । परम सदया विपश्चिता । तव प्रसादें कृतकृत्यता । आत्मपूर्णता लाधलों ॥२७॥होतों देहात्मभावें गुणग्रस्त । तुवां करुणात्मनें अनुग्रहीत । जालों म्हणोनि कृतकृतार्थ । भवनिवृत स्वबोधें ॥२८॥कीं सकळ जीवांचें कारण । श्रीहरि जो अनादि निधन । मज ऐकविला संपूर्ण । प्राप्तिसाधन समवेत ॥२९॥हा तुमचे कृपेचा मंहिता । वर्णितां न लगे सहसा सीमा । कीं तुमच्या कृपेनें जीवां अधमां । सच्चिदात्मा अवगमे ॥८३०॥नात्यद्भुतमहं मन्ये महतामच्युतात्मनाम् । अज्ञेषु तापतप्तेषु भूतेषु यदनुग्रहः ॥७५॥परि अत्यद्भुत मी न मनीं । महंता अच्युतात्म्याची करणी । कीं अनुग्रह करणें अज्ञानजनीं । तापत्रयाग्निसंतप्तीं ॥३१॥म्हणाल कोण्या हेतुस्तव । तरि जे करुणेचेचि सावेव । आर्तिहरण सहजस्वभाव । ज्यांचा सदैव केवळ ॥३२॥सहज उगवूनियां तमारी । जगाचें अंधत्व जैसें वारी । प्रकाशें केवळ देखणें करी । स्वाधिकारीं प्रवर्तवी ॥३३॥कीं गंगा वाहोनि पवित्र जळीं । पाप ताप जगाचें समूळीं । निवारूनि पुण्यबहळीं । त्रिदशमेळीं वंद्य करी ॥३४॥हें नैसर्गिक सामर्थ्य याचें । तेंवि सहजशीळ महंतांचें । दुःखनिरसनें प्रबोधें साचें । भवभीतांचें आविद्यक ॥८३५॥अभीष्टोत्तरीं या अनुमोदून । शुकाचार्यातें नृप सज्ञान । पुन्हा दतनुग्रहलक्षण । कृतार्थपण स्वयें कथी ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP