मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ७ ते ९ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ७ ते ९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ७ ते ९ Translation - भाषांतर गुणात्मनस्तेऽपि गुणान्विमातुं हितावतीर्णस्य क ईशिरेऽस्य ।कालेन यैर्वा विमिताः सुकल्पैर्भृपासवः खे मिहिकाद्युभासः ॥७॥अचिंत्य अनंतगुणपरिपूर्ण । तो तूं गुणात्मा गुणाधिष्ठान । त्या तव गुणांचें संख्यागणन । करूं कोण शकतील ॥५८॥कैसें प्रकारींचा तूं सगुण । मादृश देखोनि अज्ञान । त्याच्या हितार्थ अवतरोन । अनंतगुणप्रकाशक ॥५९॥विश्वस्थितिसंस्थापन । तेथ होतां प्रमादविघ्न । ते ते ठायीं अवतरोन । हितावतीर्ण म्हणविसी ॥२६०॥बहुधा रूपें अवतरोन । बहुधा विश्वाचें पाळण । बहुधा करिसी ते तवगुण । शकती कोण गणावया ॥६१॥प्रेमें मित्रें त्रासें हट्टें । द्वेषें रोषें तोषें कोठें । छेदूनि दासांचीं दुर्घटें । लाविसी वाटे स्वहिताचे ॥६२॥संख्या नलगे अवगणीं गणितां । गुणगणनेची कायसी कथा । म्हणों जरी कळेल बुद्धिमंता । तरी हें अनंता अघटित ॥६३॥कल्प म्हणिजे आयुष्मान । सुष्ठु सुकृत बहुल जाण । ऐशीं अनेक जन्में पूर्ण । आयुष्मान् धीमंत ॥६४॥बहुवचन मुळींचे पदीं । बहळ जन्मातें प्रतिपादी । सुष्ठु अव्ययें कुशाग्रबुद्धि । सुकृतसिद्धि चिरायु ॥२६५॥ऐशिया कुशलां चिरायुवंतां । अनेक जन्म गणना करिताम । भूमिपमाणु परमितां । काळें महता करवेल ॥६६॥अथवा हिमाचे परमाणु । आकाशभरी ही शकती गणूं । द्युभास म्हणिजे तारागणु । शकती उमाणूं मोकळे ॥६७॥अथवा तारादि चंद्रकिरणा । माजील परमाणूंची गणना । करूं शकवे विचक्षणा । परी सगुण तवगुणां न गणवे ॥६८॥ऐसें निर्गुणाहोनी सगुण । तारतम्यें दुर्बोध गहन । भक्तिमार्गाचें सुलभपण । बोले द्रुहिण तें ऐका ॥६९॥तत्तेऽनुकंपां सुसमीक्षमाणो भुंजान एवाऽऽत्मकृतं विपाकम् ।हृद्वाग्वपुर्भिर्विदधन्नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे स दायभाक् ॥८॥ब्रह्मा म्हणे जी विषाणधरा । तुझी अप्राप्ति साधकां इतरां । तस्मात सोपा भक्तनिकरा । भजनपरां निष्कामां ॥२७०॥जतक लक्षिती जलद अपा । किंवा चकोर जैसे उडुपा । जननीसंगम जेविं स्तनपा । तेवीं तव कृपा वांछिती ॥७१॥वृष्टि वांछिजे अवर्षणीं । कीं नौका जेंवि सागरमग्नीं । अन्न वांछी बुभुक्षु प्राणी । किंवा रुग्णीं नीरुजत्व ॥७२॥तेंवि कृपाकटाक्ष तुझा । केव्हां होईल बरवे वोजा । ऐसे साकांक्ष गरुडध्वजा । पदांबुजा चिंतिती ॥७३॥यावेगळा अन्यकाम । ज्यासि वाटे वांतीसम । अनासक्त परिपक्ककर्म । विगतकर्म भोगितां ॥७४॥न करी कृच्छ्रें चांद्रायणें । मासोपवासादि निरशनें । गुणकीर्तनकथाश्रवणें । नामस्मरणें संतुष्ट ॥२७५॥ज्यासी फावला परमरस । तो न सेवी विषयबाकस । अवगमलिया भक्तिरहस्य । ठेलीं फोस तपतीर्थें ॥७६॥यावज्जीव ऐसा जाला । तो मुक्तीचा विभागी झाला । पितृदायविभाग आला । जेंवी पुत्राला न जोडतां ॥७७॥जंववरी देहाची असे व्यक्ति । तंव क्रियारूपें प्रकटे भक्ति । देह पडतां अभेदमुक्ति । असे आइती जोडली ॥७८॥निजात्मविसरें मायाभ्रम । भोगवी जन्ममरणादि श्रम । तेथ तरणोपाय सुगम । भक्तिप्रेम हरि वदला ॥७९॥मामेव ये प्रपद्यंते । मायामेतां तरंति ते । ऐसें स्वमुखें श्रीअनंतें । अर्जुनातें बोधिलें ॥२८०॥भक्त्या मामभिजानाति । ऐसा सिद्धांत श्रीपति । प्रबोधूनी अर्जुनाप्रति । मोहभ्रांति निरसिली ॥८१॥शुक म्हणे गा परीक्षिती । तैशी ब्रह्मयाची हे स्तुति । जो जोभजे अभेदभक्ति । तो तव मुक्ति विभागी ॥८२॥दाय म्हणिजे पितृसंपत्ति । तरीमी जो कां अखिलपति । स्वर्गादि ब्रह्मलोकावाप्ति । दायबिभक्ति हे म्हणसी ॥८३॥तरी मी सर्वलोकां मुकुटीं । त्या मज ब्रह्मयाची हे रहाटी । क्षमापनार्थ परमेष्ठी । तेचि गोष्ठी निवेदी ॥८४॥मुख्य माझीच अनार्यमति । कायसी ब्रह्मलोकाची प्राप्ति । म्हणोनि सद्भक्त नेच्छिति । अभेदभक्ती वांचुनी ॥२८५॥पश्येश मेऽनार्यमनंत आद्ये परात्मनि त्वय्यपि मायिमायिनि । मायां वितत्येक्षितुमात्मवैभवं ह्यहं कियानैच्छमिवार्चिरग्नौ ॥९॥ऐकें स्वामी परमनाथा । मी निवेदीं क्षमापनार्था । माझिया दुर्जनत्वाची कथा । ते समर्था पर्येसीं ॥८६॥ब्राह्मी रौद्री ऐंद्री दैवी । यांचे प्रवर्तक ते मायावी । त्या मायिकांलागीं जो भुलवी । तो गोसावी अखिलाद्य ॥८७॥त्या तुझे ठायीं आपुली माया । पसरूनि ऐश्वर्य प्रकटावया । इच्छी तंव ते गेली लया । कुरंगतोया सारिखी ॥८८॥तूं मायावी अगाध सिंधु । त्यामाजी मी किंमात्र बिंदु । मी स्फुलिंग तूं जातवेदु । महाप्रळयकाळींचा ॥८९॥तुजप्रति माझी माया किती । फिरोनि मजची पडली भ्रांति । स्फुलिंगजळा प्रळयज्योती । न लपे गभस्ति खद्योतें ॥२९०॥मुख्य माझें हें औद्धत्य । तुझें ऐश्वर्य नित्य सत्य । तेथ गौणमायाकृत्य । धरी सामर्थ्य प्रकटावया ॥९१॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP