मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि| गुरुआज्ञा साधन मुक्तावलि प्रात:स्मरण प्रात:स्मरण पंचरत्न स्तोत्र रामलक्ष्मणाष्टक तत्वमसि स्तोत्र अभ्यास मनोलय सहज समाधि संप्रात आणि असंप्रात समाधी द्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी उत्थान लक्षणें मुक्तस्थिति कौपीनपंचक गुरुआज्ञा जनस्वभाव रामदासी अभंगसुधा श्रीसमर्थस्तवराज देवभक्त प्रणयकलह श्रीसंकर्षण स्तोत्र वनमाला रघुवंशावलि रामस्तव प्रकरण १ लें प्रकरण २ रे प्रकरण ३ रे प्रकरण ४ थे प्रकरण ५ वें प्रकरण ६ वें प्रकरण ७ वें प्रकरण ८ वें प्रकरण ९ वें प्रकरण १० वें प्रकरण ११ वें प्रकरण १२ वे प्रकरण १३ वें प्रकरण १४ वें प्रकरण १५ वें साधन मुक्तावलि - गुरुआज्ञा ’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत. Tags : abhangpadअभंगपद गुरुआज्ञा Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥ गुरुर्नसस्यात्स्वजनोनसस्यात्पितानसस्याज्जननीनसास्यात् ।दैवंन्नतत्स्यान्नपतिश्चसस्यान्नमोचयेद्य: समुपेतमृत्युम् ॥१॥॥ ओंव्या ॥ ऐक गुरुभक्तीचें लक्षण । निपटुनी जावें मीतूंपण । एक गुरुचि परिपूर्ण । भेदभान न होतां ॥१॥किंवा एकचि पूर्ण आत्मा । कल्पूं नये रूपनामा । हा अभेद भक्तीचा महिमा । द्दढ कां न व्हावा ॥२॥इतुकाचि औटं हात गुरु । या सर्वांमाजीं कोण गोचरू ।आणि तुझ्याठायींही विकारु । कोठूनी आला वेगळा ॥३॥आत्मा देहधारी कल्पिसी । तूंही देहा येव्हढा होसी । अहा ! निकृष्ट कल्पना ऐसी । पूर्ण ज्ञाना विरोध ॥४॥वियोग - संयोगाचा खेद । कोठें असे ? आत्मा अभेद । चराचरी सच्चिदानंद । नामरूपावीण ॥५॥जडाचा मानिसी संयोग । केव्हा तरी होय वियोग ।तेव्हां समाधान भंग । होईल बापा ॥६॥देह प्रारब्धाधीन तैसा । एकरूप राहे कैसा ? ।सांडी सांडी भेद ऐसा । देह बुद्धीचा ॥७॥तस्मात् भ्रम हा सांडूनी । मीच ब्रम्हा सर्वपणीं ।पाहसी ऐसें अनुदिनीं । तरी ज्ञान तें हेंचि ॥८॥तूंची एक ब्रम्हा अद्वय । हेंचि समाधान निर्भय ।आतां सांडी गा संशय । आज्ञा आमुची ॥९॥अगा महा भाग्यें करून । सत्समागम आणि सच्छास्त्र - श्रवण ।होतां तेंचि क्षणीं जाण । सुख - संपन्न तो होय ॥१०॥देहाभेमानाचें निर्दलण । स्वयें न करूनी आपण । नित्य मुक्त हमणवितां जाण । विषयसेवन बाधक ॥११॥कर्म करी यथाविध । अंतर पडतां नुपजे खेद । तरी सोनें आणि सुंगध । निश्चयेंशीं ॥१२॥तस्मात् सर्व जरी अज्ञानी । तरी न जन्मे न मरे कोणी । आत्मा जैसा पूर्णपणीं । तैसाचि आहे ॥१३॥कोणासीच नाहीं बंधन । कोणासी नाहीं पापपुण्य ।सुख दु:ख भोगही संपूर्ण । नसे कोणासी ॥१४॥प्रपंच म्हणजे उदास नागवणा । आणि परमार्थ म्हणजे प्रपंज बुडवणा ।परस्परें या दोघाजणा । सर्वथा न पडे ॥१५॥प्रपंचीं आणि परम सुख । पावेन म्हणेल तो मूर्ख । जैसें परमान्नीं मिश्रित विष । सेवितां मृत्यु पावे ॥१६॥परमार्थ सद्दढ जडे । मोहजाळ समूळ उडे ॥ हेंप प्रपंचीं सहसा न घडे । वैराग्यावांचोनी ॥१७॥असो जयाचि तुटली देह - आशा । परमार्थ शोभे त्या पुरुषा ।देह पांगे ए दुर्दशा । परम हीण ॥१८॥साधनेवीण बाष्कळता । तेंचि जाणावी बद्धता ॥तेणें घडे अनर्गळता । आसक्त रूपें ॥१९॥ऐक गा शिष्य - टिळका । नेम नाहीं ज्या साधका ॥तयासि अंतिं धोका । नेमस्त आहे ॥२०॥समाधानिं जो आगळा । तेथें भक्तिचा जिव्हाळा ॥ जैसि ते गृहाचि कळा । आंगण सांगे ॥२१॥भक्तिविण ज्ञान जोडे । ऐसें हें कल्पांतीं न घडे ॥भक्ति साधन करिता जडे । भक्त भगवंतीं ॥२२॥श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटावी तात्काळ ॥तेणें करतां प्रांजळ । आत्मज्ञान होय़ ॥२३॥जन्मा आलियाचें स्वहित । जें नामस्मरणीं रंगलें चित्त ॥सद्बुरुभक्ति विकल्पपहित । आचरे भावें ॥२४॥तरी जन्मांतरिचीं अनेक पातकें । प्राणियास घडलीं अनेकें ॥म्हणोनि तयासि विवेकें । ओसंडिलें आहे ॥२५॥त्रास सांगतां सत्याचा । आणि विश्वास बाणला असत्याचा ॥हा जाणावा पूर्व पातकाचा । ठेवा सोडीना ॥२६॥ज्ञान तेंचि जे जाणीव विरे । देह बुद्धि नि:शेष सरे ॥देहाभिमानें हुंबरे । तो ज्ञाता नव्हे ॥२७॥जो या जनाच्या बोली लागला । त्याचा परमार्थ बुडाला ॥समाधानें असावें तयाला । साक्ष आपुलेंचि मन ॥२८॥लौकिक पाहिजे तेणें । शिकावें पुस्तकिचे शाद्बिक ॥२९॥पिसाचे डोळीयानें जरी दिसतें । तरींच गुरुविना वेदाचें रहस्य प्राप्त होतें ।वेदाचें रहस्य न कळेचि जातें । त्याच्या कर्मांतें काय पुसावें ? ॥३०॥शरीर प्रारब्धाधीन । होणार तें होईल प्रयत्नेवीण । हें जरी असतें त्यासी ज्ञान । तरी धनाशा आपण न करिते ते ॥३१॥नवल अहंकाराची गोष्टी । विशेष न लागे अज्ञानाचे पाठीं । झोंबे सज्ञानाचिये कंठीं । नाना संकटीं नाचवी ॥३२॥वैराग्यें नामरूप त्यागावें । ज्ञानें ब्रम्हा तें जाणावें । पुढें द्वैत टाकूनी व्हावें । निजांगें ब्रम्हा ॥३३॥तस्मात् तें ब्रम्हा जाणलें पाहिजे । जाणोनी तेंची होऊनी राहिजे ।तरीच साधका मोक्ष लाहिजे । नातरी बंधन द्दढ ॥३४॥वृत्तिविण वृत्तीचा लय । जाणे जो स्वतां अद्वय । तेंचि चिद्र्प नि:संशय । देखणा शून्याचा ॥३५॥आहेपणा तो सद्रूपाचा । दिसणेंपणा तो चिद्रूपाचा ।प्रियपणा तो आनंदाचा । या तिहीवीण यांत काया ! ॥३६॥तस्मात् नामरूपात्मक जग । झालेंचि नाहीं सर्वथा सोंग ।आहे तें ब्रम्हाची अभंग । ऐसें सर्वपण विवेचिलें ॥३७॥बहु बोलणें बापा कासया । देहापासुनी स्फूर्तिरुप माया ।हा अवघा संग जो तया । सविकल्पजीव म्हणावा ॥३८॥पूर्वीं जीव मग सुटती । तया नांव जीवन्मुक्ति । ऐशीच यथार्थ हे युक्ति । अनुभव सिद्ध ॥३९॥एवं अहंकारादि देहांत । तूंची अससी सदोदित । सांडी मांडीचा संकेत । भ्रम हा टाकी ॥४०॥अपरोक्ष म्हणजे आपण कोण । तें निजरूप अंगेंचि होणें ।परोक्ष म्हणजे आपण । ओळखावें आपणा ॥४१॥तिन्ही विन्घें निरसिलीं । ब्रम्हाकारवृत्ति झाली ।चिद्नगनाकार एकरसली । हेचि ब्रम्हाविद्या ॥४२॥ही ब्रम्हविद्या अज्ञान नासूनीया समग्र । स्वयेंही नासे ॥४३॥आपण आपणातें असंग ओळखितां । हें सर्व मिथ्या होय कर्मेंही घडतां ।मी कर्ता ही ऊर्मीच नुठतां । घडलें तें व्यर्थ जाय ॥४४॥तुझें माझें आणि हें तें त्याचें । ऐसें भिन्न चिद्रूप न पहावें साचें ।एकच अधिष्ठान ब्रम्हा सर्वांचें । तूं मी हा हें टाकुनी ॥४५॥अंगें (ब्रम्हा) असतां चिंतूं लागला । तथा चिंतनासी भ्रम असें बोलीला ॥पुढें स्मरतां न स्मरतां । अंगें झाला वस्तुतंत्रब्रम्हा ॥४६॥नि:शेष सर्व जाईल निपटून । किंचित् भान नसे सर्व असून ॥आणि समूळ हरेल अहंपण । तोंवरी अनुसंधान न सोडावें ॥४७॥एवं त्रिपुटीचें खंडन होतां । मग निजांगेंची ब्रम्हा तत्वतां ॥याचि नांवें द्दढापरोक्षता । ऐक्यता अभिन्न ॥४८॥मुख्य तृप्ति व्हावी गहन । तैसेंचि व्हावें समाधान ॥ते न होतां वाउगें भाषण । कधींच न सरे ॥४९॥अवघींच मुक्तता पावावी । तरी हे वाडी कोणें - वसवावी ।म्हणोनिया माया गोंवी । नाना उपायें करूनिया ॥५०॥प्राणा करूं जाय उपाय । बलूंदने करि त्याचाचि अपाय । अंतीं प्राणी पाहूं जाय । तंव उपायींच ठाव नाहीं ॥५१॥ऐसें हें मायेचें करणें । भल्यासीच वेड लावणें ।तेथें तुझें कोणीकडे सांगणें । व्यर्थची कां शिणसी ॥५२॥जरी तुज सांगणेंचि आहे । जरी तूं आपलीच क्रिया पाहे ।तुझी क्रिया पालटलि लाहे । जनासी कांहीं ॥५३॥अरे तुज क्रिया न घडे । तुजें सांगणें कोणीकडे ।शब्दज्ञान बडबडे । वरपडा कां झालासी ॥५४॥आपण करूनि दाखवावें । तरीच दुसर्यासि सांगावें ।ना केला तरी रहावें । मेलेंसें आपुलें ठायीं ॥५५॥झांकावें आपणासि । आणि शिकवावें पुढिलासी । ऐसा हा सकळ सृष्टीसी । दंडकचि आहे ॥५६॥तूंही वर्तसी तया ऐसा । तरी तुज परमार्थ कैसा । नट धांवत आणि जैसा । रंजवावया जनासी ॥५७॥म्हणोनी आपण क्रिया करावी । मग पुढिलासी नलगे सांगावी ।तुझी क्रिया देखोनि जीवीं । तेही तैसी करितील ॥५८॥अरे पुढिल्याचें तुज काय । तूं तो समाधानी होय । तुझें समाधान जालिया । जनासी सांगणेंची नलगे ॥५९॥अभिमान तुजपाशीं जागतो । तुझें कोण मानूं पहातो । जनहि सकळ जाणतो । तुझे अंतरींचें ॥६०॥म्हाणोनि जें कांहीं दुसर्यासि सांगावें । तें तुवां स्वयेंचि करावें ।ऐसें केलिया स्वभावें । समाधान सकळीक ॥६१॥जरी जनें बाष्कळ म्हणावीं । नसतीच करिती उठाठेवी ।तरी मिथ्या जाणोनी जीवीं । आपण कांस या (विचाराची) ची धरावी ॥६२॥देहचि आपण नव्हे । तरी प्रारब्ध कोठें आहे ॥देह निमाले कीं राहे । त्या संबंध नाहीं ॥६३॥आत्मा देह रूप होईना । देहासी प्रारब्ध सोडीना ॥देहाचें रूप हेंचि जाणा । प्रारब्ध कर्म ॥६४॥प्रारब्ध नासूं म्हणतां कोडें । तरी जनकादिक काय वेडे ? ॥ज्या क्षणीं जो भोग आतुडे । समानत्वें भोगिती ॥६०॥स्वरुपीं स्वरूपानुभवें । जीवन्मुक्ति सुख भोगावें ।उरलें प्रारब्ध तें सारावें । सुखदु:ख भोगोनी ॥६६॥मागें पुढें आंत बाहेरीं । अवघा गुरूचि चराचरीं ।संयोग - वियोगाचा निर्धारीं । नुरेचि खेद ॥६७॥सर्वसंग - परित्यागु । करूनी उरला अभंगु । जळीं फिरे जेवीं तरंगु । तेवीं देह विचरे ॥६८॥जें कांहीं मजपासोनी होतें । ऐसें तूं म्हणों नको आपणातें ।जैसें चुंबक चाळवी लोहातें । तैसें गुणसत्तें तुझेनी ॥६९॥शुभाशुभ कर्में होतीं । तीं गुणयोगें जाण चित्तीं । म्हणोनि निंदा आणि स्तुति । वरपडे न व्हावें ॥७०॥जें जें होईल ज्या वेळें । तें तें भोगावें प्रारब्धबळें । प्रयत्न सांडोनी प्रेमबळें । मानीं वेगळा आपणासी ॥७१॥ N/A References : N/A Last Updated : September 10, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP