मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - सुखार्णवाचे गुण आठवावे । ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


सुखार्णवाचे गुण आठवावे । मनांतरी ते मग सांठवावे ।
जनीं जनाचे गम नाठवावे । पदार्थ रामार्पण लूटवावे ॥१॥
उदास वृत्ती हदयीं वरावी१ । अध्यात्मविद्या मग वीवरावी ।
प्रपंचमाया झट आवरावी । रतीपतीची चट ना वरावी ॥२॥
निरावलंवी वीवरीत जावे । सोहंपणाला मन नित्य जावें ।
आचार्यपद्‍मीं कमळीं पुजावे । गोविंद जिव्हे स्मरणीं रिझावे ॥३॥
हरादिकांचे निज गूज गावें । नि:काम बुद्धी सज्जनीं जगावें ।
मायीक सर्वै निरसीत जावें । श्रीराम नस्तां मग ना जगावें ॥४॥
श्रीरामनामीं रत सूमना रे । सध्यां च सर्वै मनकामना रे ।
सर्वस्व वाहे बळी वामना रे । ब्रह्मांड भेदी मग जा मना रे ॥५॥
भृभंगमात्रें त्रैलोक्य जाळी । त्या शंतकराते विष पंक जाळी ।
श्रीरामनामामृत वीष जाळी । तें नाम घेतां अघ सर्व जाळी ॥६॥
चराचरीं ठाण रघोत्तमाचें । हें वाक्य गर्जे भविष्योत्तमाचें ।
ममताश्रमी जे रजोत्तमाचे । त्या प्राप्त कैंचें सुख उत्तमाचें ॥७॥
अनाथबंधू निजसूखदानी । भक्ताभिमानी पुरवी निदानी ।
जडजीव नामें नामाभिधानी । अगणीत केले कल्याणदानी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP