मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक १० ते १३ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक १० ते १३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १० ते १३ Translation - भाषांतर अतः क्षमस्वाच्युत मे रजोभुवो ह्यजानतस्त्वत्पृथगीशमानिनः । अजाऽवलेपांधतमोंऽधचक्षुष एषोऽनुकंप्यो मयि नाथवानिति ॥१०॥ऐसा अपराध माझा हरि । तो तूं आतां क्षमा करीं । भ्रांत नोहें मी यावरी । हें मुरारी प्रार्थितों ॥९२॥रजोगुणीं माझे जन्म । तेथ नियुक्त सृजनकर्म । तेणें बहळ अज्ञानतम । ऐकें वर्म तयाचें ॥९३॥सृष्टिकर्ता मी ईश्वर । अजत्वाचा अहंकार । तेणें मदें झांकले नेत्र । पडला अंधार मूढत्वें ॥९४॥ऐसा झालों अज्ञानपात्र । भंगोनि गेलें स्मरणसूत्र । जगत्कर्ता सर्वेश्वर । तो मी स्वतंत्र सर्वाद्य ॥२९५॥पृथक्पदाभिमानेंकरून । येथ करूं आलों छळण । तो अपराध क्षमा करून । किंकरजन रक्षावा ॥९६॥ऐकें सर्वज्ञचूडामणि । आतां ऐसें मज तूं मानीं । माझेनि सनाथ किंकरगणीं । असतां मूर्ध्नि मी तुझे ॥९७॥शिरीं असतां मी हृषीकेश । केवळ ब्रह्मा सनाथ दास । अर्ह मानी अनुकंपेस । कृतागस न म्हणूनी ॥९८॥झणें तूं म्हणसी कमलापति । तूंही ब्रह्मा ब्रह्मांडमूर्ति । क्षमापनीं कां करिसी विनति । तरी यादर्थीं परिसावें ॥९९॥क्काहं तमोमहदहंखचराग्निवार्भूसंवेष्टितांडघटसप्तवितस्तिकायः । क्केदृग्विधाविगणितांडपराणुचर्यावाताध्वरोमविवरस्य च ते महित्वम् ॥११॥अव्याकृत बोलिजे तम । महत् हिरण्यगर्भा जाण । अहंकार तो त्रिगुणोद्गम । विराट परम बोलिजे ॥३००॥ख तें नभ चर तो अनिळ । अग्नि स्पष्ट वारि सलिल । भू ते धरणिच केवळ । ब्रह्मांड गोळ अष्टधा ॥१॥अष्टधाप्रकृतिवेष्टित घट । स्वमानें सात वितीच प्रकट । माझा काय अति लघिष्ट । कोठें फलकट मेरूसी ॥२॥तुझें महित्व कोणीकडे । ऐशीं अगणितें ब्रह्माडें । परमाणु मांदियाचेनि पाडें । भ्रमणीं पडे धुळोरा ॥३॥रोमकूपाच्या वातायनीं । ऐशा फिरती ब्रह्मांडश्रेणी । माझी गणना कोणे स्थानीं । चक्रपाणि ते ठायीं ॥४॥तुच्छाहूनि तुच्छतर । कृतागस लघु किंकर । जाणोनि कृपार्ह अनुचर । अंगीकार करावा ॥३०५॥किमर्थ करणें अनार्यक्षमा । ऐसें न म्हणावें परमात्मा । स्वगर्भस्थां जाणोनि आम्हां । सोढव्यमहिमा प्रकटावी ॥६॥उत्क्षेपणं गर्भगतस्य पादयोः किं कल्पते मातुरधोऽक्षजागसे ।किमस्तिनास्तिव्यपदेशभूषितं तवास्ति कुक्षेः कियदप्यनन्तः ॥१२॥प्रत्यक्ष पाहें अधोक्षजा । लौकिका ही जननी प्रजा । गर्भीं वाहतां बरवे वोजा । साहती सहजा जोजारा ॥७॥गर्भगताचे पादोत्क्षेप । मातृक्रोधासि कारणरूप । होती ऐसा हा विकल्प । कोणी अल्प जल्पती ॥८॥हें काय घडे जी मुरारि । मा आम्ही तो तुझिये उदरीं । गर्भगतचि सचराचरीं । पैं निर्धारीं असिजेत ॥९॥अस्ति नास्ति उभय भाग । नित्यानित्यात्मक जें जग । भावाभाव द्विविध आंग । वसती चांग तव कुक्षीं ॥३१०॥अवघें स्थूळसूक्ष्मादिक । कार्यकारण पृथक् एक । भूतभविष्य स्थित प्रमुख । ज्ञानाज्ञान वाच्यादि ॥११॥इत्यादि शब्दीं जें अभिहित । वेदशास्त्रीं प्रभूषित । कृत्स्न तें तव कुक्षिगत । कीं अए किंचित बाहेरी ॥१२॥सर्वही तुझ्या अभ्यंतरीं । नुरे कांहींच बाहेरी । स्वगर्भस्था माझेनि हरि । क्षमा करीं अपराध ॥१३॥एवं गर्भगतत्व आपुलें । सामान्यत्वें प्रतिपादिलें । आतां पुत्रत्व विशेष आलें । प्रकट केलें ते ऐका ॥१४॥जगत्त्रयांतोदधिसंप्लवोदे नारायणस्योदरनाभिनालात् ।विनिर्गतोऽजस्विति वाङ् न वै मृषा किंत्वीश्वर त्वन्न विनिर्गतोऽस्मि ॥१३॥ब्रह्मा म्हणे जगदीश्वरा । आपले पोटींचिया लेंकरा । सर्वान्याय क्षमा करा । हें दातारा प्रार्थितों ॥३१५॥जगत्त्रयाचे प्रलयकाळीं । फुटोनि सर्व समुद्रपाळी । तैं एकार्णवाचिये जळीं । ब्रह्मांडढेपुळी विघरली ॥१६॥मग ते केवळ प्रळयसलिलीं । नारायणाचे नाभिकमळीं । अज जन्मला हे श्रुतीची बोली । मिथ्या केली नवचे कीं ॥१७॥परमेश्वरा ऐशिये वोज । तुजपासोनि जन्म माझा । हें काय लटिकें गरुडध्वजा । मी पुत्र तुझा निश्चयें ॥१८॥तुजचिपासूनि मी उत्पन्न । तव तंत्रेंचि चेष्टें पूर्ण । भ्रमलों धरूनि पदाभिमान । क्षमा आपण करावी ॥१९॥म्हणसी नारायणापासून । तुझें झालें असेल जनन । तो संबंध मज लागून । काय म्हणून लाविसी ॥३२०॥ऐसें न म्हणावें श्रीहरि । नारायणचि तूं निर्धारीं । भक्तानुग्रहें नानापरी । निर्विकारी अवतरसी ॥२१॥तोचि तूं हा पशुपांगज । दृष्टनिग्रह देवताकाज । भक्तानुग्रहें विग्रहवोज । हें निजगुज मी जाणें ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP