मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर गत्वा गजाह्वयं रामो बाह्योपवनमास्थितः । उद्धवं प्रेषयामास धृतराष्ट्रं बुभुत्सया ॥१६॥हस्तिनापुर पावला राम । पाहूनि उपवन उत्तम रम्य । पुष्पीं फळीं अमोघ द्रुम । देखोनि विश्राम पावला ॥१३५॥तेथें राहोनियां आपण । पुढें उद्धवातें धाडून । धृतराष्ट्रातें निजाभिगमन । स्नेहवर्धन जाणविलें ॥३६॥परम स्नेहाळ रोहिणीसुत । भेटीलागीं आर्तभूत । आला ऐसा निजवृत्तान्त । धृतराष्ट्रातें कळावया ॥३७॥स्नेहवाद धृतराष्ट्रातें । जाणवितां त्याचेनि चित्तें । काय कल्पिजेल तेंही निरुतें । आपणातें जाणावया ॥३८॥यालागीं उद्धव धाडिला पुढें । तेणें प्रेरूनि बार्तिकजोडें । महाद्वारापासूनि तोंडें । निरोप निवाडें पाठविला ॥३९॥राम उपवनीं राहून । तुम्हां पें उद्धव पाठवून । सर्व कथावें वर्तमान । वार्तिकी जाऊन निवेदिलें ॥१४०॥ऐकूनि वार्तिकांची वाणी । दुःशासनातें पाठवूनी । उद्धवालागीं सम्मानूनी । सभास्थानीं आणियला ॥४१॥उद्धव येतां कौरवसभे । धार्तराष्ट्र ठाकले उभे । येरें स्नेहाच्या वालभें । नमिले लोभें तें ऐका ॥४२॥सोऽभिवाद्यांबिकापुत्रं भीष्म द्रोणं सबाह्लिकम् । दुर्योधनं च विधिवद्राममागतमब्रवीत् ॥१७॥धृतराष्ट्रातें नृपासन । यालागीं त्यातें अभिवादन । मग वंदिले भीष्मद्रोण । दुर्योधन सबाहलिक ॥४३॥मान्य आणि वयोवरिष्ठ । त्यांचें वंदोनि पादपीठ । समवयस्कां संल्लग्नकंठ । क्षेमालिङ्गलें दीधलीं ॥४४॥अल्पवयस्कां सामान्य मान्य । तिहीं उद्धवा करूनि नमन । नृपानिकटीं रम्यासन । देऊनि सम्मान बैसविला ॥१४५॥सुहृद्भेटीच्या आदरें । राम आला हें कथिलें येरें । तीष मानिला अम्बिकाकुमरें । भीष्मादि अंतरें हरिखेले ॥४६॥म्हणती आजिचा सुदिन धन्य । स्नेहवादें संकर्षण । आला भेटावयालागून । पूर्ण कल्याण कुरुवंशा ॥४७॥रामागमन ऐकूनि सकळ । भेटीलागीं उतावीळ । जाती सामोरे तत्काळ । तेंही नवल अवधारा ॥४८॥तेऽतिप्रीतास्तमाकर्ण्य प्राप्तं रामं सुहृत्तमम् । तमर्चयित्वाऽभिययुः सर्वे मंगलपाणयः ॥१८॥सभास्थानीं उद्धवासी । कौरवीं पूजिलें उपचारेंसीं । सर्वीं घेऊनि उपायनासी । रामभेटीसी निघाले ॥४९॥सुहृदांमाजी सुहृत्तम । आमुचा प्राणसखा बळराम । तत्पूजनीं धरूनि प्रेम । आले निस्सीम उत्साहें ॥१५०॥रामासन्निधे रम्योपवनीं । प्रविष्ट झाल्या कौरवश्रेणी । पुढें नमनाची काहणी । ऐकें श्रवणीं कुरुवर्या ॥५१॥तं संगम्य यथान्यायं गामर्घ्यं च न्यवेदयन् । तेषां ये तत्प्रभावज्ञाः प्रणेमुः शिरसा बलम् ॥१९॥बळभद्रातें यथान्यायें । पूजिते झाले पूर्ण स्नेहें । जाणोनि अमोघपूर्णैश्वर्य । नमिती पाय अवघेची ॥५२॥रामप्रभावा जाणते । वडील वृद्ध जे जे होते । तिहीं सप्रेमभावें तेथें । बळरामातें वंदियलें ॥५३॥मग विष्टर समर्पून । केलें मधुपर्कपूजन । अर्घ्यपाद्यसह गोदान । वसनाभरणें समर्पिलीं ॥५४॥सर्वीं घालूनि नमस्कार । स्तवनीं तोषविला हलधर । समीप बैसूनियां सादर । पुसती परिवार तें ऐका ॥१५५॥बन्धून्कुशलिनः श्रुत्वा पृष्ट्वा शिवमनामयम् । परस्परमथो रामो बभाषेऽविवलवं वचः ॥२०॥उद्धवें सकळ कौरवांप्रति । क्षेमकल्याण पुसिलें निगुती । अंबिकातनय कौरवपति । सह तत्पंक्ति भीष्मादि ॥५६॥सुना कन्या पुत्र जामात । बन्धु भ्रातृजाया समस्त । पौत्र प्रपौत्र सुहृद आप्त । दासदासीप्रमुखही ॥५७॥देश कोश यूथपति । दुर्गें सेना राष्ट्रें संपत्ति । क्षेम कल्याण सर्वांप्रति । यारे म्हणती कृपेनें ॥५८॥तैसाचि कौरवा उद्धवासी । शभोजान्दासाहाधर्कु कुर । वृष्णिप्रमुख यदुकुळासी । कुशळ सर्वांसी पूसिलें ॥५९॥पुसूनि सर्वांसी कल्याण । कथिलें तैसें करूनि श्रवण । परस्परें आनंदोन । म्हणती सुदिन आजीचा ॥१६०॥यानंतरें बोले राम । स्नेहवर्धनकल्याणकाम । यदुकुळवंशामाजी प्रेम । राहे क्षेम ज्यापरी ॥६१॥विक्लव म्हणिजे दुःखरूप । उभयवंशीं पडे विकल्प । कलहदुमाचें वाढे रोप । तो संकल्प तुटावया ॥६२॥आपुल्या आगमनाची सिद्धि । पूर्वस्नेह पावे वृद्धि । यदर्थीं राम कृपानिधि । बोले सुबुद्धि तें ऐका ॥६३॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP