मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २० वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय २० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय २० वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर प्रावृट्श्रियं च तां वीक्ष्य सर्वभूतमुदावहाम् । भगवान् पूजयांचक्रे आत्मशक्त्युपबृंहिताम् ॥३१॥ऐसा कृष्ण भोजनकाळीं । गोपगोधना न्याहाळी । प्रावृट्श्रियेची नव्हाळी । तोषबहळीं अवलोकी ॥२३५॥सप्त श्लोकीं निरूपण । केलें प्रावृट्श्रीवर्णन । भूतमात्रा सुखसंपन्न । पाहोनि कृष्ण तोषला ॥३६॥षड्गुणैश्वर्याचा राशि । तो श्रीकृष्ण व्रजनिवासी । जाणोनि स्वशक्तिविशेषीं । प्रावृट्श्रियेसी गौरवी ॥३७॥म्हणे धन्य हे प्रावृटशोभा । सर्वं जंतूंसी वल्लभा । द्यावाभूमीसहित नभा । कंदर्पशोभा पाववी ॥३८॥जें सुख दंपतीमाझारीं । रमतां उधळे सप्रेमभरीं । तें सुख सर्वांचे अंतरीं । ओपी श्रीहरि प्रावृटीं ॥३९॥प्रावृट्कथन संपल्यावरी । पुढें शरत्काळाची थोरी । अठरा श्लोकीं शुकवैखरी । कथी ते चतुरीं परिसिजे ॥२४०॥एवं निवसतोस्तस्मिन् रामकेशवयोर्व्रजे । शरत्समभवद्व्यभ्रा स्वच्छांब्वपरुषानिला ॥३२॥एवं पूर्वोक्त क्रीडापर । राम आणि मुरलीधर । व्रजीं वसतां निरंतर । शरद्वासर पातला ॥४१॥विगतअभ्र झालें नभ । स्वच्छ शीतळ सर्व अंब । अमृतोपम काश्मीरप्रभ । जें दुर्लभ वसंतीं ॥४२॥वर्षाकाळींचा प्रबळ वात । शरद्वासरीं झाला शांत । वाहे सुखरूप निवांत । भूतां विपरीत न स्पर्शे ॥४३॥शरदा नीरजोत्पत्त्या नीराणि प्रकृतिं ययुः । भ्रष्टानामिव चेतांसि पुनर्योगनिषेवया ॥३३॥जियेंकरूनि नीरजोत्पत्ति । तिये शरदेची संप्राप्ति । जाणोनि नीरें निजप्रकृति । स्वादें येती स्वच्छत्वें ॥४४॥योगभ्रष्टाचें जैसें चित्त । कामक्षोभें होय उपहत । विषयाचरणीं मग उत्पथ । अव्यावस्थ अनर्गळ ॥२४५॥पुन्हा मुरडूनि योगाभ्यासें । हृदयकमळाच्या विकाशें । निजप्रकृति भजतां जैसें । तुळे अकाशें सुशांत ॥४६॥व्योम्नोऽब्दं भूतशाबल्यं भुवः पंकमपां मलम् । शरज्जहाराश्रमिणां कृष्णे भक्तिर्यथाऽशुभम् ॥३४॥आकाशादि चारी भूतें । वर्षाकाळीं मलाभिभूतें । शरद् निर्मळ करी त्यांतें । जेवीं आश्रमातें हरिभक्ति ॥४७॥योगसिद्धीचें अनुष्ठान । कपिलमुनीचें जैसें मन । नेणे संकल्पविकल्पस्फुरण । तैसें गगन निर्मेघ ॥४८॥अभ्रपटुळें वायु पाणी । विद्युल्लतेची झळकणी । पंचभूतांची हे मिळणी । निर्मळपणीं तैं निवडे ॥४९॥भूतशाबल्य म्हणिजे यासी । शरत्स्वागमनें ते निरसी । आणि पार्थिवा कर्दमा शोषी । करी आपासी सोज्वळ ॥२५०॥ब्रह्मचारी गृहनिवासी । वनस्थ आणि चौथा संन्यासी । कृष्णभक्ति या चौघां जैशी । श्रमापासूनि सोडवी ॥५१॥नानाश्रमें वेदाध्ययन । करूनि कीजे पाणिग्रहण । षट्कर्मांचें अनुष्ठान । व्रताचरण कर्कष ॥५२॥विरक्ति तये ठायीं नुपजे । तैं मग वनस्थ होइजे । परम दुर्घट कर्म जें जें । तें आचरिजे तये ठायीं ॥५३॥तेथही न लभतां आत्मरति । तैं चौथा आश्रम होइजे यति । देहीं वृद्धाप्यें न थरे शक्ति । होय विपत्ति आचरतां ॥५४॥त्या चौघांसि विश्रांति - । दायक जैशी श्रीकृष्णभक्ति । सप्रेम करितां निजात्मरति । चौघे पावती अक्लेशें ॥२५५॥तयापरी शरत्काळ । चौ भूतांचा निरसी मळ । अमळ करी ब्रह्मांडगोळ । भजनशीळ ज्यापरी ॥५६॥सर्वस्वं जलदा हित्वा विरेजुः शुभ्रवर्चसः । यथा त्यक्तैषणाः शांता मुनियो मुक्तकिल्बिषाः ॥३५॥जंववरी सजळ असती घन । तंववरी दिसती कृष्णवर्ण । सांडितां सर्वस्व जीवन । शुभ्र संपूर्ण शोभती ॥५७॥पुत्रवित्तलोकेषणा । त्यागितां प्रवृत्तिवासना । मुक्तकिल्बिष योगी जाणा । उपमा घना शरदुत्था ॥५८॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP