स्फुट श्लोक - ज्ञानी येक भला कवित्व वदल...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
ज्ञानी येक भला कवित्व वदला नाना घटीं बोलिला ।
त्याचा पार कळे तयासि वहिला तदृपता लाधला१ ।
माया मोह वियोग योग सहसा तुर्येसि वोलंडिलें ।
नाना मूळ समूळ निर्मुळ बळें भेदास हि खंडिले ॥१॥
क्रिया कर्म स्वधर्मचरितें लोलप्यता नाडळे ।
नाना देश विदेश फार फिरतां शांति क्षमा आडळे ।
निंदा द्बेष अगूण गूण न दिसे भृतकृपा वीलसे ।
प्रारब्धें चि प्रपंच संच५ असतां वारी ज कीं लालसे ॥२॥
अज्ञान ज्ञान भर्ता स्वजन वनीं वसे श्री गुरु मोक्षदाता ।
सामर्थ्या पार नाहीं अघटित विवर्णें वेद वेदांत वक्ता ।
नाना पंथें पहातां अगणित गणिता दूसरा नाहीं त्राता ।
कृपेचा सिंधु मोठा सकळ जन पदीं तारणें हे चि सत्ता ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP