मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २० वा| श्लोक २१ ते २५ अध्याय २० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय २० वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर पीत्वाऽपः पादपाः पद्भिरासन्नानात्ममूर्तयः । प्राक् क्षामास्तपसा श्रांता यथा कामाऽनुसेवया ॥२१॥वर्षाकाळीं स्वैर आप । चरणें प्राशिती पादप । तेणें होती अनेकरूप । करिती व्याप सभंवतां ॥१५५॥मुळियांप्रति फुटती कोंभ । सरळ सरकोनि आक्रमिती नभ । पूर्विला ऐसेचि स्वयंभ । लांब लांब बहु होती ॥५६॥पूर्वतापें पानें झडलीं । उष्णें आहळोनि खांकरलीं । वृष्टिभरें पुन्हा झालीं । फांपावलीं बहु वृक्षीं ॥५७॥सकाम तापस जैसे क्षाम । क्षुधे तृषेचे साहतां श्रम । कृछ्रादि अनेक चाळितां नेम । अभीष्टकाम लाभती ॥५८॥पूर्वीं एकाकी निस्पृह । वनौकस अपरिग्रह । तपें पूर्ण संकीर्ण देह । त्यांसि उत्साह फळलाभीं ॥५९॥मग अनेक देहवंत । होऊनि होती कामासक्त । तपें क्लेशाचें सुकृत । स्वेच्छा तेथ भोगिती ॥१६०॥तैसा अवृष्टीचा ताप । सांडोनि प्राशितां वृष्टिआप । होती एकाचे अमूप । वनीं पादप सुरवाडे ॥६१॥सरस्स्वशांतरोधस्सु न्यूषुरंगापि सारसाः । गृहेष्वशांतकृत्येषु ग्राम्या इव दुराशयाः ॥२२॥वर्षाकाळीं सरिता सरें । पूरें दाटती वृष्टिभरें । तेथें बुडोनि पूर्वींचीं तीरें । नवीं दुस्तरें उमटती ॥६२॥कंटक कर्दम ओसाण । समल जळें बहळ फेण । तथापि चक्रवाकांचे गण । सुख न पावोन वसताती ॥६३॥जैसे गृहाश्रमी गृहासक्त । नाहीं झाले तृष्णारहित । त्यांचीं गृहेंचि आशाकृत् । घालिती नित्य दुर्भरीं ॥६४॥व्यवहारीं साधिजे वृत्ति भूमि । शत्रु जिंकावे संग्रामीं । देवता वश कीजे नेमीं । यथाकामीं फलदात्री ॥१६५॥लहान वाडा कीजे थोर । तन्हार मोडून धवलार । दृढ पाषाणीं प्राकार । बांधोनि सधर होइजे ॥६६॥पारद औषधिसाधन । धातुवादाचें कांचन । करावया दीर्घ यत्न । नित्य नूतन आरंभीं ॥६७॥ऐशीं अनेक दीर्घ कृत्यें । सिधि न पावोनि अशांतें । तृष्णाभरें गृहस्थातें । कवळूनि दुःखांत पाडिती ॥६८॥इत्यादि कर्में सिद्धीस जावीं । मग गृहकृत्यें शांत व्हावीं । हे तो मिथ्या उठाठेवी । ग्राम्यां गोवी दुर्लोभें ॥६९॥दुष्टकर्माचे संस्कार । तेणें विषयकामीं भर । दुराशयवंत नर । दुःखी अपार गृहवासी ॥१७०॥तैसीं सारसें सरितातटें । कंटककर्दमफेणपुंजितें । जरी सुखाचा लेश न वटे । तरी उपविष्टे संक्लेश ॥७१॥अंग म्हणोनि संबोधून । शुकें रायासि इतुकें कथून । पुढें म्हणे सावधान । प्रावृड्वर्णन अवधारीं ॥७२॥जलौघैर्निरभिद्यंत सेवतो वर्षतीश्वरे । पाखंडिनामसद्वादैर्वेदमार्गाः कलौ यथा ॥२३॥जैसा प्रवर्तलिया कलिकाळ । बलिष्ठ पाखंडियांचा मेळ । असद्वादें महाकुटिळ । भंगिती समूळ सन्मार्ग ॥७३॥वर्षाकाळींचे उत्तरमेघ । इंद्र वर्षतां क्षोभती ओघ । सेतु भंगितां पावती भंग । जनपदमार्ग तद्योगें ॥७४॥निंदूनि वेदविहिताचार । बळें प्रशंसिती अभिचार । क्षुद्र दावोनि चमत्कार । सिद्धि अघोर साबरी ॥१७५॥रोगहरणीं कां संतानीं । धनागमनीं नृपसन्मानीं । इत्यादि लोभें प्रलोभवोनी । दुष्टाचरणीं घालिती ॥७६॥जारणमारण स्तंभन । वशीकरण मोहन उच्चाटन । क्षणिक सामर्थ्य दावून । आज्ञानजन भुलविती ॥७७॥महातमी जे मांगभाव । पाखंडरूपी आघवी माव । भोंवाळ करूनि घरींचे देव । बोधूनि अभाव सांडविती ॥७८॥रोधूनि वेदविहिताचार । बळेंचि प्रशंसिती अवसर । ऐसे अनेक पाखंडभार । श्रोती अनखर न मनावे ॥७९॥सांडूनि वेदविहिताचरण । अविधि वेषाचें धारण । तितुक्या वेषें पाखंडगण । किती म्हणोन निवडावे ॥१८०॥जटी मुंडी लुंचितकेश । राउळपगरे बीभत्सवेष । विष्णुशिवशक्तिगणेश - । भजनावेश पाखंडी ॥८१॥हाडें कातडीं घालिती गळां । एक घालिती कवडेमाळा । एक कंठीं बांधती शिळा । म्हणती आगळा शिवमार्ग ॥८२॥अष्टादशयातिजन । दीक्षा देऊनि करिती पवन । वेष दिधल्या न दिसे भिन्न । अवघें लिंगा न सोंवळें ॥८३॥ऐसें जितुके वेषधारी । यातिकुळापासूनि दूरी । वर्णाश्रमाची बोहरी । दुराचार सहजेंची ॥८४॥बाह्य महती वाढवून । शिष्यमांदी मेळवून । शिश्नोदरपरायण । ते पाखंड मान्य कळिकाळीं ॥१८५॥श्रोतयांमाजीं कांहीं कांहीं । असतां ऐसे संप्रदायी । क्षोभें विषादा न योन तिहीं । विचार हृदयीं विवरावा ॥८६॥ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । ऐसे चारी वर्ण मात्र । प्रसवे आदिपुरुषाचें गात्र । संततिगोत्र मग याचे ॥८७॥विलोमानुलोमसंचारें । विहिताविहित उत्पथाचारें । जरीम पावले जात्यंतरें । मुळींचे खरे चौघे कीं ॥८८॥लक्षचौर्यांशीं भेद गणितें । झालीं भौतिकें अनंतें । तरी मुळींचीं पंचभूतें । निजअंशातें भजताती ॥८९॥तैसें न भजोनि वेदविहिता । अनुसरोनि पाखंडमता । वरपडे होती जे दुष्पथा । क्षणिक स्वार्था भुलोनी ॥१९०॥परी हे कळीचेनि क्षोभें । भांबावती क्षणिक लोभें । एर्हवीं अदृष्टावीण न लभे । दुष्पठवालभें धुंडितां ॥९१॥एवं कळीकाळीं पाखंडगण । श्रुतिसेतूचें खंडन । करिती तैसे वर्षतां घन । सेतुभंजन जलओघें ॥९२॥व्यमुंचन् वायुभिर्नुन्ना भूतेभ्योऽथामृतं घनाः । यथाऽऽशिषो विश्पतयः काले काले द्विजेरिताः ॥२४॥सुवावो ढळोनी वळती मेघ । यथाकाळें सुवृष्टि चांग । भूतांकारणें अमृतभाग । ओपिती सांग प्रावृटीं ॥९३॥जळ नव्हे तें अमृतपान । भूतांकारणें आप्यायन । येर दुर्वातें अकाळघन । भूतनाशन विषवृष्टि ॥९४॥तैसे न होती सुवासयुक्त । भूतांकारणें ओपिती अमृत । जैसे सुब्राह्मणसुप्रणीत । आशीर्वाद नृपातें ॥१९५॥अनध्यायपरित्याग । करूनि वेदपठन सांग । वेदविहिताचार मार्ग । जे अव्यंग आचरती ॥९६॥तया द्विजां प्रेमार्चनें । यथाभीष्ट पदार्थदानें । संतोषोनि आशीर्वचनें । पूजकाकारणें देती ते ॥९७॥यथाकाळीं कामप्रद । तयांचे होती आशीर्वाद । प्रजापाळकां भूपां विशद । तैसें अंबुद भूतांते ॥९८॥प्रावृट्शोभा एथवरी । शुकें वर्णूनि सविस्तरीं । आतां ते वनीं कैसा हरि । क्रीडे ते परी निरूपी ॥९९॥एवं वनं तद्वर्षिष्ठं पक्कखर्जूरजंबूमत् । गोगोपालैर्वृतो रंतुं सबलः प्राविशद्धरिः ॥२५॥एथूनि सप्तश्लोकावधि । प्रावृट्काळींची क्रीडाविधि । वर्णिता होय शुक सुबुद्धि श्रोता गुणाब्धि परीक्षिति ॥२००॥एवं पूर्वोक्त प्रावृट् परमा । तेणें ऋतुमती कानपरमा । देखोनि सगोप कृष्णरामा । अद्भुत प्रेमा क्रीडावया ॥१॥वन विशिष्टसमृद्धिमंत । पक्क खर्जूरी मघमघित । सफळित जंबुवृक्ष जेथ । लता अनंत पुष्पिता ॥२॥मोहरें लगडलिया धात्री । हेमप्रभा सफळकारी । तिंदुक धामणी फळभारीं । रानवोरी मोहरल्या ॥३॥कपित्थ बिल्व कोमळफळीं । सेव सौवीर फांपावल्या कर्पूर कदळी । नारिकेली क्रमुकादि ॥४॥द्राक्षा मरीच लवंगतिका । जाती यूथिका मालतिका । बकुळी पुन्नाग नागलतिका । नागचंपक फूलले ॥२०५॥बलभद्रेंशीं नंदकुमार । भंवता गोपाळांचा भार । शोभाढ्य देखोनि कांतार । क्रीडापर प्रवेशला ॥६॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP