मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग|
माझा बाप माच विठोवा रखुमा...

विठाचे अभंग - माझा बाप माच विठोवा रखुमा...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


माझा बाप माझा विठोवा रखुमाई । वडील वंधु भाई पुंडलिक ॥१॥
साधुसंत जण सोईरे हे जाण । वंदीन वरण भावें त्यांचें ॥२॥
मिजाचे खोईरे कां गा नोळखसी ।  भ्रमें भुललासी मायाजाळीं ॥३॥
पाळिलों पोसिलों जन्मोनी जयाचा । उतराई त्याचा काई होऊं ॥४॥
पाहेपा परतौनी मूळिचा तूं कोण । सदुरुशी शरण रिणें वेगीं ॥५॥
सद्रुरू दयाळें लेवविलें अंजन । मज जनार्दन अवघा मासे ॥६॥
विठा म्हणे तारीं आपुल्या शरणागता । अनाथाच्या नाथा पांडुरंगा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP