मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दीप रत्नाकर| अष्टक दीप रत्नाकर अनुक्रमणिका प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा आरती अष्टक अष्टक श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर. Tags : ashtakdeep ratnakarpothiramanandअष्टकदीप रत्नाकरपोथीमराठीरामानंद अष्टक Translation - भाषांतर ज्याच्या कृपेचा बहु लाभ झाला ॥ जन्मांतरींचा गुरुराज आला ॥ श्रीदत्त ऐसा मज बोध केला ॥ विसरूं कसा मी गुरुपादुकांला ॥१॥ अखंड माझ्या हृदयांत आहे ॥ सबाह्य देहीं परिपूर्ण पाहे ॥ टाकूनि मजशीं पाहींच गेला ॥विसरूं०॥२॥ स्वरूप माझें मज दाखवीलें ॥ देहींच माझें मज हीत केलें ॥ ऐसा जयानें उपकार केला ॥विसरूं०॥३॥ संसार - व्याळषं मज डंखियेलें ॥ परमार्थ बोधें विष ऊतरीलें ॥ माझ्यावरी हा उपकार केले ॥विसरूं०॥४॥ शुकादिकांला सुख प्राप्त झालें ॥ तसेंच तूं रे मजलागिं दीलें ॥ मातापिता तूं बंधूही मजला ॥विसरूं०॥५॥ निजात्मरंगें मज रंगवीलें ॥ स्वानंदलेणें मज लेववीलें ॥ बोधोनि ऐसा परिपूर्ण केला ॥विसरूं०॥६॥ सचखात्मडोहीं मज बुडवीलें ॥ घेवोनि हस्तें सचख दाखवीलें ॥ विवेक पुरतां भवताप गेला ॥विसरूं०॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP