मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ६ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ Translation - भाषांतर तथाऽपि भूमन्महिमागुणस्य ते विबोद्धुमर्हत्यमलांतरात्मभिः । अविक्रियात्स्वानुभवादरूपतो ह्यनन्यबोध्यात्मतया न चान्यथा ॥६॥यद्यपि दुर्बोध निर्गुणसगुण । तथापि एदांतवाक्यांवरून । शुद्ध साधका उपजे निर्गुण । परी अगाधपण सगुणाचें ॥२७॥ब्रह्मा म्हणे भो अपरिच्छिन्ना । अचिंत्यानंतगुणपरिपूर्णा । गुणागुणादि अधिष्ठाना । नित्य निर्गुणा सगुणात्मका ॥२८॥तूं जो निर्गुण परब्रह्म । त्या तुज जाणती साधुसत्तम । सम्यक नियमूनि इंद्रियग्राम । चित्तोपरम साधूनी ॥२९॥विषयाभास जो विवर्त । वेदांतगुरुवाक्यें तो अनित्य । बोधें उपरम पावे चित्त । होती निवृत्त इंद्रियें ॥२३०॥मोडतां प्राणांची प्रवृत्ति । क्षुधा तृषादि मांदुळती । इंद्रियांच्या अमल वृत्ति । आत्मस्थिति संप्राप्त ॥३१॥आत्मानुबह्वें लाचावलीं । इंद्रियें अपरोक्ष ज्ञानाथिलीं । पुढती विवर्तोन्मुखही झालीं । विषयीं भुलविलीं न वचती ॥३२॥तेव्हां शुद्ध अंतर्वृत्ति । इंद्रियद्वारा प्रकाशती । मग ते आंतील आत्मस्थिति । बाह्यप्रवृत्तीमाजीं प्रकटे ॥३३॥अंतरीं असतां विषयकाम । इंद्रियद्वारां कामिनीप्रेम । तेथ प्रकटतां आत्माराम । सबाह्य ब्रह्म सहजची ॥३४॥ज्यासि अंतरीं लिपिज्ञान । तो पुस्तकाचें करी पठन । अज्ञान तो पुस्तकपर्ण । मानूनि तृण उपेक्षी ॥२३५॥असतां शुद्ध चैतन्यघन । इंद्रियद्वारा विपरीत ज्ञान । जगदाकारें विषयस्फुरण । भवबंधन भोगवी ॥३६॥तेथ विपरीत बोधाच्या निरासें । सबाह्य ब्रह्मचि प्रकाशे । अनादि भ्रमाचें निरसल्या पिसें । गोचर दिसे ब्रह्मची ॥३७॥ऐशिया साधनप्रसंगीं । निर्गुण आंगवूं शकती योगी । अथवा विशुद्धसाधकांलागीं । बोधवूं शकती कदाचित ॥३८॥अथवा विशुद्ध कुशाग्रबुद्धि । जाणों शकती शास्त्रविधि । ऐशी निर्गुणाची उपलब्धि । घडों निरवधि शकेल ॥३९॥अथवा निर्गुणाचें महिमान । स्वसुखानुभवेंकरून । जाणों शकती योगिजन । समरसोन तादात्म्यें ॥२४०॥चक्रवर्तीं कां दिवस्पति । जेथींचा आनंद नेणती । एकांतवासी तो भोगिती । तादात्म्यवृत्ति मुनिवर्यं ॥४१॥शोकमोहातीत तोष । निरुपाधिक नित्य निर्दोष । तादात्म्यवगमें पुरुष । जाणों शके एखादा ॥४२॥एथ शंका करिजेल ऐशी । सविकारता अंतःकरणासी । आत्माकारता घडे कैशी । एतद्विषयीं अवधारा ॥४३॥विकार म्हणिजे विशेषाकार । मनादि संकल्पव्यापार । निर्विकल्प निर्विकार । आत्माकार ते स्थिति ॥४४॥इंद्रियांविषय जेवीं आकळे । तैसा अंतःकरणा आत्मा कळे । तरी परब्रह्मीं केवळें दूषण आलें विषयत्वें ॥२४५॥एथ रूपमात्र विषयग्रहण । अरूपतः पदेंकरून । वृत्तितादात्म्य निर्दूषण । फळीं दूषण विधि वदला ॥४६॥वृत्तिरूप अंतःकरण । ब्रह्माकारा करीत पूर्ण । ब्रह्मानुभव तो निर्दूषण । सदूषण फलविषयें ॥४७॥म्हणाल फलविषय तो कैसा । वेगळेपणें भोगिजे तोषा । ध्याता ध्येय कीं लक्षी लक्षा । इत्यादि सदोषा सारिखा ॥४८॥एथ शंका करिती कोणी । उन्हा स्फूर्ति उठे कोठूनी । अनन्य बोध्या सवते करूनी । पद्मयोनि परिहारी ॥४९॥जळामाजीं जळकल्लोळ । अग्निमाजीं अग्नीज्वाळ । तेवीं स्वसंवेद्य स्फूर्तिरोळ । अनन्य केवळ आत्मत्वीं ॥२५०॥ऐसे निर्गुणरूप हरि । जाणों शकिजे निर्विकारी । परी या सगुणरूपाची थोरी । बहुता परी अगाध ॥५१॥सर्वांहूनि अंतरंग । रमा सेविजे अर्धांग । तीसही निर्गुणस्वरूपीं लाग । नव्हे अव्यंग जाणावया ॥५२॥जे गुणत्रयाची जनयित्री । नामरूपांची अधिष्ठात्री । तेही अमलेंद्रियीं पवित्रीं । नोहेचि ज्ञात्री पृथक्त्वें ॥५३॥नित्य निरामय निर्गुण । अनंत अपार पूर्णपण । वास्तव जाणावया आंगवण । अशक्य जाण कमळेसी ॥५४॥मग ते स्वमाननिवृत्तिकाळीं । भेदें न उरोनि वेगळी । जेवीं लहरी सिंधुजळीं । मिळोनि गेली ऐक्यत्वें ॥२५५॥अनन्य होवोनि अनन्य योगें । समरसोनी जाय आंगें । स्वगतादि त्रिविधभेदभंगें । निजोनि जागे अवाच्य ॥५६॥सगुण अगाध कैसें म्हणसी । ऐकें भगवंता येविशीं । अनंतगुणप्रचुरतेशीं । अंत कोणासी न लागे ॥५७॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP