मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| श्लोक २७ ते ३० अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - श्लोक २७ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २७ ते ३० Translation - भाषांतर श्रवणाद्दर्शनाद्ध्यानान्मयि भावोऽनुकीर्तनात् । न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो गृहान् ॥२७॥अचिंत्यैश्वर्यगुणकीर्तनें । विविधावतारीं विविधाचरणें । माझीं पुण्यश्रवणकीर्तनें । अंतःकरणें विवरितां ॥३८५॥श्रवण करितां माझी कीर्ति । मद्रूपीं उपरम पावे वृत्ति । सहजचि विवर्ता निवृत्ति । चित्सुखावाप्ति अनायासें ॥८६॥सगुण निर्गुण मद्दर्शन । हृदयीं ठसावतांचि पूर्ण । उडोनि जाय प्रपंचभान । नयनीं चिद्घन प्रकाशे ॥८७॥जिकडे जिकडे फांके दृष्टि । तिकडे तिकडे सच्चित्सुखाची वृष्टि । अधोर्ध्व सभोंवता पोटीं । सुखसंतुष्टी मी प्रकटें ॥८८॥मजवीण भिन्न असावें कांहीं । तरी त्याचें दर्शन घडावें कहीं । दृश्यकल्पना नाथिली पाहीं । मनाच्या ठायीं प्रतिभासे ॥८९॥मी अद्वैतसुखाची खाणी । जिहीं विश्वासें रंगोनि श्रवणीं । प्रेमा धरिला मद्दर्शनीं । त्यांचे नयनीं प्रकाशें ॥२९०॥मद्दर्शनें उठाउठीं । ध्यानानंद उथळे पोटीं । माझी सगुणमूर्ति गोमटी । प्रकटे सृष्टी सबाह्य ॥९१॥श्याम राजीवलोचन । ठाणमाण गुणलक्षण । रूपरेखा लावण्यपूर्ण । वेधें तनु मन पालटी ॥९२॥देह होय स्तब्धीभूत । चित्त चैत्नयीं विरोनि जात । तैं मग अक्षय सुख एकांत । होय संप्राप्त अबला हो ॥९३॥विशेष काय सांगूं गोठी । वास्तव माझें आस्तिक्य पोटीं । सप्रेम बाणल्या तेंचि वोठीं । कीर्तनपरिपाटीं विस्तारे ॥९४॥आवडतयाची काहणी । वाखाणितां न पुरे धणी । श्रवणीं सादर होतां कोण्ही । न पुरे शिराणी कथनाची ॥३९५॥कृष्ण ऐकावा पहावा । सालंकृत सहावयवा । माजि उभा ठाके आडवा । जो आठवा देवकीचा ॥९६॥सालंकृत ठाणठकारें । आठवे तैसा ध्यानीं भरे । ध्यानसुखाच्या आविष्कारें । विषयीं झांसुरे तद्वेधें ॥९७॥कन्या आवडती दूरदेशीं । माता बोळवी सासुरियासी । मग ते आठवे निजमानसीं । मोहें पिशी तद्वेधें ॥९८॥अवचित भासे दृष्टीपुढें । स्वप्नीं संवादीं पवाडे । तिचें बोलणें कानीं पडे । म्हणोनि वावडे पाहावया ॥९९॥मुखें आळवूं जाय सुनां । तंव तिचेंचि नां ये वदना । खातां जेवितां प्राशितां जीवना । विसर पडेना तियेचा ॥४००॥तैसी असतां सन्निधानीं । अवस्थातून नोहे जननी । पढियें प्रेम दृष्टांतकथनीं । घातलें श्रवणीं प्राकृत ॥१॥आत्मप्रियत्वें विश्वप्रिय । तें वेधकत्व कथिजे काय । तो जगदात्मा मी स्वयें । अपैता होय सप्रेमें ॥२॥सन्निधानें तैसा न फवें । यालागीं परतोनि गृहा जावें । श्रवणें ध्यानें सप्रेमभावें । मज चिंतावें हृतकमळीं ॥३॥तृषिता धेनु गंगातटीं । बळें मुरडितां मारूनि काठी । कीं भणगा उठवी बैसल्या ताटी । त्याहूनि कष्टी वधू होती ॥४॥श्रीशुक उवाच :- इति विप्रयमाकर्ण्य गोप्यो गोविंदभाषितम् ।विषण्णा भग्नसंकल्पाश्चिंतामापुर्दुरत्ययाम् ॥२८॥श्रुतिस्मृत्यर्थधर्मवचनें । कृष्णप्राप्तीसि करिती विघ्नें । तें विषतुल्य ऐकोनि मनें । दुस्तर चिंता पावलीं ॥४०५॥स्वमुखें गोविंदें निगदिलें । परतोनि सदना जाणें कथिलें । वियोगदुःख दुणाविलें । तेणें मानस भंगलें गोपींचें ॥६॥भंगोनि गेला मनोरथ । दुस्तर चिंता जाली प्राप्त । करपद अवयव जाले श्लथ । निश्चेष्टित तनुभाव ॥७॥सखेद त्यांचीं तनुलक्षणें । शुकें परीक्षितीकारणें । कथिलीं तैसीं ऐका मनें । सावधपणें श्रोते हो ॥८॥कृत्वा मुखान्यव शुचः श्वसनेन शुष्यद्बिंबाधराणि चरणेन भुवं लिखंत्यः ।अस्रैरुपात्तमषिभिः कुचकुंकुमानि तस्थुर्मुजंत्य उरुदुःखभराः स्म तूष्णीम् ॥२९॥मोडली आनंदाची हाव । स्मृति विसरली शरीरभाव । विकळ इंद्रियांचा गांव । भीरु स्वभाव उमटले ॥९॥प्रतिकूळ उत्तरीं अभ्यंतर । तापतां श्वास सांडिती तीव्र । त्यांचिये वाफे बिंबाधर । परम सकुमार वाळले ॥४१०॥परम कोमळ गोपीहृदयें । कृष्णीं सन्निग्ध नवनीतप्रायें । विरहतापें द्रवतां होये । चक्षुप्रवाहें बाष्पांबु ॥११॥तेंअप्रतीकार सकज्जल । वक्षःस्थळीं सशोक जळ । सकुंकुम कुचमंडळ । पडतां केवळ क्षाळलें ॥१२॥अंगकांति पांडुरवर्ण । शोकें गौरता जाली लीन । त्रिवेणी ऐसी हृदयावरून । असितअरुणश्वेतौघा ॥१३॥पहातां उघडीं दिसतीं बुबुळें । आकर्ण कुरंगी सदृश डोळे । ढळमळां स्रवती सशोक जळें । अचळमौळें जेंवि घनीं ॥१४॥स्तिमितदृष्टि झाल्या नयनीं । अपांग मूर्च्छित मानसग्लानि । विमुखरूपाभिज्ञत्वगुणीं । प्रतिमापाषाणीं समसाम्य ॥४१५॥चरणांगुष्ठें भूतळीं रेखा । विस्मृतीमाजी वोढिती देखा । जाणों आय्ष्या करूनि लेखा । अवशिष्ट घटिका मोजिती ॥१६॥मेरूपासूनि ज्यांचा भार । ऐसिया दुःखाचे डोंगर । खचोनि पडले अनावर । त्यांहूनि सुभर सक्लेश ॥१७॥ऐशा ठकल्या मुहूर्तमात्र । प्रेमसंरंभा प्रजागर । तेणें परिमार्जूनि नेत्र । उदितां उत्तर द्यावया ॥१८॥प्रेष्ठं प्रियेतरमिव प्रतिभाषमाणं कृष्णं तदर्थविनिवर्तितसर्वकामाः ॥नेत्रे विमृज्य रुदितोपहते स्म किंचित्संरंभगद्गदगिरोऽब्रुवतानुरक्ताः ॥३०॥शुक म्हणे गा परीक्षिति । किमर्थ गोपींची सकोपवृत्ति । झाली म्हणसी तरी तुजप्रति । कथितों निगुती तें ऐक ॥१९॥ज्याचे प्राप्तीलागीं आम्ही । विरक्ता जालों सर्वकामीं । सांडूनि सुत धन सदन स्वामी । चरणपद्मीं अनुरक्ता ॥४२०॥ऐसा प्रियतम आम्हांसि कृष्ण । करितां अप्रिय संभाषण । तेणें मानस जालें उष्ण । करिती स्फुंदन सद्गदिता ॥२१॥आदरीं देखून अनादर । अमर्ष उधवूं पाहे शिर । परी कृष्णीं रंगलें अभ्यंतर । तें निष्ठुर हो न शकें ॥२२॥सव्रीडदंपतीबुझावणी । करूं येती शेजारणी । दुःखे क्रोधोर्मि तेंवि उशिणी । अंतःकरणीं ऊठिली ॥२३॥जेणें भंगे प्रेमलाभ । तैसा सैराट न करी क्षोभ । वाढवी प्रेमाचें वालभ । म्हणिजे संरंभ तो कोप ॥२४॥तैसिया कोपें सकोपिष्ठा । नेत्र पुसूनि सद्गदकंठा । विरहें लज्जा विसरूनि धीटा । बोलती प्रेष्ठा कृष्णाशीं ॥४२५॥ज्या भाषणें उपजे हर्ष । विरोनि जाय क्रोधावेश । भाषणरूपें तें पीयूष । येर सदोष विषतुल्य ॥२६॥ऐसें भाषण जयापाशीं । त्रिजगत्प्रियतम मानी त्यासी । वृथा जल्पूनि गुणदोषांसी । मूर्खा जगेंशीं वैरस्य ॥२७॥तैशा नव्हती व्रजकामिनी । श्रुतिमनोज्ञप्रियभाषिणी । प्रेमा प्रकटूनि अंतःकरणीं । सकोप कृष्णीं अनुरक्ता ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP