मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक ५६ ते ६० अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक ५६ ते ६० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५६ ते ६० Translation - भाषांतर पुंसां कलिकृतान्दोषान्द्रव्यदेशात्मसंभवान् । सर्वान्हरति चितस्थो भगवान्पुरुषोत्तमः ॥५६॥जे द्रव्यदेशात्मसंभव । कलिकृत नरांचे दोष सर्व । तयांचे चित्तस्थ वासुदेव । सर्वथैव उपसंहारी ॥२१॥म्हणसी कैसेन हृदयीं स्थिर । होय परमात्मा रमाधर । कवण्या रीती दोष समग्र । नाशी प्रकार तो ऐका ॥२२॥श्रुतः सङ्कीर्तितोध्यातः पूजितश्चादृतोऽपि वा । नृणां धुनोति भगवान्हृत्स्थो जन्मायुताशुभम् ॥५७॥नानाचरितानुवादें करून । जरि वैष्णवां मुखें ऐकिला पूर्ण । कीं अद्भुतकर्मात्मक गाऊन । कीर्तिला आपण सद्भावें ॥२३॥अथवा बैसूनियां एकान्तीं । एकवटोनि मानसवृत्ती । ध्यायिला प्रेमें चिन्मयमूर्ती । कीं पूजिला प्रीती आदरिला ॥२४॥एवं कवण्या तर्ही प्रसंगें हरी । भरला केवळ अभ्यंतरीं । नरांचें बहु जन्मांचें हरी । अशुभ निर्द्धारीं भगवान् ॥७२५॥जेंवि सुवर्णाचिये ठायीं । अन्यधातुज दुर्वर्ण पाहें । त्यातें अग्नि स्वसंगें दाही । हीनत्व कांहीं उरों नेदी ॥२६॥तेंवि अंतर्गत रमानाथ । जन्मादिकारण जें कां दुरित । तें अविद्येसह नाशी त्वरित । शुद्ध शाश्वत करी स्वयें ॥२७॥विद्यातपः प्राणनिरोधमैत्र तीर्थाभिषेकव्रतदान जप्यैः । नात्यन्त शुन्द्धि लभतेऽन्तरात्मा यथा हृदिस्थे भगवत्यनन्ते ॥५८॥याहूनि आणिक साधनें । बहुधा दैवतोपासनें । तपःप्राणसंरोधनें । तीर्थस्नानें मैत्री ही ॥२८॥नानाव्रतें दानें जप । इत्यादि केले जर्ही साक्षेप । तथापिहि इहीं निष्कंप । शुद्धि अनल्प न लभे कीं ॥२९॥जैसी हृदयस्थ श्रीअनंत । तद्भा जडतां अंतरांत । आत्मशुद्धि लाभे यथार्थ । नर निश्चित अविलंबें ॥७३०॥तस्मात सर्वप्रकारें राया । मनोवृत्ति एकवटूनियां । केशवा धरीं माजि हृदया । न करीं वायां बहुचिन्ता ॥३१॥भ्रियमाणैरभिध्येयो भगवान्परमेश्वरः । आत्मभावं नयत्यङ्ग सर्वात्मा सर्वसंश्रयः ॥५९॥म्रियमाण जे मुमुक्षुगण । तिहीं ध्यायिजे श्रीभगवान । जेंवि अचिकित्स रोगा निदान । पीयूष पूर्ण निश्चयें ॥३२॥मग तो अंतरात्मा परमेश्वर । वास्तवात्मभावा प्रति स्वैर । नेत असे गा अति सत्वर । मोह समग्र नाशूनी ॥३३॥येथ न धरीं कांहींच संशय । न चले कळींत अन्योपाय । न फळे कांहीं ही साधनसोय । मोक्षकार्य साधावया ॥३४॥कलेर्द्दोषनिधे राजन्नस्ति ह्येको महागुणः । कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तबन्धः परं व्रजेत् ॥६०॥केवळ दोषनिधि नृपा हा कळी । तर्ही याचा गुण एक हा महद्बळी । कृष्णकीर्तनास्तवचि समूळीं । होय होळी दुरितांची ॥७३५॥भावें करितां कृष्णकीर्तन । सर्व बंधांहूनि मुक्त होऊन । परमपदाप्रति अभिन्न । जायिजे जाण निश्चयें ॥३६॥परमपद जें परब्रह्म । सच्चिदानंद पूर्णकाम । होय अभेदें तो निःसीम । कीर्तनप्रेम ज्या हृदयीं ॥३७॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP