मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण ९ वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


माया
॥ अथ द्दश्यभासखंडनप्रारंभ: ॥
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
द्दश्य भासन, भ्रमण ऐसे ॥ वृथा मोह, करितें तैसें ॥
ज्ञान्या अज्ञान्या, लागे पिसें ॥ माया दुर्धर, अशीच कीं ॥१॥
उजेडांतुनी, आंत आला ॥ द्दष्टीमाजी, अंधार भरला ॥
नेत्र असतां, अदेखणा झाला ॥ ऐसेचि भ्रमिष्ट, सर्वही ॥२॥
अध्यात्म ऐकुनी, घरीं आला ॥ पुनरपि प्रपंचीं, सक्त झाला ॥
न, भ्रमवितां, सावध स्थितीला ॥ ज्ञानीच केवळ जाणतसे ॥३॥
जेथें मनानें, जें जें कल्पिणें । तें तें द्विनयनांनीं, देखणें ॥
अंतर्मुख बहिर्मुख, द्दष्टीच्या खुणे ॥ भ्रम टाकुनी निर्भ्रमहो ॥४॥
जेथूनि निपजे, विवेक मात ॥ पाही जो सत्य, शोध मनांत ॥
तत्वद्दष्टयाच, जो ज्ञाने पहात ॥ तोच ज्ञानी, जाणावा ॥५॥
ज्याचा तोची, आपणाशीं ॥ आपणचि आपण, उपदेशी ॥
तोच जाणील, आत्मस्थितीशीं ॥ त्यालाच ज्ञानी, जाणावा ॥६॥
पूर्वानुसंधान, तुजला असे ॥ त्याच चित्तें, तुजला दिसे ॥
तेंच देहधारणीं, प्रकाशे ॥ याला कारण, तुझाचि तूं ॥७॥
ऐसें विलक्षण, अंत:करण । तेथें तूंचि, स्फुरशीं जाण ॥
तेंच न स्थिरतां, गोंधळून ॥ भ्रमिष्ट फिरशीं, सर्वथा ॥८॥
उदकें तरंग, सोडणें ॥ अगाशे वायू, दवडणें ॥
तैशी तुझी स्फूर्ती, होणें ॥ कठीण तुजला सर्वदां ॥९॥
तरंग जळाच्या, आंत विरे ॥ वायू तोही गगनीं मुरे ॥
तैशीच तुझी, स्फूर्ती नुरे ॥ विवेकें तुझिया, ठायींती ॥१०॥
अपुला हात, जरी झाडिला ॥ तरी तो स्वदेहींच, जडलेला ॥
तैसा  अंत:करण, स्फुर्तीला ॥ जोड सांधा, असेच कीं ॥११॥
पृथक् न होय, स्फुर्ती वृत्ती ॥ परमात्मा पासाव, उभयोत्पत्ती ॥
कल्पनातरंगीं, लयोत्पत्ती ॥ हाच तयेचा, स्वभावगुण ॥१२॥
तूंचि पाहावें, तुझें चित्त ॥ मीच ऐसा, अहंकृत होत ॥
स्थीर असोनी उपाधीरहित ॥ स्फुर्ती उपाधी, करीतसे ॥१३॥
जरी निर्वेश, स्थीर असतां ॥ तरी स्फूर्ती, कल्पना करितां ॥
संकल्प विकल्प, करितां करितां ॥ वृथा गोंधळ, माजतसे ॥१४॥
एकदां निश्चय, पक्का धरितां ॥ तरी पुन:, कां चिंतितां ॥
देहत्वें कां वृथा, मानितां ॥ मी व माझें, म्हणोनिया ॥१५॥
म्हणोनि हेंचि, असंतत्व ॥ ठरतें सर्वथा, नित्यनित्य ॥
ज्ञान नसतां, अहंकारत्व ॥ बुडवी सर्वस्वी, सर्वांना ॥१६॥
अज्ञान जातां, ज्ञान राहे ॥ ज्ञानेचि शोधोनी, सत्य पाहे ॥
ज्ञानाविणे, लाभचि नोहे ॥ क्षुद्रापासुनी, मुक्ती परी ॥१७॥
तें ज्ञान जरीं, अधिष्ठान ॥ तरी संकल्प, विकल्पीच मन ॥
अभ्यासाविणे, उन्मन तन्मन ॥ स्फुरण नष्ट, न होय कीं ॥१८॥
कांहीं न स्मरतां, नये स्मरण ॥ स्मरणचि जयाचें, विस्मरण ॥
मग तें ज्ञान, न अज्ञान ॥ उरे ज्ञप्ती मात्न पै ॥१९॥
वृत्तीशीं कांहीं, भास भासे ॥ तितुकीच, स्फूर्ती होतसे ॥
तथापि स्वत: आपणची असे ॥ केवळ निरा, भासमयी ॥२०॥
तो निराभास, म्हणाव कवण ॥ तोचि तयाचा, कांहीं जाण ॥
तें जाणीव ही, जिरवून ॥ जेथील तेथें, टाकावें, ॥२१॥
देहासहित, ब्रम्हांड शून्य ॥ ऐसें ज्ञान, परिपूर्ण ॥
कांहीं न दिसें, स्वानमान ॥ तोचि योग्य परमहंस ॥२२॥
त्रैलोक्य असे तें, साकारी ॥ विकारी म्हणोनी, ओकारी ॥
येत असे जें, ॐ कारी ॥ संचले त्यांना, सहजच कीं ॥२३॥
अंतर्बाहय जें, परिपूर्ण ॥ शून्य झालें त्या, आभासन ॥
राहिले अपुलेची, आपण ॥ स्वयं ब्रम्हा होवोनिया ॥२४॥
वृत्तीच जिरांनिया, पै गेली ॥ मन बुद्धी ती, मावळली ॥
देहाची तो, विस्मृतीच झाली ॥ तोचि झाला, जीवन्मुक्त ॥२५॥
पंच भूतांची, करिते काया ॥ जीवालागीं, रमवावया ॥
तरी शेवटीं, घालविते वाया ॥ हेंच लक्षण, मायेचें ॥२६॥
सुखा कारी, चमत्कार ॥ दावी, माया, अपरंपार ॥
तरी शेवटीं, दु:ख अपार ॥ करिते माया, स्वयं गुणे ॥२७॥
अज्ञान, अविद्या, वृथा मोह । कर्दम दुर्गंधीं, उहापोह ॥
जगत् गारुडी, करी व्यामोह ॥ हेंचि लक्षण, मायेचें ॥२८॥
सुंदर स्त्रियांना, पृथ्वीतळीं ॥ सजवी केवळ, नटी पुतळी ॥
माया जात्याच, नटी पुतळी ॥ वृथा चर्म, रंगवीतसे ॥२९॥
देव, दानव, ऋषी थोर ॥ करिती कृत्यें, नीच घोर ॥
वृथा मोहे, सदा घोर ॥ लावी सर्वां, मागे ती ॥३०॥
ऐशी माया, नीट जाणणें, ॥ कर्दम दुर्गंधीं, न्याहाळणें ॥
अंत:करण, परावृत्त करणें ॥ हेंचि ज्ञान, सत्य असे ॥३१॥
चर्म, मांस, लाळ, मूत्र ॥ लग्नार्थी म्हणती, ब्रम्हासूत्र ॥
तया मानवा, ईश मित्न ॥ मायामोहें, न आठवे ॥३२॥
ज्ञानद्दष्टया, जागे होणें ॥ माया मोहातें, निरसणें ॥
जन्मोजन्मीं तें, घट्ट करणें ॥ सहजीं न होय, कोणाशी ॥३३॥
साधूसंगें, निरसे माया ॥ होते अत्यंत, शुद्ध काया ॥
देह न जाई, केवळ वाया ॥ कांहीं तरी, लाभेल कीं ॥३४॥
लागूं नये, तिचिये नादी ॥ फसले बहुथोर, अनादी ॥
मारावे रिपू, कामादि ॥ मुक्ती लाभा, साठींच कीं ॥३५
इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते द्दश्यभासखंडन नाम मायार्थी नवमं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP