मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| श्लोक २६ अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - श्लोक २६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा अध्याय २९ वा - श्लोक २६ Translation - भाषांतर अस्वर्ग्यमयशस्यं च फल्गु कृच्छ्रं भयावहम् । जुगुप्सितं च सर्वत्र औपपत्यं कुलस्त्रियः ॥२६॥न प्रबोधी सत्यहित । कपटी दुरात्मा तो निश्चित । त्याहूनि तरुवरांशीं एकांत । करितां प्राप्त सुखलाभ ॥३०५॥म्हणोनि श्रीकृष्ण जगद्गुरु । बोधी यथार्थ शास्त्रविचारु । त्यासि प्राकृत जे म्हणती जार । नरक अघोर त्या होती ॥६॥उपपतीपासूनि सुख भोगणें । औपपत्य हें त्यांतें म्हणणें । स्वर्गसुकृतापासूनि च्यवणें । तें या कारणें अस्वर्ग्य ॥७॥जगीं इहलोकीं छीथू घडे । पूर्वजमाळा नरकीं पडे । गोत्रसुहृदादिकां नवडे । वदनाकडे न पाहती ॥८॥उपपति जो जारपुरुष । त्यासि करावया संतोष । अहोरात्र तनुसंक्लेश । करितां यश नुपलभे ॥९॥जारपुरुषाचे मातापितर । स्वजन सुहृद जाया श्वसुर । क्रूरभावें करितां वैर । परी जार समोर त्यां न वदे ॥३१०॥परस्परें न शकती पाहों । धणीवरी एकांतीं न लाहती राहों । विश्वशत्रुत्वें हृदयीं भेवो । भुजगा भुजंगा सारिखा ॥११॥आवडती गोष्टी सांगावया । उमसू न लाहे जारजाया । भये सर्व जगाचिया । मिळणी ठाया न लभती ॥१२॥सांदीकोंदीमाजि रातीं । सर्वा वंचूनि कैतववृत्ती । सभय मिळणी उपदंपती । अथवा दूतीप्रसंगें ॥१३॥अल्प अवकाश सांपडे । सांचल होतां सुरत विघडे । अभीष्टसुखावाप्ति न घडे । सान्निध्य थोडें बहुक्लेशीं ॥१४॥कैंची शय्या सुमनोहर । सदीप एकांत मंदिर । गीत तांबूल अन्योपचार । भाषणीं चोर परस्परें ॥३१५॥दर्शन स्पर्शन गुह्यभाषण । मिथः अवयवनिरीक्षण । नीवेमोक्षण कुचमर्दन । चुंबनालिंगन अष्टधा ॥१६॥सुरतीं पूर्वांगें हीं अष्ट । उत्तर मैथुनादिकें अष्ट । अंगलालन दशनदष्ट । न घडे यथेष्ट जारत्वें ॥१७॥फल्गु म्हणिजे तुच्छप्राय । फावलें तितुकें भोगिलें जाय । तितुक्यासाठीं सोसणें घाय । करितां उपाय मिळणीचे ॥१८॥ध्वांक्ष जैसा गृहस्थद्वारीं । त्यक्तबळीचें भक्षण करी । मार्जारश्वानादिभय अंतरीं । जार त्यापरी साशंक ॥१९॥जारिणी जालिया गरोदर । जार न करी गर्भसंस्कार । भयें उद्विग्न उभयांतर । दोहदोपचार मग कैंचे ॥३२०॥प्रवासीं अथवा परलोकवासीं । वियोग असतं भर्ताराशीं । नारी रमोनि जारपुरुषीं । धरी गर्भासी दैवबळें ॥२१॥ सती प्रयत्नीं साक्षेप गर्भ । शिणतां तयेसी तो दुर्लभ । स्वैरिणी चुकवितां अलभ्यलाभ । एनसकोंभ उदया ये ॥२२॥जैंहुनी गर्भ राहे पोटीं । तैंहुनी उभयतां हिंपुटीं । जुगुप्सितत्वें प्राणसंकटीं । होती कष्टी विश्वभयें ॥२३॥वदों न शकती कोण्हापाशीं । पुसों न लागती उपायासी । विंचुवें खादल्या चोराऐसीं । निजमानसीं मिडकती ॥२४॥उभयतांचें सौजन्य तुटे । वदती परस्परें - वोखटें । कर्म वोडवलें म्हणती खोटें । दुर्घट खोटें आठवलें ॥३२५॥ऐसीं शिणती परस्परीं । तेथ डोहळ्यांची कवण्परी । स्रावपतनादिप्रकारीं । यत्नें अंतरीं झुरताती ॥२६॥स्रावपतनकर्मीं प्रवीणा । कुंटिणी जारिणी वैद्यां निपुणा । शेकमूळिका भेषजें नाना । नवस नवसिती पष्टिके ॥२७॥डोहळ्यांची ऐशी रीती । श्रमतां जैं होय गर्भोपहति । तैं त्या पापें नरकावाप्ति । यालागीं म्हणती अस्वर्ग्य ॥२८॥श्रमतां पतनगर्भा न घडे । तैं लौकिक सोहळा वाढे । डोहळे प्रकट चहूंकडे । वाद्यघोषें नृपदंडें ॥२९॥दीर्घताडन बीभत्सवपन । रासभयान पण्यभ्रमण । शकृन्मूत्रपुरीषसेचन । पादत्राणस्रक्भूषा ॥३३०॥औपपत्य हें पातित्य । सर्वीं सर्वत्र जुगुप्सित । कुलस्त्रियांसि नोहे उचित । म्हणे भगवंत गोपींतें ॥३१॥श्रोतीं आक्षेप केला येथ । अवंचक कृष्णाचा परमार्थ । तो काय हा विषयस्वार्थ । भोगें कृतार्थ नरनारी ॥३२॥तरी हे न कीजे येथ शंका । कृष्ण न बोधी विषय निका । येथींचा गूढार्थ ठावुका । होय त्या विवेका अवधारा ॥३३॥स्वर्ग म्हणिजे सुकृतफळ । तें निर्विषय सुख केवळ । विषयसुखीं दुःख बहळ । स्वर्गीं नरकीं समसाम्य ॥३४॥हृदयस्थ निजात्मा मुख्यपति । स्वर्गसुखद तेथींची रति । बाह्य समस्त येर उपपति । हो कां भूपति सुर सिद्ध ॥३३५॥प्रथम पति मरोनि गेला । द्वितीय गांधर्वविवाह केला । त्यासि म्हणती निजदादुला । चाळिती पहिला विधिवाद ॥३६॥चोरूनि रमतां म्हणती जार । गांधर्वविवाहीं उजागर । एवं भलतैसा संसार । म्हणती चतुर चालों द्या ॥३७॥विभांडकानें धर्मपत्नी । कोण्या सूत्रें पाणिग्रहणीं । केव्हां परिणिली होती हरिणी । जेथ शृंगमुनि जन्मविला ॥३८॥किंवा वासवी पराशरें । कैं परिणिली विधिविचारें । जीचे जठरींच्या व्यासकुमरें । त्रिजग सारें धवळिलें ॥३९॥मैत्रावरुणि वशिष्ठागस्ति । कोठें गर्गाची उत्पत्ति । सौभरिमुनिची संतति । कोणती सती करगृहीता ॥३४०॥एवं यथार्थ भगवदुक्ति । ब्रह्मजिज्ञासा मुख्यश्रुति । तदनुष्ठानीं नाहीं शक्ति । धर्मप्रवृत्ति त्यां कथिली ॥४१॥‘ लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा ’ । ज्ञानें सांख्यांची प्रतिष्ठा । विषयासक्तां कर्मचेष्टा । कथिला गोमटा कर्मयोग ॥४२॥आत्मपतीचें न फवे सुख । म्हणोनि बाह्य हें औपपतिक । गांधर्वविवाह परी चोख । विषयात्मक विध्युक्त ॥४३॥अभेद भोगितां आत्मरति । द्वैतबोधाची उपशांति । द्वैतावेगळी अपयशोऽवाप्ति । कोण्हाप्रति तें सांगा ॥४४॥येरां सुरनरां विषयसिद्धि । साधितां युद्धीं अथवा वादीं । जय पराजय सर्वां बाधीं । द्वैत उपाधीमाजिवडा ॥३४५॥फल्गु म्हणिजे तुच्छ अल्प । तें हें विषयसुखाचि स्वल्प । याज्ञिक श्रुतीचा करूनि जल्प । यज्ञें त्रिविष्टप आश्रयिती ॥४६॥तेथ न पुरतां विषय असोसी । पुन्हा पचती गर्भवासीं । स्वर्ग्य कीं अस्वर्ग्य म्हणिजे यासी । एवं विषयांसि तुच्छत्व ॥४७॥कृच्छ्र म्हणिजे कष्टें साध्य । तें विषसुखाचि दुराराध्य । याचा अनुभव सर्वां प्रसिद्ध न लगे प्रबोध करावा ॥४८॥बाईल मिळतां संतोष वाटे । संसार करितां अपान फाटे । विषय मानूनि गोमटे । दुःखें दुर्घटें भोगिती ॥४९॥जाया जोडली उर्वशीऐसी । परी उकरडां रमतां नये तिशीं । म्हणोनि करितां मंदिरासी । बहुतां क्लेशीं जांचिजे ॥३५०॥जाती उखळें मुसळें खुंटे । सुपें टोपली पाटे परोटे । झाडणी केरसुण्या खराटे । भिंती दारवंटे कवाडें ॥५१॥एवं अल्प सुखासाठीं । ऐशा अपार दुःखकोटी । क्षुधे तृषेची जांचणी मोठी । दुर्लभ गोठी मिळणीची ॥५२॥यात्रा वाणिज्य सेवामिसें । रोषें तोषें दोषें प्रवासें । रोगें दारिद्र्यें विद्याभ्यासें । वियोग आपैसे ठाकती ॥५३॥आपण स्त्रियेचा म्हणवी स्वामी । पोटार्थ विकूनि घे आणिके धामीं । मग तो देहपति आपुले सद्मीं । आस्यकर्मीं प्रवर्तवी ॥५४॥स्त्रियेचा म्हणवी स्वयें दादुला । आपण येरांची बाईल झाला । पोटें ऐसा विलंब केला । निर्लज्जाला सुख वाटे ॥३५५॥याहूनि धन्य तिर्यग्योनि । विषय भोगिती स्वाधीनपणीं । कोणाअधीन न होती कोण्ही । भूजलगगनीं स्वच्छंदें ॥५६॥नरदेहींच्या विशेष ज्ञानें । कळतां वेदशास्त्रपुराणें । पोटासाठीं विकोनि घेणें । बाईल होणें आणीकांची ॥५७॥पुरुषा पढियंती अंतुरी । ते पोष्याची धुर धरी । तेंवि सर्व कार्यें जो आवरी । तो सेवकाशिरीं प्रधान ॥५८॥प्राधान्याचें महत्त्व आलें । भूषण मिरवी येणें बोले । पोटासाठीं आयुष्य गेलें । विकोनि घेतलें हें न कळे ॥५९॥त्याहूनि मळहारक बरा । मूर्खपणें तो निदसुरा । येर्हवीं करील जरी स्वविचारा । तरि संसारा जिंतील ॥३६०॥च्यारी घटिका मलापहरणीं । उरला काळ स्वाधीनपणीं । सप्रेम नाम स्मरेल वाणी । तरि दुर्योनि चुकवील ॥६१॥त्याहूनि गौण प्राधान्य कर्म । शरीरवाङ्मन अविश्रम । अहोरात्र सम विषम । प्रपंच अधम उपसावा ॥६२॥एवं स्वहिताची बोहरी । विषयस्वार्थें केली पुरी । त्या विषयार्थ झुरे अंतरीं । विपत्ति पदरीं बहुसाल ॥६३॥करितां बहुतांचें न्यून पूर्ण । छिद्र लक्षून ते करिती विघ्न । कारागार दीर्घ ताडन । धनापहरण दुर्दशा ॥६४॥धनिक म्हणती सधन आम्ही । स्वतंत्र धनसदनाचे स्वामी । संपन्न संतति हेमीं धामीं । ललनाललामीं सुख भोगूं ॥३६५॥धनाचा करितां त्या आयव्यय । होय आयुष्याचा क्षय । राजिक दैविक गोत्रज भय । दस्युस्तेयनृपदंडें ॥६६॥देवढीलाभें करूनि खत । हातीचें देऊनि देखत देखत । रडों लागती विख्यात । खत दुखवत क्षणक्षणा ॥६७॥पुढील मुदती भंगोनि गेली । खतेंवेदना बहुत केली । रागें चुलीस पाणी घाली । धरणी घेतली तद्द्वारीं ॥६८॥रोगी चंडिकेचिये द्वारीं । उपासपारणीं जैसा करी । तैसा अधमर्णाचिये घरीं । बैसे निर्धारीं खतेला ॥६९॥वेसीस बांधिजे म्हणती दुःख । तैसे भवंते मिळती लोक । निळे पाय काळें मुख । सांगोनि विवेक करा म्हणती ॥३७०॥श्यांस शेळी लक्षांस गाय । एक सांगती हा उपाय । मुळीं मुदलासीच नाहीं ठाय । तेथ व्याज काय पाहतां ॥७१॥ऐसीं ऐकतां पंचाइती । क्षोभें भडका उपजे चित्तीं । तंव एक बोलती पक्षपाती । नृपाप्रति हें कथिजे ॥७२॥राया वोपूनि चतुर्थ भाग । सवृद्धि द्रय गणूनि सांग । घेईजे हा उपाय चांग । करिती दीर्घ प्रयत्न ॥७३॥तंव ते राजद्वारीचें जन । देखोनि सधन उत्तमर्ण । लांच मागती निर्भर्त्सून । करिती छलन न देतां ॥७४॥एवं सधनाचिये पाठीं । ऐशा अनेक दुःखकोटी । केउती विषयसुखाची गोठी । सर्वदा पोटीं धनचिंता ॥३७५॥असत्यवादी कळींचे जन । धन बुडविती विश्वासून । जन्मांतरीं त्यांचें श्वान । होऊनि ऋण मग घेती ॥७६॥पश्वादि दासी स्त्री बाळक । अधमर्णाचे होती धनिक । भूनिक्षेपावरी पन्नक । होती अचुक धनलोभें ॥७७॥एवं विषयाची सामग्रीं । सुखार्थ भुलवूनि घाली घोरीं । यातना जन्मजन्मांतरीं । कैंची संसारीं मग सुटिका ॥७८॥म्हणाल स्त्रियांसि कथिला धर्म । पुरुषार्थाचें कां घेतां नाम । तरी ज्यांसि कामाचा संभ्रम । त्या सर्वही सकाम कामिनी ॥७९॥पुरुष निःसंग उदासीन । निर्विकार निरभिमान । निष्प्रपंच स्वगत पूर्ण । नित्य निर्गुण निष्काम ॥३८०॥येर अवघीच प्रकृति । तदंश अनेक अविद्याव्यक्ति । कामिनी म्हणून कामासक्ति । निजात्मरति त्यां कैंची ॥८१॥म्हणोनि जुगुप्सित औपपतिक । सांडूनि बाह्यविषयसुख । पुरुष सेविजे अंतर्मुख । ऐसा विवेक हरि बोधी ॥८२॥तो मी पुरुष अभ्यंतरीं । दुष्प्राप असतां प्रेमा भारी । सगुण सुलभत्वें संसारीं । घडे व्यवहारीं अवज्ञा ॥८३॥म्हणोनि गोपींसी म्हणे हरि । परतोनि जावें आपुले घरीं । स्वकांत सेवितां शास्त्रनिर्धारीं । प्रेमा मजवरी असों द्या ॥८४॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP