मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - दुर्योधनसुतां राजन्लक्ष्मणाम समितिंजयः । स्वयंवरस्थामहरत्सांबो जांबवतीसुतः ॥१॥शुक म्हणे गा कुरुवरिष्ठा । हरिगुणश्रवणा एकनिष्ठा । सुयोधनतनया जे बरवंटा । लावण्यचोहटा वररत्न ॥११॥सौन्दर्यरसाची पूतळी । मनसिजमानसभवमराळी । कामाङ्गनेची विलासकेली । लावण्यजलमयसुखसरिता ॥१२॥सर्व शुभलक्षणें संपन्ना । यालागीं नामें ते लक्ष्मणा । अधिष्ठितां नवयौवना । स्वयंवररचना आदरिली ॥१३॥पत्रें देऊनि भाटवार्तिक । ब्राह्मण उपाध्ये ग्रामयाजक । धाडूनि भूपति अनेक । प्रार्थिले कौतुक पहावया ॥१४॥दुर्योधनसुता नोवरी । लावण्यरसाची माधुरी । पार्थिवीं ऐकूनि पृथ्वीवरी । आले झडकरी स्वयंवरा ॥१५॥अंगवंगकलिंगप्रमुख । त्रिपुर कामरूप कामाक्ष । पर्वतवासी भूप अनेक । मिनले कौतुक पहावया ॥१६॥काश्मीर गौड गुर्जर मद्र । कैकेय कोसल चैद्य माथुर । मालव सैन्धव सुह्म सौराष्ट्र । मैथिल औत्किल नृप आले ॥१७॥माण्ड्य पाण्ड्य माण्डलिक । हैहय पाञ्चाळ मागधप्रमुख । नैषध विदर्भ वेणुदारिक । आले सकळिक महाराष्ट्र ॥१८॥आन्ध्र द्रविड केरळ । कर्णाटक तैलंग तिगळ । चौळ मल्याळ सिंहळ । पाबळ मावळ वैराट ॥१९॥एवमादि समस्त राजे । स्वयंवरा आले नोवरीकाजें । कौरवीं सम्मानूनि त्यां वोजें । नृपासमाजीं बैसविलें ॥२०॥मंगळतुरांचे बोभाट । बिरुदें पढती नृपांचे भाट । बंदिमागधस्तोत्रपाठ । सभा घनदाट विराजली ॥२१॥शृंगारूनियां नोवरी । वेष्टित सखियांच्या परिवारीं । जैशा गौरीतें किन्नरी । तेंवि किङ्करी वोळगती ॥२२॥घेऊनि रत्नदंडी चामरें । उभयभागीं ऊर्ध्वकरें । किङ्करी वारिती अपरा चीरें । सूक्ष्म सपूरें विराजती ॥२३॥वेत्रपाणि चेटिकावर्ग । पुढें कौतुकें सूचिती मार्ग । नृपैश्वर्यें बोधिती साङ्ग । सखिया सवेग नृपतनये ॥२४॥कुळ शीळ सौन्दर्य यश । ऊर्जित ऐश्वर्य निवास देश । लक्ष्मणा परिसोनि अशेष । न घाली मानस यांमाजी ॥२५॥ऐसी पाहत असतां सभा । विरहावेश न धरे साम्बा । नोवरीची लक्षूनि शोभा । इच्छी वल्लभा करावया ॥२६॥सवेग उचलूनि दोहीं करीं । नोवरी वाहूनि निज रहंवरीं । निघता झाला पवनापरी । द्वारकापुरी लक्षूनी ॥२७॥साम्ब जाम्बवतीचा बाळ । समराङ्गणीं केवळ काळ । पाहत असतां सर्व भूपाळ । चालिला अबळ रणजेता ॥२८॥संग्रामतेजा समितिञ्जय । जाम्बवतीचा वरिष्ठ तनय । कौरवांसहित न गणूनि राय । जाया घेऊनि निघाला ॥२९॥तेणें हडबडिल्या किङ्करी । म्हणती नोवरी बलात्कारीं । वाहूनियां निज रहंवरीं । नेतो लौकरी धांवा हो ॥३०॥सभा खबळळिली संपूर्ण । क्रोधा चढिले भीष्मद्रोण । लहान थोर कौरवगण । वदती वचन तें ऐका ॥३१॥कौरवाः कुपिता ऊचुर्दुर्विनीतोऽयमर्भकः । कदर्थीकृत्य नः कन्यामकामानहरद्बलात् ॥२॥सर्व कौरव कोपा चढले । त्यांमाजी श्रेष्ठ बोलते झाले । म्हणती आम्हां अवमानिलें । धारिष्ट केलें केवढें ॥३२॥धीट उद्धट हा अर्भक । अल्पही आमुचा न धरूनि धाक । नृपति न गणूनियां अनेक । नोवरी निःशंक नेतसे ॥३३॥कदर्थी करूनि आम्हां सकळां । अष्टवार्षिकी कन्या अबळा । अकामा हरिली कौरवबाळा । करधृतमाळा स्वयंवरीं ॥३४॥न विचारूनि आपुलें बळ । न गणूनि पृथ्वीचे भूपाळ । न मानूनियां कौरवपाळ । उद्धत केवळ अर्भक हा ॥३५॥बळेंचि नेतो आमुची कन्या । ऐसिया अयोग्य सामान्या । धरूनि करा दृढबंधना । दुर्योधना अविनीता ॥३६॥बध्नीतेमं दुर्विनीतं किं करिष्यंति वृष्णयः । येऽस्मत्प्रसादोपचितां दत्तां नो भुंजते महीम् ॥३॥धरूनि बांधा यातें दृढ । कायसा यदुवृष्णींचा पाड । आमुच्या आश्रयें झाले वाड । मिरविती तोंड नृपांमाजी ॥३७॥ययातिशापें जे वाळिले । कुलीननृपतींहीं हेळिले । भूपसम्मानीं गाळिले । आम्हीं पाळिले सुहृदत्वे ॥३८॥कुन्तिभोजाची पोसणी कन्या । पृथा पाण्डूची वराङ्गना । तत्संबंधें या सामान्यां । आम्ही सम्माना मिळविलें ॥३९॥अल्प भूखंड देऊनि यांतें । नृपांमाजी केलें सरते । विपरीत होती जैं आम्हांतें । तैं मग यांतें कोण पुसे ॥४०॥आमुच्या प्रसादें लाधले मही । तयेचें ऐश्वर्य भोगूनि इहीं । विपरीत होतां आमच्या ठायीं । पाड काई मग यांचा ॥४१॥निगृहीतं सुतं श्रुत्वा यद्येष्यंतीह वृष्णयः । भग्नदर्पाः शमं यांति प्राणा इव सुसंयताः ॥४॥सुतातें घातलें कारागृहीं । ऐकोनि वृष्णियादवीं तिहीं । क्षोभें धांवोनि आलिया पाहीं । भग्नदर्प तेही होतील ॥४२॥नृपांमाजी म्हणविती शूर । जंव कौरवेंसी न घडे समर । वृष्णिभोजांध दाशार्हकुक्कुर । विदर्प सत्वर होतील ॥४३॥दर्प भंगल्या होतील शान्त । प्रशम पावती सुशिक्षित । पुढती धरिती विनयपथ । होती सनाथ आमुचेनी ॥४४॥जैसीं इंद्रियें अनावरें । केलीं सुखरतींहीं घाबिरें । तथापि साधनें क्रूरें । करितां सत्वरें आकळती ॥४५॥प्राणायामादियोगाभ्यास । यमनियमादिशमदमास । करितां शिक्षा इंद्रियांस । तैं प्रशमास पावती ॥४६॥अनावर जो करणगण । त्याचें करितां सुष्ठु दमन । मग तो सम्यक् पावे पूर्ण । तैसेचि जाण यादवही ॥४७॥न धरूनि वृष्णिपाळांची भीड । अर्भक धरूनि बांधा दृढ । ऐसें कुरुवृद्धाचें तोंड । वदतां झडझड उठावले ॥४८॥कवच टोप बाणले वीरीं । सन्नद्ध होऊनि शस्त्रास्त्रीं । सगेग वळघले रहंवरीं । पवनापरी धांविन्नले ॥४९॥ऐसी आज्ञा करितां भीष्में । वीर लोटले पराक्रमें । कोण कोण तयांचीं नामें । कथितों नियमें अवधारा ॥५०॥इति कर्णः शलो भूरिर्यज्ञकेतुः सुयोधनः । सांबमारेभिरे बद्धु कुरुवृद्धानुमोदिताः ॥५॥कर्ण कानीन कुन्तीसुत । प्रतापतेजस्वी भास्वत । बाह्लिकात्मज सोमदत्त । तत्सुत विख्यात भूरिश्रवा ॥५१॥शल सुयोधन यज्ञकेतु । धृतराष्ट्राचे रेतोजात । कुरुवृद्ध तो गंगासुत । अपर कृतान्त समरंगीं ॥५२॥जेणें जिंकूनि परशुराम । ब्रह्मचर्याचा रक्षिला नेम । ऐसा कुरुवृद्धनामा भीष्म । साम्बदमना उठावला ॥५३॥महारथी हे साही जण । अपरिमित कौरवसैन्य । पाठीं धांवतां देखोन । कृष्णनंदन परतला ॥५४॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP