मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर नूनं नानामदोन्नद्धाः शांतिं नेच्छंत्यसाधवः । तेषां हि प्रशसो दंडः प्रशूनां लुगडो यथा ॥३१॥नानामदें जे उद्धत । ते नेणती आपुलें हित । दुष्ट अशान्त दुर्विनीत । भ्रान्त उन्मत्त दुरात्मे ॥२३॥जे कां असाधु दुर्जन । इच्छितां तयांचें कल्याण । मदोन्मत्त ते विक्षेपून । करिती हेलन बहुतेक ॥२४॥कुलीनत्वाभिजात्यमद । शिष्टाचारें शीळमद । वीर्यशौर्यें प्रबळमद । आणि श्रीमद धनाढ्यें ॥२२५॥यौवनभरें वयसामद । श्रुताध्ययनें विद्यामद । रूपलावण्यसौन्दर्यमद । सत्तामद भूपाङ्गें ॥२६॥इत्यादिमदें जे उन्नद्ध । त्यांसी प्रशमार्थ न कीजे बोध । बोधें होती ते विरुद्ध । दण्ड प्रबोध त्यां योग्य ॥२७॥ज्ञानविहीन पशूंचें जिणें । हित नुमजे त्यांकारणें । त्यांसी प्रबोध डंगारणें । येती तेणें स्वस्थाना ॥२८॥लगुड म्हणिजे काष्ठदंड । घडिघडी तेणें ठेंचितां तोंड । तरी ते वोढाळ तरमुंड । देती मुसाण्ड पुढें पुढें ॥२९॥हेचि तयांची शिकवण । कीजे क्षणाक्षणा ताडन । यावांचूनि विवेकहीन । निजकल्याण न मानिती ॥२३०॥वेदशास्त्रीं नाहीं गति । ईश्वरनिष्ठा न बाणे चित्तीं । पादत्राणें तयांप्रति । तादन युक्तिप्रबोध ॥३१॥ऐसे दुर्जन हे कौरव । नेणतीं स्वहिताचें गौरव । आम्हीं रक्षिला स्नेहभाव । इहीं अपाव तो केला ॥३२॥अहो यदून्सुसंरब्धान्कृष्णं च कुपितं शनैः । सांत्वयित्वाऽहमेतेषां शममिच्छन्निहागतः ॥३२॥साम्बनिग्रहणाची वार्ता । ऐकोनि यदुचक्रा समस्तां । कौरवनाशा प्रवर्ततां । आम्हीं तत्त्वता वारिलें ॥३३॥ब्रह्माण्डाचिया उतरडी । इच्छामात्रें घडी मोडी । तया कृष्णाच्या पडिपाडीं । कायसीं बापुडीं कौरवें हीं ॥३४॥अहो आश्चर्य वाटे थोर । करावया कुरुकुळा संहार । यादव क्षोभले महाक्रूर । झाला श्रीशर सक्रोध ॥२३५॥रथ गज अश्व पदातिदळ । युयुधानप्रमुख यादवदळ । कुरुकुळ करावया निर्मूळ । क्रोधें तत्काळ उठावले ॥३६॥यांचें इच्छूनियां कल्याण । हळुहळु शान्त करूनियां कृष्ण । प्रार्थूनियां उग्रसेन । केलें आगमन म्यां येथ ॥३७॥कौरवां यादवां माजी कळी । न व्हावी कोणे एके काळीं । ऐसी आम्हीं इच्छा केली । ती भंगैलीं इही दुष्टीं ॥३८॥त इमे मंदमतयः कलहाभिरताः खलाः । तं मामवज्ञाय मुहुरुर्भाषान्मानिनिऽब्रुवन् ॥३३॥ते हे मंदमति दुर्जन । कलहाकारणें उदित जाण । क्षेम इच्छित्या मातें पूर्ण । अवज्ञा हेळणें उपेक्षिलें ॥३९॥वारंवार दुष्ट वचनें । निंदा दुरुक्ति हेलनें । ऐकवूनियां मजकारणें । गेले उठोनि नगरांत ॥२४०॥तुच्छ मानूनि म अज हलधरा । वृद्धा उद्धवा बुद्धिसागरा । कौरव चढले अहंकारा । वदले उत्तरां निकृष्ट ॥४१॥तयां उत्तरांचा विस्मय । स्मरोनि मानी रेवतीप्रिय । कौरवीं केला परमान्याय । जें अमृत विषमय मानिलें ॥४२॥ नोग्रसेनः किल विभुर्भोजवृष्ण्यंधकेश्वरः । शक्रादयो लोकपाला यस्यादेशानुवर्तिनः ॥३४॥कौरवांतें आज्ञापन । करावया असमर्थ उग्रसेन । कौरवांचें हें दुर्भाषण । विस्मयेंकरून अनुस्मरें ॥४३॥भोज अंधक वृष्णि सर्व । कुक्कुर सात्वत मधु दाशार्ह । इत्यादि यदुकुळांचा राव । कौरवीं अनर्ह तो केला ॥४४॥इंद्र अग्नि वैवस्वत । निरृति वरुण सह मारुत । कुबेर ईशान लोकनाथ । अतंद्रित आज्ञेतें ॥२४५॥उग्रेसेनाची आज्ञा माथां । वंदूनि वर्तणें लोकनाथा । ते कौरवीं केली वृथा । मानूनि आढ्यता स्वपदाची ॥४६॥आत्मसंभावित हे स्तब्ध । केला स्नेहभाव विरुद्ध । लोकत्रयीं जो प्रसिद्ध । तो महत्वें वृद्ध इहीं केला ॥४७॥असो उग्रसेनाची कथा । त्रिजगज्जनका श्रीकृष्णनाथा । लज्जा न वटे यां हेळितां । प्रकट सामर्थ्या जाणोनी ॥४८॥सुधर्माऽऽक्रम्यते येन पारिजातोऽमरांघ्रिपः । आनीय भुज्यते सोऽसौ न किलाध्यासनार्हणः ॥३५॥सुधर्मा सभा स्वर्गींहून । द्वारके प्रतिष्ठिली आणून । अमराङ्घ्रिपाचें सेवन । भोगी प्रसूनें ललनांशीं ॥४९॥ब्रह्माण्डसाम्राज्यपट्टाभिषेक । करूनि निर्जर शक्रादिक । किङ्करवृत्ती एकें एक । तिष्ठती सम्यक ज्या सदनीं ॥२५०॥त्या कृष्णासी नृपासन । पाण्डुर च्छत्रें आतपत्राण । उभय चामरें किरीट व्यजन । अयोग्य म्हणोनि जल्पती हें ॥५१॥साम्राज्यश्रियेचें ऐश्वर्य । भोगार्ह एक कौरवधुर्य । अनर्ह मानिती यदुवर्य । यथार्थ कोण हे गोष्टी ॥५२॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP