मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७० वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ७० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ७० वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर तत्राहुर्ब्राह्मणाः केचिदासीना ब्रह्मवादिनः । पूर्वेषां पुण्ययशसां राज्ञां चाकथयन्कथाः ॥२१॥तिये सुधर्मासभेआंत । वेदवेदांगपारंगत । तपस्वी श्रौतस्मार्तनिरत । आनंदभरित बैसले ॥४४॥नहुष ययाति पुरूरवा । खट्वांग मान्धाता अज राघवा । दुष्यंत भरत मधुयादवां । सहित पूर्वां पुण्य नृपां ॥१४५॥मुचुकुन्द रुक्मांगद अंबरीष । शिवि शर्याति महाभिष । इत्यादि पूर्वनृपांचें पुण्य यश । शंसिती अशेष द्विज कोण्ही ॥४६॥पूर्वापर जे पुण्यश्लोक । त्रिजगीं ज्यांचा कीर्तिघोष । त्यांच्या पुण्यकथा अशेष । वदती निर्दोष ब्रह्मविद्या ॥४७॥ऐसिये सुधर्मासभास्थानीं । उपविष्ट यदुचक्रचूडामणि । सादर गुणकीर्तिसत्कथाश्रवणीं । तंव पुरुष कोण्ही तेथ आला ॥४८॥तत्रैकः पुरुषो राजन्नागतोऽपूर्वदर्शनः । विज्ञापितो भगवते प्रतिहारैः प्रवेशितः ॥२२॥पूर्वीं देखिला नाहीं कोण्हीं । यालागीं तो अपूर्वदर्शनी । पुरद्वारींच्या द्वारस्थां श्रवणीं । वृत्तान्त कथूनि ठाकला ॥४९॥द्वारस्थीं घेऊनि प्रभूची आज्ञा । पुरीं प्रवेशविला तो जाणा । सभाद्वारींच्या द्वास्थीं पुन्हा । प्रभूते सूचना जाणविली ॥१५०॥प्रभुसंकेतें त्या प्रतिहारीं । प्रवेशविला सभागारीं । ससभ्य नृपा तो जुहारी । जोडिल्या करीं नम्रशिरें ॥५१॥स नमस्कृत्य कृष्णाय परेशाय कृतांजलिः । राज्ञामावेदयद्दुःखं जरासंधनिरोधजम् ॥२३॥जो कां परेश परात्पर । त्या कृष्णाकारणें नमस्कार । करूनि ठाकला समोर । बद्धाञ्जलि पदलक्ष्यें ॥५२॥राजयांचें परम दुःख । मागधकृतनिरोधात्मक । स्वमुखें निवेदी तें सम्यक । सखेदमुख होत्साता ॥५३॥कोण राजे कैसें दुःख । ऐसा पुससी जरी विवेक । तरी तूं कुरुवर्या आइक । म्हणे श्रीशुक तें ऐका ॥५४॥ये च दिग्विजये तस्य सनतिं न ययुर्नृपाः । प्रसह्य रुद्धास्तेनासन्नयुते द्वे गिरिव्रजे ॥२४॥मागधें करितां दिग्वैजयातें । तयास नम्र जे झाले नव्हते । क्षात्रधर्में समरंगातें । दळें बळेंसीं प्रवर्तले ॥१५५॥ऐसें राजे अयुतें दोनी । बळात्कारें समरांगणीं । मागधें निरोधिलें जिंकूनी । नेले बांधोनि निजनगरा ॥५६॥गिरिव्रजनामें मागधदुर्ग । त्यामाजि जिंकूनि भूभुजवर्ग । वीस सहस्र राजे सुभग । ओपोनि अभाग्य निग्रहिले ॥५७॥तिंहीं पाठविलों मी दूत । सेवेसि निरूपिला वृत्तान्त । तो परिसावा इत्थंभूत । कथितों नृपोक्त जगदीशा ॥५८॥कृष्ण कृष्णाप्रमेयात्मन्प्रपन्नभयभंजन । वयं त्वां शरणं यामो भवभीताः पृथग्धियः ॥२५॥कृष्ण कृष्ण आम्रेडितीं । दूतें संवोधिला श्रीपति । परि ते म्हणावी दूतोक्ति । नृपांची विज्ञप्ति जाणावी ॥५९॥आणिक संबोधनें दोनी । तींही परिसावीं व्याख्यानीं । प्रपन्नभयभंजन म्हणोनी । अप्रमेयात्मन् हें दुसरें ॥१६०॥कृष हा भूवाचक शब्द । णकार केवळ जो आनंद । एवं श्रीकृष्ण सच्चिद्बोध । तो तूं विषद परमात्मा ॥६१॥द्वितीय कृष्णसंबोधन । युगपरत्वें पृथक वर्ण । क्रमें कळिकाळीं तूं कृष्ण । भूभारहरण अवतार ॥६२॥पूर्वी दैत्य मर्दिले बळी । ते अवतरले भूमंडळीं । विविध राजयांच्या कुळीं । प्रतापशाळी धर्मघ्न ॥६३॥ते हे आदिपर्वीं असुरसुर । कथिले भूभार नृपवर । त्यांमाजि विप्रचित्ति असुर । तो मागधवीर जरासंध ॥६४॥हिरण्यकशिपु तो शिशुपाळ । सह्लादनामा बोलिजे शल्य । अनुहलाद धृष्टकेतु प्रबळ । शिबि विशाळदुमरावो ॥१६५॥अश्वशिरादि दैत्यपंचक । ते कैकेयवंशीचे नृपनायक । केतुमान्नामा दैत्यमुख्य । तो हा नरेन्द्र अमितौजा ॥६६॥वृषपर्व्याचा कनिष्ठ बंधु । तो हा शाल्व प्रतापसिन्धु । वृषपर्वा जो महादुर्भदु । दीर्घप्रख्य नृप जाना ॥६७॥दिर्घजिह्वा दैत्यपति । तो हा काशिराजनृपति । राहोदैत्य जो दुर्मति । तो क्रथनामा भूपाळ ॥६८॥दैत्यकुळीं बोलिजे वृत्र । मणिमान्नामा तो नरेंद्र । क्रोधवर्धन महासुर । तो दंडधर भूपाळ ॥६९॥कालेयनाभा दैत्यश्रेष्ठ । तयाचे प्रतापी पुत्र अष्ट । खळदुरात्मे महादुष्ट । जन्मले स्पष्ट भूलोकीं ॥१७०॥जयत्सेन राजा पाहीं । जन्मला मगध देशाच्याठायीं । अपराजित या नामें महीं । मनुष्यदेही नृप झाला ॥७१॥त्रितीय झाला निषादपति । चौथा श्रेणिमान् राजा क्षिती । पांचवा महौजा भूपती । षष्ठ नरपति अभित जो ॥७२॥सातवा राजा समुद्रसेन । आठवा ब्रहद्भुपाळ जाण । आठही कालेयदैत्यनंदन । भूमंडळीं अवतरले ॥७३॥कुक्षिनामा जो दानव । तो हा पार्वतीयनामक राव । क्रथनदैत्याचा आविर्भव । सूर्याक्ष राव भूलोकीं ॥७४॥सूर्यनामा असुरश्रेष्ट । तो हा बाल्हिकनामा वरिष्ठ । बाल्हिकांमाजि अपर कनिष्ठ । ते अवशिष्ट अवधारा ॥१७५॥गण क्रोधवश आणि बस्त । मद्रकर्णवेष्ट सिद्धार्थ । कीटक सुवीर सुवाहु सुरथ । बाल्हिकदेशीं नृप झाले ॥७६॥क्रथ विचित्र श्रीमान्नीळ । चिरवासा भूमिपाळ । वक्रदंत महाखळ । दुर्जयनामा भूपति ॥७७॥रुक्मी नृपांमाजि मृगेंद्र । तैसाचि जनमेजय नरेन्द्र । वायुवेग आषाढ क्रूर । भूरितेजा तैसाचि ॥७८॥सुमित्र आणि एकलव्य । वाटधान गोमुखराय । कारोषदेशीं नरवर सर्व । झाले दानव भूलोकीं ॥७९॥क्षेमधूर्ती आनि श्रुतायु । उद्वह बृहत्सेन शतायु । क्षेमक उग्रतीर्थ कुहरबाहु । कलिंगदेशीं नृप झाले ॥१८०॥एवं अवघे हे दानव । भूमंडळीं झाले राव । परंतु दैत्याचा स्वभाव । भंगिती गौरव धर्माचें ॥८१॥गंधरवराव तो देवक । सुराचार्य द्रोण मुख्य । प्रकट भारद्वाजनामक । अतिसुटंक धनुर्धारी ॥८२॥महादेव आणि अंतक । कामक्रोध चार्ही एक । या चहूंचा अवतार मुख्य । अश्वत्थामा जाणावा ॥८३॥अष्ट वसु शंतनुजठरीं । जन्मले त्यामाजि क्षितीवरी । कनिष्ठ राहिला महाक्षत्री । भीष्मनामक कुरुवंशीं ॥८४॥भार्गवरामाचा जो शिष्य । धनुर्विद्येचा महेश । जेणें उद्धरिला कुरुवंश । अपर दिनेश नृपवर्गीं ॥१८५॥अकरा रुद्रांचा जो गण । त्यांचें तेज एकवटून । कृपाचार्यनामा ब्राह्मण । अस्त्रप्रवीण अवतरला ॥८६॥द्वापरयुगाचा अवतार । तो हा शकुनि सौबळवीर । मरुद्गणांमाजि क्रूर । तो सात्यकि शूर वृष्णिकुळीं ॥८७॥द्रुपद कृतवर्मा विराट । इत्यादि मरुद्गणांश स्पष्ट । हंसनामा गंधर्वश्रेष्ठ । धृतराष्ट्रनामा कुरुवंशीं ॥८८॥कृष्णद्वैपायनात्मज । दीर्घबाहु तेजःपुंज । प्रज्ञाचक्षु कौरवराज । जो जात्यंध कुरुवर्य ॥८९॥त्याचा कनिष्ठ बंधु पाण्डु । यमांश विदुर ज्ञाता प्रचंड । कळीचा अंश जो प्रचंड । तो दुर्योधन दुष्टात्मा ॥१९०॥जे कां पौलस्त्य राक्षस । दुर्योधनावरज अशेष । शतावधि पापपुरुष । दुःशासनप्रमुख जे ॥९१॥एवं भूभार सर्व राजे । सुरासुरावतार सहजें । तन्निर्दलना गरुडध्वजें । केला अवतार कळिवणें ॥९२॥कृष्ण कृष्ण संबोधनें । द्विधा वाखाणिलीं भिन्नें । अग्राह्या तूं करणज्ञानें । अप्रमेयात्मन् अगोचर ॥९३॥प्रमाता प्रमाण प्रमेय । तो हा भवभ्रम त्रिपुटीमय । तूं परमात्मा अप्रमेय । अज अव्यय अविनाश ॥९४॥उतरावया धराभार । स्वधर्माचा जीर्णोद्धार । रक्षावया मुनि निर्ज्जर । तव अवतार नरलोकीं ॥१९५॥अप्रमेयात्मा सर्वगत । तरी कां मजला त्रिविध कृत्य । प्रपन्नभवभंजनें हें सत्य । बिरुदाकारणें युगीं युगीं ॥९६॥देहाभिमानी पृथक बुद्धि । मागधें निग्रहिलों धरूनि युद्धीं । शरण आलों कृपानिधि । रक्षीं त्रिशुद्धी निजदासां ॥९७॥आपुले बिरुदरक्षणासाठीं । अभयपाणि आमुचे मुकुटीं । ठेवूनि रक्षावें जगजेठीं । ऐसें वाक्पुटीं नृप वदले ॥९८॥षट्श्लोकात्मक नृपांची विनति । त्यामाजि प्रथम हे विज्ञप्ति । हरिचरणाश्रय शरणागतीं । विनीतभक्तीं आश्रयिला ॥९९॥ श्लोकत्रयें भयाचें कथन । पुढें दोश्लोकीं प्रार्थन । षट्श्लोकात्मक विज्ञापन । ऐक वाख्यान तयाचें ॥२००॥वाखाणिला प्रथम श्लोक । यावरी भयाचा विवेक । मत्स्यजामाता वदला शुक । तोही सम्यक अवधारा ॥१॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP