मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २० वा| आरंभ अध्याय २० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय २० वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगोविंदसद्गुरवे नमः । परमपुरुषा मंगलमूर्ति । अमलैश्वर्य अमलकीर्ति । अखिल अमरां चक्रवर्ती । भवावर्ती तारक तूं ॥१॥अविद्यापूर्यष्टकनिवासी । पुरुषशब्दें बोलिजे त्यासी । ऐशिया जीवचैतन्यासी । गर्भवासासी घडामोडी ॥२॥तैसेंचि प्रकृतिपुर्यष्टक । जे कां अविद्या निषेधक । तदभिमानी सर्वात्मक । सर्वज्ञापक सर्वेश ॥३॥शुद्धसत्त्वात्मकपुरीं । सर्वैश्वर्यता शेजारीं स्वप्नें देखे निद्राभरीं । नानावतारीं अवनार्थ ॥४॥जीवशिवां समा निद । तरी विद्याअविद्यांमाजीं कें भेद । ऐसें म्हणाल तरी अनुवाद । येथींचा विशद परियेसा ॥५॥जीव अविद्यानिद्राभरें । दुःस्वप्नींचीं दुःकें घोरें । भोगितां चौर्यांशीं लक्ष फेरे । खातां वोथरे वोसणाय ॥६॥शुद्धसंकल्पइच्छावशें । ध्यानशेजे शिव प्रवेशे । आवड तया प्रपंचवेशें । सुखें संतोषें सर्वदा ॥७॥स्वेच्छा कल्पनाध्यानशील । म्हणोनि दुःखाचा नेणे मळ । येर प्रपंच गोंधळ । दोघां केवळ सरिसाची ॥८॥आपुलें ओझें घेतां शिरीं । अथवा धरिलिया बिगारी । एक सुखी स्वसत्ताभरीं । येरु घोरीं पराधीनु ॥९॥ऐशिया जीवेश्वराचा ईश । यालागीं तूं परमपुरुष । अमंगळाचा नाहीं स्पर्श । पूर्ण परेश परब्रह्म ॥१०॥ज्ञानाज्ञान उभय भ्रम । निरसूनि सोलीव परब्रह्म । करिशी जैसें हेमीं हेम । रूप नाम समरसतां ॥११॥स्वगतभेदाची आइती । तेचि अमंगळाची व्यक्ति । अभेद तो तूं मंगलमूर्ति । द्वैतस्फूर्ति नातळतां ॥१२॥स्वगतभेदाचा उजळे अंक । तोचि अमंगळ भेद कलंक । अमल ऐश्वर्य निष्कलंक । नित्य निष्टंक गुरुवर्या ॥१३॥अमल तव कीर्तिमंदाकिनी । उगमा येऊनि प्रवाहे वदनीं । श्रवणें पठनें मनोमज्जनीं । मलक्षालनीं पटुतरा ॥१४॥तो तूं सद्गुरु अमलकीर्ति । अमरनियंता वेदविहितीं । अमरकरणचक्रवर्ती । आत्मस्थिति स्वसत्ता ॥१५॥होणें जाणें नवीन कांहीं । भवाप्ययांचे बुडती गेहीं । त्यांसि कवळूनि स्वस्मृतिबाहीं । होसी लवलाहीं तारक तूं ॥१६॥जीवेश्वरत्वें कलंक । विद्या अविद्या उभयात्मक । तें तूं फेडूनि कंचुक । करिसी आत्म्यैक्य स्वबोधें ॥१७॥एवं जीवशिवोद्धरणा । गोकुळेश्वरा गोरक्षणा । करिसी म्हणोनि चरणस्मरणा । ओपीं करुणावत्सला ॥१८॥निखिल चाळितां करणवृंद । चराचरीं अमरवरद । एकचि सद्गुरु गोविंद । तारक स्वपदभजकांसी ॥१९॥जंव जंव पदपल्लवां न शिवे । तंत्र तंव आवर्ती पडिजे जीवें । तें घडलियां मग आघवें । होय ठावें वावसें ॥२०॥म्हणोनि तुझिया वरतळीं । शक्र विरिंचि चंद्रमौळी । तो तूं सुलभ सप्रेमळीं । गोगोपाळीं गोविंदा ॥२१॥परी मी विकळ शरीरधर्मीं । धिंवसा धरूनि श्रीपादपद्मीं । अनुसरलोंसें विगतकामीं । तें तूं स्वामी जाणसी ॥२२॥बालक कांहींच न करी धंदा । निजाचरणें ओपी खेदा । परस्परें मुखारविंदा । पाहोनि मोदा पावती ॥२३॥इतुकिया भांडवला ऋणी । वांचूनि दिला दास्याचरणीं । देवें स्वशरणातें चरणीं । अंगीकरणीं नुबगावें ॥२४॥ऐसें ऐकोनि म्हणती गुरु । न धरीं भेदभावाचा पदरु । अभेदबोधें परमादरु । आरब्धग्रंथीं वाढवीं ॥२५॥वरदाज्ञेची पूर्णिमा । दयार्णवीं वाढवी प्रेमा । प्रज्ञाकल्लोळ कवळी व्योमा । कथनधर्मा प्रवर्ते ॥२६॥आतां विसाव्यामाझारीं । रामगोपांसहित हरि । प्रावृट्काळीं क्रीडा करी । कोणें प्रकारीं तें ऐका ॥२७॥प्रथम चोवीस श्लोकीं जाण । प्रावृट्काळाचें वर्णन । सप्तश्लोकीं हरिक्रीडन । शेष कथन शरच्छ्री ॥२८॥त्यागा दानगुणीं उपमा । प्रावृट्शरदृतूची परमा । वर्णी अद्भुतऐश्वर्यगरिमा । कृष्णपरमात्मा क्रीडतां ॥२९॥इतुकी कथा श्रीशुकमुनि । सांगेल परीक्षितीलागूनी । तेंचि श्रोतीं ये व्याख्यानीं । सादर होऊनि परिसिजे ॥३०॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP