मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७० वा| श्लोक १ ते ५ अध्याय ७० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ७० वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - अथोषस्युपवृत्तायां कुक्कुटान्कूजतोऽशपन् । गृहीतकंठ्यः पतिभिर्माधव्यो विरहातुराः ॥१॥सप्ततितमीं कृष्णाह्निक । नृपग्लानी आणि धर्ममख । दूतनारदवाक्यविवेक । मंत्र निष्टंक निरूपिला ॥१०॥ये अध्यायीं इतुकी कथा । द्वैपायनि नृपातें वक्ता । सादर होऊनि परिसिजे श्रोतां । आह्निक प्रथमतः त्यामाजी ॥११॥नारदागमनानंतर हरि । रमणींसहित निशि अवसरीं । निद्रिस्त सोळा सहस्रां घरीं । विलासभरीं स्मररसिक ॥१२॥अनेका सदनीं अनेक हरि । कंठ कवळूनि सप्रेम नारी । पहुडल्या असतां हरिशेजारीं । तंव शर्वरी अतिक्रमली ॥१३॥समीप जाणोनि उषःकाळ । निसर्गे चेइला कुक्कुटमेळ । ह्रस्व दीर्घ प्लुत प्राञ्जळ । करिती कोल्हाळ स्वकूजिती ॥१४॥माधवपत्न्या त्या माधवी । सप्रेमभरें रत माधवीं । वियोग सूचितां कुक्कुटरवीं । सक्षोभ जीवीं विरहर्ता ॥१५॥कुक्कुटा निंदिती धिक्कारें । म्हणती तुमची जळोत वक्त्रें । आमुचा विघड करितां स्वरें । दीर्घगजरें स्वकूजितें ॥१६॥तुमचें परिसोनियां कूजित । उषःकाळीं आह्निकार्थ । आमुचा सांडोनि रतिएकान्त । उठेल भगवंत उताविळा ॥१७॥ऐशा विरहातुरा माधवी । क्षोभें कुक्कुटा शापित स्वजीवीं । तंव शकुन्तवर्ग हरि बोधवी । ते व्याख्यानपदवी अवधारा ॥१८॥वयांस्यरूरुवन्कृष्णं बोधयंतीव बंदिनः । गायत्स्वलिष्वनिद्राणि मंदारवनवायुभिः ॥२॥स्वप्रभूतें बंदिजन । प्रबोध करिती गायनें करून । भैरव बीभास आळवून । बिलावल भूपाळ इत्यादि ॥१९॥कीं विष्णूतें वैकुण्ठभुवनी । नारदप्रमुख स्वभक्तगणीं । जागृत कीजे सामगायनीं । द्विजीं कूजूनि तेंवि हरीतें ॥२०॥पूर्वींच जागृत बयांसिगण । आसन्न उषःकाळ जाणून । करूनि अतिशयें कूजन । श्रीभगवान जागविती ॥२१॥अंडजजागरानिमित्त काय । प्रश्न करील हा कुरुराय । ऐसें जाणोनि व्यासतनय । कथिता होय प्रश्नादौ ॥२२॥कृष्णें अमरभुवनीहून । सत्यभामेच्या प्रीतीकरून । सुरतरूचें केलें हरण । लाविलें तद्वन निजभवनीं ॥२३॥तया मंदारसुमन गंधें । रोलंब रुञ्जती परमानंदें । म्हणोनि अनिद्र पक्षिवृन्दें । गायनवेधें भ्रमराच्या ॥२४॥मंदारवनवायूच्या झुळका । मंदसुगंधशीतळ देखा । षट्पद पक्षी सेविती सुखा । तुच्छ पीयूषा मानूनी ॥२५॥श्रीकृष्णचरणपंकजामोद । संमिश्र मंदारपवनगंध । लोपूनि विषयसुखाचा स्वाद । परमानंद हरिभजनीं ॥२६॥मुहर्तं तं तु वैदर्भी नामृष्यदतिशोभनम् । परिरंभणविश्लेषात्प्रियबाह्वंतरं गता ॥३॥वैदर्भीं हें उपलक्षण । परंतु सर्व हरिवनिता समान । प्रियपरिरंभणाचा क्षण । अतिशोभन मानिती ॥२७॥प्राणेश्वराचें बाह्वंतर । जें कां हरिहृदय गंभीर । तेथें स्वहृदयें संलग्नतर । विश्लेषभीरु रतिरसिका ॥२८॥हरिपरिरंभविश्लेषास्तव । शोभनमुहूर्तगौरव । भीमकीप्रमुख वनिता सर्व । लब्धानुभव न साहती ॥२९॥प्रियतमाच्या बाह्वंतरीं । गाढालिङ्गनें संलग्न नारी । काळ क्रमला त्याची थोरी । मुहूर्तावारी उमाणिती ॥३०॥गाढालिङ्गनें हरिहृदयासी । संलग्न असतां योषितांसी । मुहूर्तातें अवघी निशी । तुल्य विलासीं अवगमिती ॥३१॥वैदर्भी हें उपलक्षण । परंतु सर्वा विरहिणी जाण । त्रियामा मानिती जैसा क्षण । परिरंभणास्तव कृष्णाच्या ॥३२॥स्मराक्त परिरंभप्रेमपडिभरीं । कृष्णकंठीं संलग्न नारी । तंव कुक्कुटद्विजालिकूजितगजरीं । उषसि मुरारि जागविला ॥३३॥रुक्मिणीप्रमुख समस्त वनिता । कृष्णालिङ्गनीं विघड होतां । वियोग न साहती तत्त्वता । मानिती मुहूर्ता युगसाम्यें ॥३४॥बाह्ये मुहूर्त उत्थाय वार्युपस्पृश्य माधवः । दध्यौ प्रसन्नकरण आत्मानं तमसः परम् ॥४॥कुक्कुटद्विजालिगजरें हरि । ब्राह्म मुहूर्तीं जागरावसरीं । उठोनि स्पर्शता झाला वारी । शौचाचारीं साचमनें ॥३५॥फेडूनि रात्रींचें परिधानवसन । सुधौत दिव्याम्बर वेष्टून । उत्तराभिमुख घालूनि आसन । आत्मचिंतनीं उपविष्ट ॥३६॥स्वस्तिक किंवा पद्मासन । ईषत् पृष्ठवंश उत्तान । चिबुक वक्षीं असंलग्न । संवृतवदन भ्रू लक्षी ॥३७॥अनास्य प्राणांचा संचार । तोही परम नियमित मात्र । वर्णरचना मुद्रापर । मनोव्यापार निरसूनी ॥३८॥तेथ मायान्धकाराती । जो कां आत्मा सदोदित । त्या आत्म्यातें ध्यानीं धृत । दीप निर्वात ज्यापरी ॥३९॥कोण आत्मा कैसें चिन्तन । तें संक्षेपें करूं कथन । राया ऐकें सावधान । म्हणे नंदन व्यासाचा ॥४०॥एकं स्वयंज्योतिरनन्यमव्ययं स्वसंस्थया न्त्यनिरस्तकल्मषम् ।ब्रह्माख्यमस्योद्भवनाशहेतुभिः स्वशक्तिभिर्लक्षितभावनिर्वृतिम् ॥५॥जो एकचि द्वैतातीत । अखंड एकात्मा संतत । अखंडत्वाचा ऐकें हेत । अनन्यपदार्थ प्रतिपादी ॥४१॥अन्य नाहीं तो अनन्य । अन्यरूपिणी प्रकृति भिन्न । भूतगुणांचें अधिष्ठान । जे प्रसवोन रूढ करी ॥४२॥हे उपाधि जेथ नाहीं । त्यातें निरुपाधि म्हणिजे पाहीं । यालागीं अनन्यपदनिश्चयीं । श्रुतिनिर्वाहीं प्रतिपाद्य ॥४३॥उपाधिमात्र भासे नासे । अखंड अनन्य अव्यय असे । म्हणोनि श्रुतींहीं नित्य ऐसें । प्रबोधवशें बोधियलें ॥४४॥आम्ही स्वयंज्योति ऐसें म्हणती । हेतु ऐकावा यदर्थीं । जे कां अविद्या कल्मषबुद्धि । तिची निवृत्ति ज्या स्वरूपीं ॥४५॥जेथूनि अविद्यावरणा नाश । तेंचि नित्य निवृत्तकल्मष । उपलक्षण बोलतों यास । जें या विश्वास गुणहेतु ॥४६॥म्हणसी माया गुणा प्रसवली । तरी मायाप्रकाशक जें का मुळीं । सृजनावनान्तमय सृष्टि झाली । तीमाजि पहिली आस्तिक्यता ॥४७॥मायागुणात्मक विश्व सहज । भावनिर्वृति मुळींचें बीज । याचें व्याख्यान राया उमज । कथितों तुज प्रकटार्थें ॥४८॥सत्ताशब्दार्थ बोलिजे भाव । आनंद निर्वृतिशब्दा नांव । एवं सदानंद ब्रह्म स्वमेव । ज्यावरी माव भवभ्रम हा ॥४९॥मुळीं सन्मात्र जोंधळा । विश्वाकारें विरूढला । दंडपत्रावयवीं झाला । अंतीं निवडला सदूपें ॥५०॥विश्वासाद्यंतीं सन्मात्र । सदैव श्रुत्युक्त आनंदप्रचुर । सहजानंद शब्दाधार । केवळ सन्मात्र सदानंद ॥५१॥ऐसें नित्यनिवृत्तकल्मष । ब्रह्म ऐसें नाम ज्यास । बृहत्त्वास्तव बोलती विदुष । नित्य निर्दोष स्वयंज्योति ॥५२॥ऐसिया अत्मयातें ध्यानीं । पूर्वोक्त मुदाबद्ध आसनीं । तादात्म्य पावे आत्मचिन्तनीं । तुजलागुनी हें कथिलें ॥५३॥राजा म्हणे योगीश्वरा । कृष्ण सन्मात्रचि ऐसें विवरा । तो कां शारीर आसन मुद्रा । ध्यानव्यापारा अवलंबी ॥५४॥मुनि म्हणे भो परीक्षिति । पूर्वींच कथिलें म्यां तुजप्रति । आह्निक लोकसंग्राहार्थीं । प्रकटी श्रीपति आचरोनी ॥५५॥कृष्ण परब्रह्मांचे केवळ । त्यासि न बाधी कर्ममळ । जरी प्रकाशी अनेक शीळ । तरी तो अमळ स्वयंज्योति ॥५६॥झाली शंकेची निवृत्ति । पुढें कृष्णाह्निकपद्धति । शुक निरूपी रायाप्रति । तें व्याख्यान श्रोतीं परिसावें ॥५७॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP