मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७० वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ७० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ७० वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर आत्मानं भूषयामास नरलोकविभूषणम्। वासोभिर्भूषणैः स्वीयैर्दिव्यस्रग्गंधलेपनैः ॥११॥मनुष्यलोकींचीं अळंकरणें । दिव्य वसनें दिव्याभरणें । दिव्य पीताम्बरपरिधानें । निज भूषणें स्वीकेलीं ॥८६॥मस्तकीं मुकुट तेजःपुंज । मकरकुंदलें अतिसतेज । वज्रमणिसम वदनीं द्विज । झळकती सहज स्मितवक्त्रें ॥८७॥केशरचंदनतिलक ललाटीं । सुरंग अक्षता लखलखाटीं । काश्मीरावरी कस्तूरी भृकुटीं । मध्यभागीं विराजित ॥८८॥आंगीं मलयजसार पिंजरी । त्यावरी द्वादश तिलक केशरी । अंगदें बाहुवटां कार्बुरी । जडित कंकणें मणिबंधीं ॥८९॥विचित्र रत्नखचित मुद्रिका । चतुरष्ट षोडश दळात्मका । त्रिकोण वर्तुळा चंद्रिका । अनामिका सपवित्रा ॥९०॥जाम्बूनदात्मक मेखळा । नवरत्नाच्या फांकती किळा । बिरुदें रुळती चरणकमळा । कंथीं वनमाळा वैजयंती ॥९१॥कौस्तुभ श्रीवत्सलाञ्छनानिकटी । प्रावरण अमोल्य क्षीरोद दुटी । मंदारसुमनें खोंविलीं मुकुटीं । ते परिपाटी अवधारी ॥९२॥अवेक्ष्याज्य तथा दर्शं गोवृषद्विजदेवताः । कामांश्च सर्ववर्णानां पौरांतःपुरचारिणाम् ।प्रदाप्य प्रकृतीः कामैः प्रतोष्य प्रत्यनंदत ॥१२॥करूनि आत्मालंकरण । कनकपात्रीं आज्य भरून । स्वप्रतिबिंब तेथ लक्षून । केले अर्पण तें विप्रा ॥९३॥आदर्श पाहिल्या त्यानंतर । धेनु वृषभ देवता विप्र । अवलोकूनि जगदीश्वर । तदुत्तर काय करी ॥९४॥ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । पुरनिवासी वर्ण समग्र । अंतःपुरचारिजन अपर । कथिती सादर मनोरथ ॥९५॥देऊनि त्यांचे अभिलषितार्थ । प्रधान सचिव मंत्री अमात्य । अष्टधा प्रकृति या सनाथ । करी वाञ्छित अर्पूनी ॥९६॥करूनि प्रकृतीतें संतुष्ट । अर्पूनि जें जें ज्या अभीष्ट । स्वयें तत्तोषें उत्कृष । कमलाइष्ट आनंदें ॥९७॥इतुकें आह्निक अंतःसदनीं । स्वयें सारूनि चक्रपाणि । मग पातले सभास्थानीं । तेंही श्रवणीं अवधारा ॥९८॥संविभज्याग्रतो विप्रान्स्रक्तांबूलानुलेपनैः । सुहृदः प्रकृतीदारानुपायुङ्क ततः स्वयम् ॥१३॥सभास्थानीं पार्षदगण । किङ्कर अनुचर सेवकजन । तिहीं आणिलें उपचारभरण । करी अर्पण हरि तेंही ॥९९॥वर्णांमाज जे अग्रज । सर्वावर्णां ब्राह्मण पूज्य । त्यांसि अग्रीं अधोक्षज । उपचार सहज समर्पी ॥१००॥मंदारसुमनांचिया माळा । आधीं घालूनि विप्रां गळां । चंदनतिलक रेखिले भाळा । परिमळउधळा वरि केला ॥१॥फळताम्बूलसमर्पण । इत्यादि उपचारीं ब्राह्मण । आधीं पूजूनि जनार्दन । सुहृदगण अभ्यर्ची ॥२॥त्यानंतरें राजप्रकृति । मंत्रिधुरंधर ज्यांतें म्हणती । माळा तिलक ताम्बूल निगुती । अर्पिले त्यांप्रति उपचार ॥३॥ताम्बूल चंदन सुमनमाळा । दारांप्रति विभाग दिधला । त्यानंतरें अंगीं केला । उपचारसभुच्चय श्रीकृष्णें ॥४॥मंदारमाळा घातल्या कंठीं । कुसुमावतंस खोविले मुकुटीं । पुष्पामोद श्रवणपुटीं । भरूनि परिमळ उधळिला ॥१०५॥पुष्पादिउपचार सभास्थानीं । विप्रपूर्वक विभागूनीं । स्वयें घेतां चक्रपाणि । बंदिजनीं स्तव केला ॥६॥बिरुदमाळा पढती भाट । झाला वाद्यांचा बोभाट । संकेत जाणोनि घडघडाट । रथ आणिला सारथियें ॥७॥तावत्सूत उपानीय स्यंदनं परमाद्भुतम् । सुग्रीवदैर्हयैर्युंक्तं प्रणम्यावस्थितोऽग्रतः ॥१४॥रत्नखचितसुवर्णरथ । गरुडध्वजविराजित । किङ्किणीज्वाळमाळामंडित । जैसा भास्वत भूनभींचा ॥८॥शैब्य सुग्रीव बळाहक । मेघपुष्पादि तुरंगचौक । रथीं जुम्पूनियां दारुक । आला सम्यक मनोजवें ॥९॥परमाद्भुतपदव्याख्यान । जैसें प्राकृतनृपांचे स्यंदन । तैसा नोहे जो गगनींहून । मागधसमरीं उतरला ॥११०॥ हरिसंकल्पमनोजवें । चिंतिल्या स्थानापर्यंत पावे । गगनगर्भीं स्वेच्छा धांवे । अतिलाघवें त्वाष्ट्रकृत ॥११॥दिव्यायुधांची ज्यावरी भरण । प्रभे लोपवी हिमकर तरणि । ब्रह्मा साकल्यें न वर्णी । न शिवे धरणी रथनेमि ॥१२॥एवं परमाद्भुत हरिरथ । दारुकें सज्जूनि आणिला त्वरित । मस्तकें जुहारूनियां नाथ । अग्रीं विनीत ठाकला ॥१३॥घटिकायंत्रें सूचितां वेळा । उभा ठाकला पार्षदमेळा । सदस्येंसीं घनसांवळा । स्यंदनाजवळा स्वयें आला ॥१४॥दारुकें मौळें स्पर्शोनि चरण । केलें धुरेवरी आरोहण । कैसा बैसला नारायण । हें संपूर्ण अवधारा ॥११५॥गृहीत्वा पाणिना पाणी सारथेस्तं समारुहत् । सात्यक्युद्धवसंयुक्ताः पूर्वाद्रिमित भास्करः ॥१५॥सारथियाचा धरूनि पाणि । रथीं बैसला चक्रपाणि । सात्यकि उद्धव दोघीं जणीं । सहित अर्क उदयाद्रीवरी जैसा ॥१६॥दारुकें तुरंगा देतां साट । रथ चालिला घडघडाट । अंतःपुरवनिता घनदाट । गवाक्षीं स्पष्ट विलोकिती ॥१७॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP