मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक २९ ते ३० अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक २९ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २९ ते ३० Translation - भाषांतर अथापि ते देव पदांबुजद्वयप्रसादलेशानुगृहीत एव हि ।जनाति तत्त्वं भगवन्महिम्नो न चान्य एकोऽपि चिरं विचिन्वन् ॥२९॥यद्यपि ज्ञानें सुलभ मोक्ष । तरी तो न पवतीच मुमुक्ष । जंव नादरिती भक्तिपक्ष । तंव अपरोक्ष दुर्लभ ॥७४॥न होतां राजयाची राणी । राणीव नोहे कीं लाहणी । तैसा मोक्ष वेगळेपणीं । विभक्तज्ञानी न पवती ॥६७५॥चिन्मात्रस्वरूप जो तूं स्वयें । त्या तुझे चरणांबुजद्वय । त्याचिया प्रसादलेशानुग्रहें । लाहें सोय तव महिमेची ॥७६॥व्यतिरेकबोध म्हणिजे ज्ञान । अन्वयबोधा भक्ति अभिधान । अन्वयाबोध तें प्रपंच भान । अबोधज्ञान गाढमूढ ॥७७॥अबोधपूर्वक अन्यथा बोध । या नांव भवाब्धि अगाध । केवळ व्यतिरेकें या बाध । करितां प्रबुद्ध न तरती ॥७८॥तेथ अनन्यभक्ति केवळ नौका । आबाळ सुबोधा भाविकां । निस्तरूनि भवाब्धि असिका । निर्वानसुखा पाववी ॥७९॥केवळ भक्ति तें अभेदज्ञान । ब्रह्मान्वयेंचि अखिलात्मभजन । न स्फुरेचि भेदभान । समाधिव्युत्थानवर्जित ॥६८०॥सिद्धि नाडिती योगाभ्यास । शास्त्रज्ञानें होती राक्षस । अभेदभक्ति स्वप्रकाश । नित्य निर्दोष सुखरूप ॥८१॥वासुदेवः सर्वमिति । हे अन्वयात्मक चौथी भक्ति । इयेवांचूनि ज्ञानें मुक्ति । कोणी न पवती व्यतिरेकें ॥८२॥यो मामेवमसंमूढ । मज सर्वगतातें जाणे दृढ । तोचि सर्वज्ञांमाजि प्रौढ । सर्वभावें रूढ मद्भजनीं ॥८३॥ऐशा अनेक श्रुति स्मृति । आणि माझी स्वप्रतीति । लोकोत्तर रूढ ख्याति । जे अभेदभक्ति मोक्षद ॥८४॥पदाब्जप्रसादलेशानुग्रहें । परतत्त्वमहिमा विदित होय । भगवन्महिमेची हे सोय । उमजे अन्वयें तुझेनी ॥६८५॥ज्ञानयोगें कर्में चवती । ऐसें देखिलें ऐकिलें बहुतीं । परी भक्तिमार्गें पावले च्युति । हें नाहीं श्रुतिस्मृतिपुराणीं ॥८६॥तुझें सांडूनि हें अन्वयभजन । कोणी चिरकाळ सज्ञान । अतद्व्यावृत्तीकरून । भवनिरसन करितांहि ॥८७॥शास्त्रविचारें तत्त्व कळे । परी आत्मत्वीं जीवदशा न वळे । अध्यस्त अहंता कैशी गळे । हें वर्म न कळे पंडितां ॥८८॥चिरकाळ व्यतिरेकविवरण करिती । शेवटीं व्युत्पत्ति अवघी रिती । त्वंपद प्रसन्नज्योति । जंव भवराती निरसीना ॥८९॥देव म्हणोनि संबोधन । कीं तों स्वभक्ता द्योतमान । होऊनि भवतम अज्ञान । निरसूनि चैतन्य उजळिसी ॥६९०॥ऐसा भजनभाग्यमहिमा । कैं मी लाहेन म्हणे ब्रह्मा । यदर्थ विनवूनि पुरुषोत्तमा । मागे प्रेमा श्रीचरणीं ॥९१॥तदस्तु मे नाथ स भूरिभागो भवेऽत्र वाऽन्यत्र तु वा तिरश्चाम् ।येनाहमेकोऽपि भवज्जनानां भूत्वा निषेवे तव पादपल्लवम् ॥३०॥ब्रह्मा म्हणे जी देशिकोत्तमा । तो हा भक्तिभाग्यमहिमा । मज असो जी मेघश्यामा । जेणें श्रीपादप्रेमा मी लाहें ॥९२॥तो तूं प्रेमा म्हणसी कैसा । जो येथ प्रत्यक्ष देखिला जैसा । सुलभ होऊनि अबळां सरिसा । क्रीडसी परेशा ज्या प्रेमें ॥९३॥सनकादिकां दुर्लभ भेटी । तो तूं बळेंचि झोंबसी कंठीं । स्तन्य मागसी महाहठीं । प्रेमासाठीं गोपीच्या ॥९४॥ध्यानीं योगियां नाकळसी । तो तूं चोरूनि गोरस खाशी । रमा साशंक पदसेवेसी । तो पृष्ठीं वाहसी संवगडियां ॥६९५॥तुझिया वक्रभृकुटीपुढें । जळती अनंतकोटिब्रह्मांडें । त्या तुज गोपी मारितां रडें । दाऊनि बापुडें मुख करिसी ॥९६॥योगयागतपांच्या कोटि । साधितां कैवल्याचिये मुकुटीं । अन्वयभक्ति लाभल्या मिठी । पडें संसाटीं या प्रेमा ॥९७॥तरी या सप्रेमभाग्यलाभा । मी याचक पद्मनाभा । तुझिया प्रेमळा वालभा - । माजिं उभा मज करीं ॥९८॥तुझिये उदरीं माझें जन्म । परी हें दुर्लभ मजला प्रेम । तरी येचि जन्मीं माझा काम । उत्तमोत्तम हा पुरवीं ॥९९॥म्हणसी ब्रह्मा तूं पदाभिमानी । योग्य नव्हेसि सप्रेमभजनीं । तरी मज वोपीं तिर्यग्योनि । अथवा कोणी मनुजादि ॥७००॥तुझिये अभेदभक्ती पुढें । ब्रह्मपदवी मज नावडे । जैसें शृंगारिलें मढें । तैसें कुडें वैभव हें ॥१॥याहूनि सामान्य प्राणिमात्र । त्यामाजि देऊनि एक गात्र । तव जनासि पाडूनि मैत्र । करीं पात्र प्रेमाचें ॥२॥जेणें करूनि तुझिया जना - । माजीं येखादा जनार्दना । होऊनि सेवीं सप्रेम खुणा । तुझिया चरणा तें करीं ॥३॥तुझेनि प्रेमभावें तुझिया । दासांलागीं दासांचिया । प्रेमें भजें मी ऐशिया । भाग्यलेशा मज देईं ॥४॥पारमेष्ठ्यादिदेवताजन्मा - । पासूनि भक्तिमंता योनि अधमा । त्याचि उत्तमाहूनि उत्तमोत्तमा । स्तवी ब्रह्मा औत्सुक्यें ॥७०५॥ब्रह्मादि जन्माहूनि श्रेष्ठ । भक्तिभाग्य परम वरिष्ठ । हें सप्त श्लोकीं वर्णी स्पष्ट । ............... असतां ही ॥६॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP