मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७० वा| आरंभ अध्याय ७० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ७० वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगोविन्दसद्गुरवे नमः । प्रपंच परमार्थ मोघामोघा । तुज नेणतां प्रपंच अवघा । जाणितिलिया अखिलामोघा । प्रपंचभोगा अनवसर ॥१॥ऐसिया गोविन्दा तुज नमन । नमितां मन होय उन्मन । मनें भाव्लें जें भगवान । अस्तमान त्या सहजें ॥२॥ओतप्रोत तूंचि अवघा । तेथ नम्य नमिता उभय विभागा । ठाव नाहें अद्वयाभंगा । ओघ तरंगा निर्व्योमीं ॥३॥तथापि स्वेच्छा चिद्विलास । अबळां भ्रभवी विश्वाभास । स्वजनानंदलीलालास्य । भवभ्रम निःशेष नाशक जें ॥४॥तेथ दशमीं श्रीकृष्णलीला । पहावया नारद आला । षोडशसहस्र सदनें फिरला । मग निश्चय केला हा तेणें ॥५॥अर्थकामधर्मविषयें । श्रद्धावंत चित्तें पाहीं । निजाचरणें लोकीं तिहीं । प्रकृति प्रकटी गार्हस्थ्यें ॥६॥तस्मात् गृहस्थधर्माचरणीं । सिद्धाधिकार चक्रपाणी । अस्तां नृपाह्निकव्याख्यानीं । बादरायणि प्रवर्तला ॥७॥इत्यर्थ नारदकृत निर्धार । तदनंतरें आह्निकाचार । अथशब्दार्थ हा विस्तार । पूर्वपीठिके विवरिला ॥८॥शुक म्हणे गा कुरुवरपाळा । नारद कृष्णा नमूनि गेला । अथेत्यनंतर कृष्णलीला । सादर सकळांसह परिसें ॥९॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP