मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर यर्ह्यंबुजाक्ष तव पादतलं रमाया दत्तक्षणं क्कचिदरण्यजनाप्रियस्य ।अस्प्राक्ष्म तत्प्रभृति नान्यसमक्षमंग स्थातुं त्वयाऽभिरमिता बत पारयामः ॥३६॥तरी ऐकें गा अंबुजनयना । तुझिया पदतलावलोकना । अनंत वेळां लाहूनि जनना । रमलों नाना स्वपतींशीं ॥१४॥जर्ही भोगिले संसारपति । विषयाभासें न मने तृप्ति । तव पदपल्लवदर्शनावाप्ति । भाग्यें युवति लाधलों ॥५१५॥येर्हवीं तुझें श्रीपादकमळ । कमलाउत्साहक केवळ । तेंही क्कचित कोण्हे वेळ । सर्वकाळ अप्राप्य ॥१६॥रमेसि नियमूनि दिधला क्षण । तेचि क्षणीं ते पदसेवन । करूनि मानी आपणा धन्य । पदाब्जेक्षणसौभाग्यें ॥१७॥तो तूं कोण्हा एक्या योगें । भूभारनिरसनप्रसंगें । अनंतजन्मींच्या सुकृतभाग्यें । प्रिय सर्वांगें वनचरां ॥१८॥नादसुखें वेधती कोण्ही । कोण्ही लक्ष्यें लक्षिती नयनीं । कोण्ही मानसीं ध्याती ध्यानीं । कोण्ही वदनीं यश गाती ॥१९॥ऐसे ऐकैक वेगळ्या आंगी । भजन आकळिती सप्रेममार्गीं । येथ अरण्यजना सर्वांगीं । निःसंगसंगी प्रियतम तूं ॥५२०॥ऐसिया अरण्यजनप्रिया । देखत्या जालों तुझिया पायां । जरी क्कचित्सुकृतक्रिया । अल्पा उदया क्षणमात्र ॥२१॥क्षणमात्रही तव पदतळां । देखत्या जालों सप्रेमळा । आणि तुवां आमुच्या हृदयकमळां । निज इंगितीं रमविलें ॥२२॥तुझिया गानें संभाषणें । भ्रूविक्षेपनिरीक्षणें । सविलास अपांगमोक्षणें । अभेद रमणें अनुभविलें ॥२३॥सुरतस्मरण रतिकीर्तन । सहचरक्रीडा गुह्य भाषण । ईक्षण संकल्प उद्योग पूर्ण । क्रिया आचरण आठवें ॥२४॥सुरत भूमिका इया अष्ट । सप्तधा रमविलों आम्ही स्पष्ट । तेणें जालों ज्या संतुष्ट । त्या नचखों कष्ट भवयोग ॥५२५॥जेव्हां भोगिलें तवांघ्रिसुख । तैंहूनि भवसुखीं जालों विमुख । देहबुद्धीचा मोडूनि अंक । विषया सम्मुख न ठाकों ॥२६॥सहस्रदळींचें अमृतपान । प्राशिलें लाहोनि राकारमण । ते केंवि सेविती स्वाधिष्ठान । पुढती परतोन प्रियत्वें ॥२७॥तेंवि तुच्छ जे विषयाभास । ते काय पुरविती आमुची आस । यालागीं सापेक्ष रमा ज्यास । अधरामृतास त्या पाजी ॥२८॥तव पदसौभाग्य अति विचित्र । ब्रह्मादि सभाग्य सुर सर्वत्र । अपेक्षेचे होती पात्र । त्यांमाजि किंमात्र वधूगणही ॥२९॥श्रीर्यत्पदांबुजरजश्चकमे तुलस्या लब्ध्वापि बक्षसि पदं किल भृत्यजुष्टम् ।यस्याः स्ववीक्षणकृतेऽन्यसुरप्रयासस्तद्वद्वयं च तव पादरजः प्रपन्नाः ॥३७॥तुझिया वक्षःस्थळाच्या ठायीं । सापत्नभावरहित पाहीं । स्थानसंपन्न असतांही । पुन्हा लक्ष्मीही सकाम ॥५३०॥तुळसी सेवी चरणकमळ । तिसी पदरज लाभले अमळ । लक्ष्मी म्हणे मज वक्षःस्थळ । न रुचे केवळ कोरडें ॥३१॥शोकें मेला दशरथ पिता । हृदय न द्रवेचि तत्त्वता । अनारस वनीं त्यजिली कांता । परम कठिनता हृत्कमळीं ॥३२॥सीता आक्रंदे नानापरी । हृदय न द्रवेचि तिळभरी । देवकीवसुदेव कारागारीं । त्यागूनि कांतारीं क्रीडतसे ॥३३॥भवविरक्त शरणागत । देखोनि त्यांचा होय आप्त । त्यांच्या पोष्याचा आकांत । देखोनि हृदयांत द्रवेना ॥३४॥ऐसें कठोर हृदयस्थान । मज जोडलें असपत्न । तुळसी सेविजे श्रीचरण । अक्षयकल्याण ज्यां योगें ॥५३५॥चरणशौचोद्भवा गंगा । भुवनत्रयाधनिदाघभंगा । कलिमलमथनीं पीयूषौघा । सुकृतामोघा प्रसविती ॥३६॥पदरज वंदिती सुरवर । हृदयीं ब्राह्मणलत्ताप्रहार । पादार्चनें तुलसी सधर । मज हें कठोर हृत्कमळ ॥३७॥ऐसी लक्ष्मी हृदयवासा । विटोनि तुळसेशीं सापत्न्यईर्ष्या । चाळी सकाम पदरजलेशा । परमपुरुषा ज्या तुझिया ॥३८॥समस्तदेवकीं सेविलें असतां । परी न पवेचि जे सामान्यता । ऐसी अमोघ सौभाग्यता । तव पदरजाआंतौती ॥३९॥पदरजवाहिनी सरित्प्रवरा । सेव्य चराचर नीचतरां । तथापि वरिष्ठां विधिहरसुरां । कल्याणसारा स्पृहणीय ॥५४०॥ना तरी जीवन मशकादि सर्व । सेविती लहान थोर जीव । म्हणोनि न पवेचि गौणत्व । वरगौरव अमृतत्वें ॥४१॥तेंवि पदरज सर्व सेवकीं । सेविलें अभीष्टार्थकामुकीं । उणीव न पडे गौरवामुखीं । स्वसुखोद्रेकीं अगाध ॥४२॥नर सुर मुनिवर पुरंदर । दैत्य दानव विधिशंकर । ब्रह्मांडवासी लहानथोर । तपश्चर्यापर सर्वदा ॥४३॥म्हणसी सुकृता जैं सीग चढे । तैं कृपेनें आम्हांकडे । अल्प ही लक्ष्मीची दृष्टि पडे । ऐसें जोडे कैं भाग्यें ॥४४॥म्हणोनि तयाचे प्रयास । इच्छूनि जयेचा कटाक्ष । सर्वीं सर्वत्र सर्वांस । ते श्रीही सापेक्ष पदरजा ॥५४५॥तैशाच आम्हीही रानटा । जात्या गौणा अबळा घुरटा । परंतु तव पदरजलंपटा । झालों अदृष्टाचेनि बळें ॥४६॥आम्हां तव पदशरणागतां । तव गायनें मन्मथतप्तां । नुपेक्षूनियां कमलाकांता । करीं सनाथा निजदास्यें ॥४७॥तन्नः प्रसीद वृजिनार्दन तेंऽघ्रिमूलं प्राप्ता विसृज्य वसतीस्त्वदुपासनाशा । तत्सुंदरस्मितनिरीक्षणतीव्रकामतप्तात्मनां पुरुषभूषण देहि दास्यम् ॥३८॥वृजिनार्दन या संबोधनें । संबोधिती मृदुभाषणें । कीं हें नाम यथार्थ करणें । आमुचें हरणें दुर्वृजिन ॥४८॥ऐकोनि क्लेशनाशन नामा । आम्हीं विरहिणी सकामा । टाकूनि आलों तव पदपद्मा । तस्मात् आम्हां नुपेक्षीं ॥४९॥जैसे तापत्रयसंतप्त । योगी संसारी विरक्त । त्यागूनि येती गृहधनसुत । आम्ही तद्वत पातलों ॥५५०॥तव दास्याच्री धरूनि आशा । पतिपुत्रालयधनादि पाशां । खंडूनि आलिया उपहासा । न करूनि दास्या देइजे ॥५१॥कोणें बोलाविलें तुम्हां । जरी तूं म्हंणसी नरललामा । तरी तुझिया सुंदर श्रीमुखपद्मा । पाहतां आम्हां स्मर जाळी ॥५२॥जया मुखकमळाच्या ठायीं । सुंदर सस्मित ईक्षण पाहीं । पाहतां कामाग्नीची खाई । आमुच्या देहीं प्रज्वळली ॥५३॥यास्तव तुझें चरणमूळ । टाकूनि आलों उताविळ । तूं सर्वज्ञ श्रीगोपाळ । हरिसी तळमळ निजदास्यें ॥५४॥दास्यार्पणें आश्वासून । आमुचें मानस निववीं पूर्ण । वृजिनार्दन हें अभिधान । यथार्थ करूनि मिरवावें ॥५५५॥म्हणसी आपुलालिये सदनीं । पतिसेवनें गृहस्वामिनी । त्या किमर्थ दास्याचरणीं । दासी होऊनि प्रवर्त्ततां ॥५६॥वीक्ष्यालकाव्रुतमुखं तव कुंडलश्रीगंडस्थलाधरसुधं हसितावलोकम् ।दत्ताभयं च भुजदंडयुगं विलोक्य वक्षः श्रियैकरमणं च भवाम दास्यः ॥३९॥तरी ऐकें गा भुवनैकपाळा । लवण सान्निध्य पावतां जळा । जेंवि न रखवें मर्यादवेळा । इच्छी एकवळा द्रवोनी ॥५७॥हो कां धातूमाजि कठिन । स्वकांताचें सन्निधान । होतां लोह वेधें पूर्ण । चंचळ होऊन अनुसरे ॥५८॥कठोर पाषाणाची जाति । परी सोमदर्शनें सोमकांतीं । द्रवोनि होय जलोत्पत्ति । हे स्वयंभस्थिति नैसर्गिक ॥५९॥तेंवि आम्ही पतिव्रता । स्वाश्रमीं स्वधर्मनिरता । ऐकोनि तुझिया वेणुगीता । झालों विरक्ता भवभानीं ॥५६०॥वेणुध्वनि पडतां श्रवणीं । तेणें मानस आकर्षूनी । तीव्रवेधें आणिलें वनीं । तव दर्शनीं मेळविलें ॥६१॥भ्रमरभासुर चाचर कुरळ । निडळीं श्रवणीं कुंतळ कुटिळ । कुंडलमंडित गंडस्थळ । श्रीमुखकमळ तद्युक्त ॥६२॥भ्रू व्यंकटा विलासचलिता । त्रपाद्योतक अपांगसहिता । अधरसुधेशीं मंदस्मिता । पाहतां चित्ता नुरणूक ॥६३॥व्रजजनासि अभयदान । करूनि धरिला गोवर्धन । अमरां निर्भयता वोपून । केलें मथन क्षीरोदा ॥६४॥कीं गजेंद्राची देखोनि ग्लानि । अभया उदित सायुधपाणि । कीं रसातळा जातां धरणी । अभयदानी जे बाहु ॥५६५॥ऐसें तुझें भुजदंडयुगळ । विस्तीर्ण सुपीन वक्षःस्थळ । कमलारतिरसजननस्थळ । देखोनि विव्हळ पैं आम्ही ॥६६॥सुंदर अवयव सालंकृत । सत्रप गायन स्मित इंगित । देखोनि भावी आमुचें चित्त । दासी समस्त व्हावया ॥६७॥औपपत्य जुगप्सित । म्हणोनि निंदिसी जारसुरत । यदर्थीं ऐकें आमुचें गदित । इत्थंभूत विवरूनी ॥६८॥का स्त्र्यंग ते कलपदामृतवेणुगीतसंमोहितार्यचरितान्न चरेत्त्रिलोक्याम् ।त्रैलोक्यसौभगमिदं च निरीक्ष्य रूपं यद्गोद्विजद्रुममृगाः पुलकान्यबिभ्रन् ॥४०॥कोमलसंबोधनें म्हणती अंग । तुझें वेणुगीत ऐकोनि सांग । नोहे कोणाचा व्रतभंग । श्रवणीं अनुराग उपजोनी ॥६९०॥षड्ज ऋषभ आणि गांधार । मध्यम पंचम धैवत स्वर । निषादांत मंद्रतार । मानप्रकार त्रिवसनें ॥५७०॥स्वरकंपितें मूर्च्छनाभेदें । वेणुगीतामृतकलपदें । तालबद्ध संगीत छंदें । हास्यविनोदें विन्यासें ॥७१॥न भुलोनि कोणती पतिव्रता । राहे रक्षूनि आर्यचरिता । ऐसी न सृजीच विधाता । जे तव गीता न भाळे ॥७२॥भूमि सकाम रोमांचित । द्यौ द्रवोनि अमृत स्रवत । समस्त सरिता प्रवाहरहित । पवनीं स्तिमित चंचलता ॥७३॥भानुबृहद्भानूंची प्रभा । दाहकपणें न चढे क्षोभा । स्वद्योतकता दावी शोभा । गगनगर्भाआंतौती ॥७४॥स्वाराज्यवैराज्यादि पदें । सांडूनि लक्ष्मी येथेंचि नांदे । ह्रीही विलसे कटाक्षमोदें । सांडूनि नुसधें रौद्रत्व ॥५७५॥बुद्धि बोधली नादसुखा । परतोनि नोहे विधिसम्मुखा । ज्योत्स्ना रंगली मुखमयंका । अधरपीयूखा भाळोनी ॥७६॥अमोघ कंदर्पाची कांति । सर्वात्मकत्वें भाळली रति । क्षमादयाशांतिप्रभृति । तरळताती पदपद्मीं ॥७७॥निर्जर मुनिवर गोप सकळ । त्यांच्या पत्न्या आम्ही केवळ । हरिपदलाभा भूमंडळ । ब्रह्मवरें पावलों ॥७८॥आतां त्रिजगीं कोण वधु । तव गायनें न पवोनि वेधु । अचल आर्यव्रतस्था शुद्धु । दावी सावधु भवभानी ॥७९॥मदनमोहना भुलल्या कांता । हें आश्चर्य नव्हे कीं तत्त्वता । पुरुष सकाम वेणुगीता । भुलले तत्त्वता स्थिरचर ॥५८०॥त्रैलोक्यसौभाग्यनिधान । तें लक्षूनि तव लावण्य । धेनु वृषभ ऊर्ध्ववदन । पुच्छें वाहून तटस्थ ॥८१॥पुरुषप्रकृति पक्षिजाति । वेणुगायनें तटस्थवृत्ति । भासती लिखितचित्राकृति । वेधकशक्ति हे तुझी ॥८२॥वीरुध तरुवर वल्लरी । सर्व वेधलीं वनांतरीं । टवकारलीं पुष्पीं पत्रीं । सप्रेमधारीं द्रवताती ॥८३॥कुरंगेंसहित कुरंगीगण । पसरूनि सुंदर विशाळ नयन । प्राशन करिती तव लावण्य । सबाह्य विसरून तनुभावा ॥८४॥अजा अविकें व्याघ्र वृक । मशक शशक सर्प वृश्चिक । तरस र्हीस कपि जंबुक । सात्त्विकाष्टक प्रकटिती ॥५८५॥जेणें तव रूपद्योतना । प्रकटे ऐसिया ऐकोनि गाना । ताटस्थ्य त्रिजगाच्या तनुमना । किमुत अंगना विरहिणी ॥८६॥आतां निश्चय हाचि हरि । दोष न ठेवूनियां शिरीं । इतुकी प्रार्थना मान्य करीं । जाणोनि किंकरी व्रजललना ॥८७॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP