मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७० वा| श्लोक ४१ ते ४७ अध्याय ७० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ७० वा - श्लोक ४१ ते ४७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४७ Translation - भाषांतर यक्षति त्वां मखेंद्रेण राजसूयेन पांडवः । पारमेष्ठ्यकामो नृपतिस्तद्भवाननुमोदताम् ॥४१॥ऋतूंमाजी श्रेष्ठतर । राजसूयनामा जो मखेन्द्र । तेणें तूतें कुन्तीकुमर । कुरुनृपवर यजितसे ॥४४०॥पारमेष्ठ्यपदाचा धरूनि काम । निष्ठापूर्वक यज्ञोत्तम । आदरिला हें जाणूनि वर्म । तुवां सप्रेम प्रशंसिजे ॥४१॥त्याचा वांछितमनोभाव । अनुमोदावा त्वां कुरुराव । इतुकेंचि म्हणसी कार्यगौरव । तरी सहेतु सर्व अवधारीं ॥४२॥बैसले ठायीं द्वारकेहून । करीन यज्ञप्रशंसन । धर्मा देईन अनुमोदन । तरी कार्य याहून आन ऐका ॥४३॥येथूनि न कीजे अनुमोदंन । इंद्रप्रस्थाप्रति कीजे गमन । तव गमनाचें प्रयोजन । त्रिजगदानंदनपर ऐकें ॥४४॥तस्मिन्देव ऋतुवरे भवंतं वै सुरादयः । दिदृक्षवः समेष्यंति राजानश्च यशस्विनः ॥४२॥तया मखेन्द्राच्या ठायीं । देखों इछिते तुज सर्वही । सुरवर मुनिवर नृपवर पाहीं । परमयशस्वी येतील ॥४४५॥देवा तुझिया दर्शनासाठीं । वांछा अमरादिकांच्या पोटीं । मम दर्शनाची किमर्थ गोठी । तरी जगजेठी अवधारीं ॥४६॥श्रवणात्कीर्तनाद्ध्यानात्पूयंतेऽन्तेऽवसायिनः । तव ब्रह्मयमस्येश किमुतेक्षाऽभिमर्शिनः ॥४३॥भो ईश्वरा ईश्वरपती । तूतें ऐकती गाती ध्याती । श्वपचादिकही ते उद्धरती । मां देखों इच्छिती ते किमुत ॥४७॥दर्शना स्पर्शनाचे अधिकारी । उद्धरती हे नवल ना थोरी । श्रवणा कीर्तना ध्यानावरी । पवित्र होती श्वपचादि ॥४८॥अनधिकारियां पावनकरण । मंगळायतन तुझे चरण । या वाक्याचें प्रतिपादन । करी तें वजन अवधारा ॥४९॥यस्यामलं दिवियशः प्रथितं रसायां भूमौ च ते भुवनमंगल दिग्वितानम् ।मंदाकिनीति दिवि भोगवतीति चाधो गंगेति चेह चरणांबु पुनाति विश्वम् ॥४४॥भो भो त्रिभुवनमंगळकरणा । तव यश पावनकर त्रिभुवना । मर्त्यामर्त्या पन्नगसदना । माजि विस्तीर्ण यशगरिमा ॥४५०॥ब्रह्मांडगर्भीं जीं दिग्भुवनें । तितुकीं छादिलीं यशोवितानें । तव यशाच्या विस्तीर्णवसनें । मंगळाभरणें विराजती ॥५१॥तैसेंचि तुझें चरणोदक । पवित्र विस्तीर्ण त्रिजगदात्मक । कैसे म्हणसी तरी सम्यक । कथितों ऐक कलुषारी ॥५२॥तव पदसलिलप्रवाहिनी । मंदाकिनी स्वर्ग पवनी । भोगवती ते पन्नगभुवनीं । पवित्रकिरणी विषायुधां ॥५३॥इहलोकीं ते भागीरथी । प्राणिनिचया पावनकर्त्री । त्रिपथगामिनी ऐसे म्हणती । विश्वसंसृति भंजक जे ॥५४॥तस्मात् तुझिया दर्शनासाठीं । सुर नर पन्नग सकाम पोटीं । तुज गेलिया यज्ञवाटी । कोट्यनुकोटी उद्धरती ॥४५५॥दर्शनें स्पर्शनें गुणकीर्तनें । श्रवणें ध्यानें यशश्चिन्तनें । पावन होती समस्त भुवनें । वर्तमानें भावीही ॥५६॥नारद इतुकें हरिसी वदला । पुढें कैसा प्रसंग झाला । तो तूं ऐकें कुरुनरपाळा । कथितों तुजला संक्षेपें ॥५७॥श्रीशुक उवाच - तत्र तेष्वात्मपक्षेष्वगृहीत्सु विजिगीषया । वाचः पेशैः स्मयन्भृत्यमुद्धवं प्राह केशवः ॥४५॥तिये सुधर्मा सभेआंत । यादववीर वीरश्रीमंत । कृष्णपक्षीय परमाद्भुत । प्रतापादित्य तेजस्वी ॥५८॥मेरुधैर्याचे प्रचंड । तैसे जयांचे दोर्दंड । स्फुरती समरार्थ अखंड । कृतातदंडपरिपाडें ॥५९॥धनुर्विद्येचे अवतार । तुम्बळ बळाचे सागर । कीं रौद्ररसाचे श्रृंगार । लेवूनि वरिले वीरश्रिया ॥४६०॥कोपें कृतान्ता मारिती थापे । प्रळयरुद्रातें पापिती दापें । आंगींच्या वीरश्रीप्रतापें । मानिती अल्पें त्रिभुवनें ॥६१॥आत्मपक्षीय हे समस्त । बैसले असतां सभेआंत । नृपाची ग्लानी वदला दूत । धर्मवृत्तान्त नारदही ॥६२॥तेथ समस्त यादववीरीं । दूतविज्ञसि ऐकूनि पुरीं । आवेश उथळला अंतरीं । मागध समरीं जिणावया ॥६३॥पूर्वीं सप्तदश संग्रामीं । प्राणावशिष्ट सोडिला आम्हीं । अद्यापि न संडी समरोर्मी । उग्रकर्मी दुष्टात्मा ॥६४॥नारदवार्तेचा विक्षेप । मानूनि सर्वां वीरश्रीकोप । म्हणती आजीच मागधदर्प । झाडूं साटोप समरंगीं ॥४६५॥त्यानंतरें नारदवचना । मान द्यावा हे वासना । परंतु भगवंताची आज्ञा । यंत्रकृशानासम पाहती ॥६६॥मागधें जिंकिलें जगदीश्वरा । म्हणोनि समुद्रीं निर्मिलें नगरा । ऐसिया गोष्टीचा दरारा । न धरूनि समरा करूं पाहती ॥६७॥ऐसें जाणूनि स्वपक्षाभीष्ट । हांसूनि सर्वज्ञ श्रीबैकुंठ । प्रधानांमाजि उद्धव श्रेष्ठ । त्यातें संतुष्ट वाक्य वदे ॥६८॥स्वपक्षप जे यादववीर । त्यांचें रक्षावया अंतर । सर्वज्ञ असतांही श्रीधर । उद्धवा सादर नीति पुसे ॥६९॥मधुरोत्तरीं उद्धवाप्रति । नीतिसूचक कौशल्योक्ति । तिहीं गौरवूनि श्रीपति । बोलता झाला तें ऐका ॥४७०॥श्रीभगवानुवाच । त्वं हि नः परमं चक्षुः सुहृन्मंत्रार्थतत्ववित् । अथाऽत्र ब्रूह्यनुष्ठेयं श्रद्दध्मःकरवाम तत् ॥४६॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । भूत भविष्य वर्तमान । त्रिकाळवेत्ताही सर्वज्ञ । उद्धवालागून मंत्र पुसे ॥७१॥अमरगुरु जो बृहस्पति । उद्धवा तच्छिष्य तूं सुमति । आमुचा सुहृद सर्वां आप्तीं । परमचक्षु मी जाणें ॥७२॥चर्मचक्षु सर्वां असती । धिषणाचक्षु बृहस्पती । तच्छिष्य तूं तेंचि मूर्ति । हें मम प्रतीतीमाजि असे ॥७३॥मंत्रार्थतत्त्ववचक्षण । इच्छिसी आमुचें कल्याण । तरी आम्हांसि करणीय कोण । हें विवरून बोल पां ॥७४॥दूतें नृपांची विज्ञापना । नारदें कथिली धर्मकामना । दोहींमाजि अनुष्ठाना । योग्य कोणतें कर्म आधीं ॥४७५॥विवरूनि वदसी जें करणीय़ । भक्तिपूर्वक तें करूं कार्य । ऐकूनि प्रभूचा अभिप्राय । उद्धव काय बोलतसे ॥७६॥इत्युपामंत्रितो भर्त्रा सर्वज्ञेनापि मुग्धवत् । निदेशं शिरसाऽऽधाय उद्धवः प्रत्यभाषत ॥४७॥ऐसा बहुमानपुरःसर । पुसिला स्वामीनें विचार । सर्वज्ञ असतांही साचार । मनुजाकार मुग्धवत् ॥७७॥जाणोनि प्रभूचें मनोगत । आज्ञा मस्तकीं वंदूनि त्वरित । मंत्र विवरूनि प्रसंगोचित । कथी मंत्रार्थ उद्धव पैं ॥७८॥पुढिले अध्यायीं उद्धव । विवरूनि कथील मंत्रार्थतत्त्व । सावध होऊनि श्रोते सर्व । कथा अपूर्व ते ऐका ॥७९॥इतुकी कथा सप्ततितमीं । वाखाणूनि श्रीशुकस्वामी । एकसप्ततितमामाजि नियमी । धर्मदर्शना हरियात्रा ॥४८०॥श्रीमद्भागवतींचा दशम । त्यामाजि भूभारहरणोद्यम । कौरवांकडील कथानुक्रम । तो उपक्रम येथूनी ॥८१॥परीक्षितीतें सांगे शुक । श्रोतीं होऊनि श्रवणोन्मुख । भाषाव्याख्यान तें सम्यक । श्रवण कीजे हरिवरद ॥८२॥एकनाथ प्रतिष्ठानीं । त्यांचें चरणप्रक्षाळवणी । गौतमीप्रवाहें लक्षूनी । दयार्णव सेवी पिपीलिके ॥८३॥शके सोळाशें एकुणसाठीं । पिंगळाब्दीं अनावृष्टी । शुक्लहरिदिनीदिवसा घटी । द्वादश क्रमतां अश्वयुजीं ॥८४॥भाषाव्याख्यान दयार्णवें । केलें हरिवरगौरवें । संतीं सादर तें परिसावें । जळे आघवें अघ तेणें ॥४८५॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां भगवदाह्निकनृपग्लानिकथननारदागमनयुधिष्ठिरवृत्तान्तविचारणं नाम सप्ततितमोऽध्यायः ॥७०॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४७॥ ओवी संख्या ॥४८५॥ एवं संख्या ॥५३२॥ ( एकोणसत्तरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३२६२० ) सत्तरावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP